सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम बंद करावेत का?

Submitted by खग्या on 14 June, 2018 - 18:39

मंदिर, परमेश्वर आणि भक्ती याचं अनन्यसाधारण महत्व आपल्या संस्कृतीत खूप संत महात्म्यांनी समजावून सांगितलं आहे. मी श्रद्धाळू वगैरे नाही पण मंदिर किंवा मूर्ती पहिली किंवा अन्य पूजनीय व्यक्ती पहिली कि हात आपोआप जोडले जातात, म्हणजे आस्तिक नक्कीच आहे. पण अलीकडे लोकांची भक्ती पहिली कि उबग येतो. २५-३० वर्षाचे तरुण जेव्हा साई बाबांच्या दर्शनासाठी चालत मुंबई हुन शिर्डी ला जाताना दिसतात तेव्हा खरंच वाईट वाटत. लोकांचं देव देव करणं, सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली धुडगूस घालणं, आणि देवाच्या नावाचा बाजार मांडणं पाहिलं कि सहज एक विचार डोकावून जातो :

सार्वजनिक भक्ती स्थळे (सर्व धर्म, पंथ यात आले) आणि सार्वजनिक भक्ती उत्सव 'ज्यात परमेश्वराची पूजा केली जाते ते सगळे उत्सव यात दिवाळी पहाट किंवा तत्सम सांस्कृतिक कार्यक्रम अपेक्षित नाहीत' कीर्तन किंवा भाषण सुद्धा चालेल. (पण अमुक ठिकाणी/मूर्तीमध्ये देव आहे त्याला फुलं वहा असं जिथे सांगितलं जात ते नको ) यावर बंदी घातली तर समाजात चांगला फरक पडेल का?

यात स्वतःच्या घरात ४ भिंतीच्या आड कितीही भक्ती करण्यास हरकत नाही फक्त त्याला कुटुंबाच्या बाहेरील लोकांना बोलावू नये म्हणजे झालं. पण महाप्रसादाच्या जेवणावळी उठवण्यास नक्कीच हरकत आहे. कारण प्रसाद घेताना आधी परमेश्वराला नमस्कार करणं अपेक्षित आहे.

या वर मायबोली करांची मते जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुम्ही घालणार आहात का बंदी ?
फक्त मायबोलीकरांचीच मतं पुरेशी आहेत का बंदी घालण्यापूर्वी ? इतर लोक ओरडणार नाहीत का ?

पण अलीकडे लोकांची भक्ती पहिली कि उबग येतो. २५-३० वर्षाचे तरुण जेव्हा साई बाबांच्या दर्शनासाठी चालत मुंबई हुन शिर्डी ला जाताना दिसतात तेव्हा खरंच वाईट वाटत. >>> +१११

यात स्वतःच्या घरात ४ भिंतीच्या आड कितीही भक्ती करण्यास हरकत नाही>>>
रस्त्यावर नमाज पढ़ले जातात त्याचाही स्पष्ट उल्लेख करा की राव ! का तुम्हाला फक्त गणेश मंडळ दिसणार आहेत. तर मग तसे स्पष्ट बोला. उगीच कंसात माफक लिहिले की सगळे ह्यात आले तर कसे चालेल ? जर मंदिर परमेश्वर आणि साइबाबांचा उल्लेख करता आहात तर अल्ला आणि त्या अनुषंगाने बाकी कर्मकांडाचाही स्पष्ट उल्लेख हवाच की Wink बघा जमताय का !

Submitted by भूमिपुत्र on 15 June, 2018 - 07:38
>>> दुसर काहीतरी बोला हो असली वाक्य वाचली की बाळबोध प्रतिसाद वाटतो. तीच ती वाक्य टाकुन कशाला धागा पेटवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताय. Light 1 Happy

भूमिपुत्र यांचा प्रतिसाद १४ तारखेचा आहे. १५ तारखेचा नाही.

त्या अनुषंगाने बाकी कर्मकांडाचाही स्पष्ट उल्लेख हवाच की Wink बघा जमताय का !

नवीन Submitted by भूमिपुत्र on 14 June, 2018 - 22:08

र्मकांडाचाही स्पष्ट उल्लेख हवाच की Wink बघा जमताय का
Submitted by भूमिपुत्र on 15 June, 2018 - 07:38

मला सुद्धा हा प्रतिसाद 15 जूनचा दिसतो आहे,

आपल्या स्वतःच्या प्रोफाइल मध्ये कुठला टाईमझोन निवडला आहे त्यानुसार इतर सर्व लेख, प्रतिसादाचा टाइमस्टॅम्प बदलतो.

बाकी लेखकाशी सहमत.

मधुर, तुम्ही ज्या टाईमझोनमध्ये आहात, त्याप्रमाणे तुम्हाला प्रतिसादाखालील वेळ व तारीख दिसते. मलाही भूमीपुत्रांचा प्रतिसाद 15चा दिसतोय. तुम्ही बहुतेक यूएसला आहात.

Submitted by mr.pandit on 15 June, 2018 - 05:19>>>>
चाय से ज्यादा यहाँ किटली गर्म Lol
Light 1

डुप्लिकेट id बनवताना लोक मुद्दामहून वेगळा टाइम झोन निवडतात Wink आणि मग विसरतात, म्हणून असे घोळ होतात

रस्त्यावरचा नमाज, सार्वजनिक म्हणुन रस्त्यावर साजरे केले जाणारे गणेशोत्सव, संकष्टीला सिद्धीविनायकाबाहेरच्या रांगा हे सर्व बंद झाले पाहिजे. पण करणार कोण??

अनुभवी आहात वाटते. मला टाईमझोन कसा निवडतात हे ठाऊक नाही.
तुम्ही वारंवार माझ्यावर टिप्पणी करत असता त्यामुळे तुमचा आयडी समोर येतो आणि मला गहीवरून येते.

कारण माझ्या कुत्रीचे नाव ! भ्रमिष्ट होऊन गेली बिचारी.. नका आठवण करून देऊ तिची.

धागा धोधो चालणार याची खात्री वरचे काही प्रतिसाद वाचुन वाटतेय.
तिकडे एक ताई महाप्रसाद लोक जेवणासारखा खातात म्हणुन वैतागल्यात. त्यांना इथे बोलवा.

<<< तिकडे एक ताई महाप्रसाद लोक जेवणासारखा खातात म्हणुन वैतागल्यात. त्यांना इथे बोलवा. >>>
------- प्रसादाच्या ताटा सकट...

ईतरांना होणारया त्रासामुळे आक्षेपच घ्यायचा असेल तर धार्मिक कारणामुळे असो वा 15 ऑगस्ट वा 26 जानेवारीचे कार्यक्रम असो. सर्वांवरच घ्यायला हवा. कोणाची देवावर श्रद्धा असते तर कोणाची देशावर. काही जणांची दोघांवर असते ते 26 जानेवारीला सत्यनारायणाची महापूजा ठेवतात.

रस्त्यावरचा नमाज, सार्वजनिक म्हणुन रस्त्यावर साजरे केले जाणारे गणेशोत्सव, संकष्टीला सिद्धीविनायकाबाहेरच्या रांगा हे सर्व बंद झाले पाहिजे. पण करणार कोण??
Submitted by विठ्ठल on 15 June, 2018 - 10:15>>>>>>>>
+100

झालेच तर सरकारी कार्यालयात बसणारे गणपती आणि सत्यनारायण सुद्धा, कार्यालयीन वेळेत होणारा नमाज सुद्धा
पण करणार कोण??

माझ्या कुत्रीचे नाव ! भ्रमिष्ट होऊन गेली बिचारी.. नका आठवण करून देऊ तिची.>>>>>

माझा id तुमच्या प्रिय गोष्टींच्या नावाशी निगडित आहे हे ऐकून आनंद झाला.
तिच्या वियोगाच्या दुःखातून सावरण्याची देव तुम्हाला शक्ती देवो.

कुत्री चे पुल्लिंगी नाव ठेवायचे काही खास कारण?

वर लिंक दिलेली आहे. तुमच्यामुळे विषयांतर खूप होत आहे आणि धागा भरकटला जात आहे. कृपया मला या कारस्थानात ओढू नये ही विनंती.

राहिलं,
तुमच्या दुःखाला सहानुभूती दाखवली तर म्हणे कारस्थान केले...
ज्याचे करावे भले...तो म्हणतो माझेच खरे...

सिम्बा,
स्युसाईड बॉम्बर नावाचा आयटम ठाऊक आहे ना?
आवरा. रिव्हर्स गियर टाका आता.

सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम बंद करावेत का?
असा
विषय
आहे > आभार आपले ताई माझी बाजू मांडल्याबद्दल. केव्हांचं सांगितलंय तरी ऐकत नाहीत.
भरकटवणा-यांसाठी ठिकाणे आहेत की... दारू कशी प्यावी, जुगार कसा खेळावा . उगीच

Pages