Pdf बद्दल

Submitted by केअशु on 23 June, 2018 - 03:39

हल्ली बरीचशी मराठी पुस्तके विशेषत: प्रसिध्द कादंबर्‍या PDF स्वरुपात व्हॉटसअॅपवरुन फिरत आहेत. याबद्दलच थोडी माहिती हवी आहे.या संदर्भाने खालील माहिती मिळाल्यास सर्वांनाच उपयोग होईल.

१) अशा प्रकारे दुसर्‍या व्यक्तीने लिहिलेल्या किंवा ते पुस्तक छापणार्‍या प्रकाशन संस्थेच्या परवानगीशिवाय त्या पुस्तकांच्या PDF फाईल्स बनवणं आणि वितरित करणं हा गुन्हा आहे का?

२) समजा ठराविक लोकसंख्येला अशी PDF फाईल पाठवणं हा गुन्हा नसेल तर ती संख्या किती?

३) ही मर्यादा अोलांडल्यास भारतीय कायद्यान्वये काय शिक्षा होऊ शकते?

४) समजा जेवढ्या लोकसंख्येला PDF फाईल पाठवणे कायद्यात बसतं तेवढ्यांनाच मी पाठवली;पण ज्यांना पाठवली त्यांनी पुढे अनेक जणांना ती फाईल पाठवली तर या बद्दल मला शिक्षा होऊ शकते का? की मी स्वत:हून ज्यांना पाठवली नाही त्यांच्याकडे असणार्‍या फाईल्सबद्दलही मला शिक्षा होऊ शकते?

५) समजा या PDF फाईलमधील मजकूर कॉपी करता येईल अशी फाईल असेल किंवा तसा मजकूर कॉपी न करता येणारी स्कॅन केलेली PDF फाईल असेल तर यामुळे काही फरक पडतो का? म्हणजे कॉपी करता येणार्‍या PDF फाईलसाठी वेगळे नियम आणि स्कॅन केलेल्या PDF फाईलसाठी वेगळे नियम असं काही आहे का?

६) यापुढे जाऊन मूळ पुस्तकातील सर्व पानांची PDF फाईल बनवून तिचे वितरण केल्यास नियम वेगळे आणि काही ठराविक पानांचीच PDF फाईल बनवून वितरित करणे यासाठीचे नियम वेगवेगळे आहेत का?

७) समजा माझ्याकडे एक पुस्तक आहे.ते पुस्तक ज्या प्रकाशन संस्थेने छापले आहे त्यांनी ते खुप वर्षे झालं परत छापलेलंच नाही; शिवाय हे पुस्तक सार्वजनिक वाचनालयातही उपलब्ध नाही अशा वेळी मी हे पुस्तक काही लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध व्हावं म्हणून स्कॅन करुन त्याची PDF फाईल बनवून ते व्हॉटसअॅप,फेबु किंवा मेल वरुन पाठवलं तर तो गुन्हा असेल का?असल्यास मग अन्य कोणत्या मार्गे हे पुस्तक मी इच्छुकांना जे एकाच गावात,शहरात राहत नाहीयेत त्यांच्यापर्यंत कसं पोहचवू शकतो?

८) कोणत्या प्रकारचे साहित्य फाईलच्या स्वरुपात पाठवणे हा गुन्हा नाही? म्हणजे कोणत्याही भाषेतले वर्तमानपत्र,मासिक,साप्ताहिक,पाक्षिक,दिवाळी अंक या प्रत्येकासाठी वेगळे नियम आहेत का?

९) फाईल बनवण्यास मनाई नाही पण त्याची प्रिंट काढून छापील प्रत जवळ बाळगणे हा मात्र गुन्हा असं अाहे का?

१०) मॅग्झटर,न्यूजहंट किंवा अशाच एखाद्या पेड अॅप किंवा पेड वेबसाईटवरुन मी पैसे भरुन एखादी PDF फाईल डाऊनलोड केली आणि इतरांसाठी मोफत वितरित केली तरीही हा गुन्हा/नियमभंग आहे का?

११) किती वर्षांपूर्वीचे जुने पुस्तक PDF स्वरुपात बनवून मोफत वितरित करणे हा गुन्हा नाहीये?

(कृपया किंडल,Wattpad किंवा अशाच कुठल्यातरी अॅप/साईट वाचनासाठी सुचवू नयेत.धागा PDF फाईल्स बनवणे आणि त्यांचे वितरण यांसंदर्भात आहे.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults