Wonder by R.J. Palacio

Submitted by मन्या ऽ on 14 December, 2020 - 13:28
Wonder पुस्तक परिचय, बुक रिव्ह्यू, R J Palacio

Wonder ही गोष्ट आहे एका दहा वर्षाच्या लहानग्या मुलाची. ऑगस्ट पुलमनची. जो इतर मुलांसारखाच curious आहे.मस्तीखोर आहे. आणि स्टार वॉर्सचा खूप मोठा फॅन आहे. त्याच त्याच्या आई-वडिलांसोबत, मोठ्या बहिणीसोबत आणि पाळलेल्या पेट- डेजीसोबत गोड- प्रेमाचं नातं आहे.. पण या कादंबरीची tragedy म्हणजे त्याचा चेहरा. ऑगस्टचा चेहरा हा जन्मतःच Treacher Collins Syndrome नावाच्या रेअर जेनेटिक कंडिशनमुळे deformed आहे.
कादंबरीत या ऑगस्टची वाचकांना ओळख करून देताना लेखिकेने म्हटले आहे की,
My name is August, by the way. I won’t describe what I look like. Whatever you’re thinking, it’s probably worse.
----
ऑगस्टचा चेहरा हा सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळा आहे. जेनेटिक कंडिशनमुळे त्याच्या चेहऱ्याची development नीट झालेली नाही. लेखिकेने ऑगीच्या चेहऱ्याचं वर्णन करताना तो दिसायला एखाद्या जळलेल्या मशरूमशेप रोबोट सारखा आहे. असं लिहीते.
या जेनेटिक कंडिशनमुळे अगदी लहान वयातच ऑगीच्या चेहऱ्यावर एकुण २७ लहान-मोठ्या सर्जरी झाल्या आहेत.. त्याच्या अशा फिजिकल कंडीशनमुळे त्याच home schooling करण्यात आले. आणि आता त्याची आई (Isabella Pullman) त्याने middle schoolमध्ये(इयत्ता पाचवी) admission घेण्यासाठी आग्रह करते. शाळेत नव्याने admission घेणारा तु एकटाच नसशील. तेव्हा हीच वेळ योग्य आहे. असं पटवून देते. ऑगस्टला शाळेत रुळताना अनेकदा त्यांच्या फिजिकल अपेरिअन्समुळे अनेक लहान-मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. या प्रवासात त्याला समर- जॅकसारखे मित्र भेटतात.. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त ऑगस्टच्याच नाही तर त्याच्या बहिणीच्या- त्याच्या मित्रांच्या दृष्टीकोनातून ह्या कादंबरीचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडत जातात.
वर्षाअखेर निकालाच्या दिवशी ऑगस्टला त्याच्या मेहनतीसाठी, त्याने छोट्या-मोठ्या अडचणींवर मात करत दाखविलेल्या त्याच्या जिद्दीसाठी गोल्ड मेडल मिळते.‌ तेव्हाच्या त्या आनंदाच्या क्षणी देखील ऑगीच्या मनात सुरू असणारे विचार हे आपल्याला विचार करायला भाग पाडतात ..
It’s like people you see sometimes, and you can’t imagine what it would be like to be that person, whether it’s somebody in a wheelchair or somebody who can’t talk. Only, I know that I’m that person to other people, maybe to every single person in that whole auditorium.
To me, though, I’m just me. An ordinary kid.
But hey, if they want to give me a medal for being me, that’s okay. I’ll take it. I didn’t destroy a Death Star or anything like that, but I did just get through the fifth grade. And that’s not easy, even if you’re not me.

शाळेत/चारचौघात वावरताना ऑगीकडे लोक ज्या नजरेने पाहत असतात. त्यावेळी त्याच्या मनामध्ये असंख्य विचार येतात. ते विचार देखील लेखिकेने इतक्या सुंदररीत्या मांडले आहेत कि वाचताना वाचकाच्या मनात ऑगस्टविषयी वाटत असणारी कणव अगदी सहजतेने प्रेमात बदलते. ऑगीच्या जीवनातल्या याच काही प्रसंगांवर या कादंबरीचा संपूर्ण प्लॉट आधारित आहे. जगभरातील विविध एकुण २९भाषांमध्ये अनुवादीत झालेली आणि ५लाख प्रती विकल्या गेलेल्या ह्या कादंबरी‌वर २०१७ साली चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यात ऑगस्टची भुमिका ही जेकब ट्रेंबली (Jacob Tremblay) याने केली आहे.

ही कादंबरी विशेषतः जरी लहान मुलांसाठी म्हणून लिहिलेली असली तरी देखील कुठल्याही वयाची व्यक्ती हे पुस्तक वाचताना या कथानकाच्या प्रेमात पडते. आणि ऑगीच्या या गोष्टीतून वाचकांना जगाकडे सहानुभूतीने बघायला- जगायला शिकवते..
---
Name : Wonder
Author : R. J. Palacio
Genre : Children’s novel
Publisher : Alfred A. Knopf
Pages : 310
Awards : Maine Student Book Award, Vermont’s Dorothy Canfield Fisher Children’s Book Award, Mark Twain Award, Hawaii’s Nene Award, Junior Young Reader’s Choice Award

- Dipti Bhagat
(26/10/2020)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त परिचय!
दिप्ती बऱ्याच दिवसानी लेख टाकलाय! लिहीत राहा!

मला पा मधला अमिताभ च डोळ्या समोर येतोय ऑगस्ट म्हणून>>>
@ए श्रद्धा
पा मधला अमिताभ. अगदी परफेक्ट उदाहरण.. पण फक्त फिजिकल अपेरिअन्ससाठी..
पा मधला ऑरो त्याच्या फिजिकल अपेरिअन्समुळे तितकासा disturb होतं नाही.. तो दाखवताना confident, arrogant दाखवला आहे..
ऑगी तसा नाही. ऑगस्ट हळवा, आणि self conscious आहे.. त्याचा Self acceptance चा प्रवास आपल्यासमोर कथा वाचताना होतो..

@कुमारदा, धन्यवाद Happy
@अज्ञा, नक्कीच.. Happy
@फारएण्ड, धन्यवाद.. Happy