सुखदुःख

भास की खरे ?

Submitted by पुरंदरे शशांक on 25 March, 2019 - 01:17

भास की खरे ?

सगेसोयरे जमले भवती नात्याकरता
दिले घेतले आठवती व्यवहारापुरता

माझे मीपण साठत गेले वर्षे सरता
तुटले सारे त्यातून का हे जोड जोडता

सुखदुःखाची ओझी वाहून थकता कण्हता
स्वार होऊनी माझ्यावर ती गाजवी सत्ता

काय राहते हाती अपुल्या येथून जाता
भास की खरे अवतीभवती विरता विरता

शिल्लक

Submitted by पुरंदरे शशांक on 2 August, 2018 - 08:18

शिल्लक

अलंकारूनी शब्द जमविले
लिहिन म्हटले मनातले
मनात होते नीटनेटके
लिहिताना ते भरकटले

जीवनातली सारी फरफट
शब्दी येता डगमगली
सुखदुःखाची गाणी सगळी
कागदावरी ओघळली

उरले हाती काय पहातो
चमकूनिया डोळे दिपले
क्षण प्रेमाचे जे मोलाचे
स्नेहमाखले लखलखले...

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सुखदुःख