आशा

Submitted by Asu on 31 March, 2020 - 03:08

सध्याच्या करोनाच्या निराशाजनक वातावरणात आशेचा किरण दाखवणारी कविता-
आशा

अंधार आजचा सरेल
उद्या नक्की उजाडेल
सुख काय म्हणतात ते
कधीतरी आम्हां दिसेल
अंधाराची सरेल निशा
एवढीच फक्त आशा

आशा निराशेचा मेळ
ऊन पावसाचा खेळ
कधी कडक उन्हाळा
कधी घन निळा सावळा
गर्जू दे दाही दिशा
एवढीच फक्त आशा

आशेवर माणूस जगतो
निराशेने माणूस मरतो
जगण्याची जरी दुर्दशा
भरकटल्या भवसागरी
आयुष्या मिळो दिशा
एवढीच फक्त आशा

मनी जरी आज निराशा
अंधारल्या दाही दिशा
जनात पेटल्या वाटा
आक्रोश माजला मोठा
तरीही जगण्याची नशा
एवढीच फक्त आशा

- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला ।
यया बद्धाःप्रधावन्ति मुक्तास्तिष्टन्ति पंगुवत् ॥
आशा ही आश्चर्यकारक बेडी आहे., या बेडीमध्ये बद्ध व्यक्ती मुक्त असतो, धावू शकतो. व मुक्त व्यक्ती, पांगळा होउन जातो.