पापणीतल्या स्वप्नांना
आशेची साथ दे..
अंतरीच्या भावनांना
सप्तसुरांचा नाद दे..
आकाशातल्या चांदण्यांना
सुगंधी श्वास दे..
ओंजळीतल्या पाखरांना
भरारीचा ध्यास दे...
इंद्रधनुच्या सतरंगांना
आनंदाची साथ दे..
नादमयी सप्तस्वरांना
मोहक हास्याने दाद दे..
सप्तर्षीच्या त्या तेजाला
निरांजनाची वात दे..
सत्यस्रुष्टीतील स्वप्नांना
मनापासून साद दे.....
एकदा तिने मला माझ्या कवीता वाचावयास मागीतल्या,
मी तिला म्हणालो,
"एका कागदच्या तुकड्यात रुप पहाण्या पेक्षा,
एकदाच आरशात पहाण सोप नाही का?" !!!
तर ती म्हणाली,
"आरशा मध्ये दिसेल ही रुप कदाचीत,
पण ते पहयला तुझे डोळे कोठुन आनु"........
आधी जरा साहेन मी
केव्हातरी सांगेन मी
अंधार जेथे एकटा
तेथे दिवा टांगेन मी
प्रीतीत बाजी हारलो
हारूनही जिंकेन मी
जादू तुझ्या डोळ्यातली
झाली नशा झिंगेन मी
राखेतुनी झालो उभा
आता कसा भंगेन मी
तुषार जोशी, नागपूर