मी मुक्ता

वसंतातला Family day..!

Submitted by मी मुक्ता.. on 14 March, 2011 - 13:19

सृष्टीचं कौतुक जितक करावं तितकं कमीच असं वाटण्याला निसर्ग कायमच नवनविन बहाणे देत असतो मला. दरवर्षी वसंतात फुलून फुलून येणारी आणि भरभरुन वहाणारी फुलझाडं हे त्यातलच एक कारण. शिशिर सरुन गेला की झाडांना फुटणारी पालवी बघण्यात, त्यांचा तो हिरवट कडू गंध अनुभवण्यात, त्या तुकतुकीत कोवळ्या पानांना स्पर्श करुन पहाण्यात महिनाभर आरामात निघुन जातो. पण त्याच वेळी निष्पर्ण होवुन कळ्या मिरवणार्‍या, कुठे कुठे तुरळक फुलू लागलेल्या फुलांच्या तुर्‍यांनी अजुन लक्ष वेधुन घ्यायला सुरुवात केलेली नसते. हा एक्-दिड महिना सरता सरता बर्‍यापैकी पानं पोपटीतून हिरव्या रंगात जायला लागतात.

गुलमोहर: 

वजाबाकी..

Submitted by मी मुक्ता.. on 10 March, 2011 - 00:43

जगात सगळीकडेच अर्धा अधिक अर्धा एक होतो..
तसा प्रत्येक अर्ध्याला शोध असतोच स्वतःच्या पुर्णत्वाचा..
आणि पर्यायाने पुर्णत्वासाठी लागणार्‍या दुसर्‍या अर्ध्याचा..
क्वचितच कोणीतरी पुर्ण एक असतो
आणि आपलं गणित जरा वेगळं ठरलेलं ना..
ठरवलेलं आपण,
आपला एक अधिक एक पण एक..
आणि एक वजा एक पण एकच असेल..
.
.
.
.
.
.
पण वजाबाकीच करायची होती का?

गुलमोहर: 

नॉस्टॅल्जिया.. गुलजार..!

Submitted by मी मुक्ता.. on 6 March, 2011 - 03:35

गुलजार.... नाव ऐकलं की आजही एक क्षण खूप मोठा प्रवास करुन येते मी.. काळजाचा ठोका चुकल्यासारखा वाटतो त्या सगळ्या क्षणांच्या आठवणींनी.. गुलजारविषयी हे असं नक्की कशामुळे वाटतं? "ए जिंदगी गले लगाले.." या त्यांच्या शब्दांचा आधार घेत अनेक कडवट क्षणांनंतर आयुष्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करत राहिले म्हणुन? मनाच्या तळापासुन जीव पिळवटुन प्रेम करावसं वाटलं तेव्हाही त्यांचे अनेक अनेक शब्द मनात घुमत राहिले म्हणुन? "मुस्कुराऊ कभी तो लगता है, जैसे होठोंपे कर्ज रखा है.." या शब्दांचा शब्दश: प्रत्यय घेतला म्हणुन?

गुलमोहर: 

उन्हाळा..!!

Submitted by मी मुक्ता.. on 5 March, 2011 - 06:52

सकाळी रात्री थंडी आणि दिवसभर उकाडा अशा वातावरणातून जेव्हा दिवसभर उकाड्याच्या स्थितीत ॠतू येतो तेव्हा कधी अचानक गाडीवरुन फिरताना / बस मधुन जाताना पांढर्‍या शुभ्र सुगंधाची एक झुळूक अंगावरुन वाहुन जाते.. आणि मनात स्पष्ट स्पष्ट मोगरा उमटुन जातो. सिझन मधली पहिली मोगर्‍याची खरेदी हा माझा एक स्वतंत्र सोहळा असतो. अशी चाहुल लागल्यानंतर लगेचच येणारा वीकेंड यासाठी निवडते मी.. सकाळी सगळं आवरुन बाहेर पडते..

गुलमोहर: 

आपली आई वेगळी असल्याचं जाणवतं तेव्हा..

Submitted by मी मुक्ता.. on 5 March, 2011 - 04:46

"ती गेली तेव्हा.." ऐकुन त्यातल्या अबोध सूरांनी
काळजात अनाहत कळ उठवलेली..
त्यातल्या गाभ्याला हात घालुन तो अलगद माझ्यासमोर
उलगडुन दाखवलेलास तेव्हा..

बाकिच्या बायका साड्या, दागिन्यात रमत होत्या
त्यावेळी समुद्रावरच्या वार्‍यात आणि
डोंगरावरच्या ढगांत स्वतःला हरवत होतीस तेव्हा..

आजुबाजूच्या बायका, एकमेकिंची उणिदुणी
काढण्यात समाधान मानायच्या त्यावेळी
मु़काट बसुन असायचिस आणि अशा या स्वभावामुळे
कळपापासुन वेगळं पडलेलं तुला पाहिलं तेव्हा..

तू नॉस्टॅल्जिक झाल्यावर
सांगितलेल्या आठवणींतून
तू पण माझ्यासारखीच
बंडखोर असल्याचं जाणवलं तेव्हा

गुलमोहर: 

नॉस्टॅल्जिया... सिनेमा सिनेमा..

Submitted by मी मुक्ता.. on 4 March, 2011 - 00:01

असं म्हणतात की आयुष्यात प्रत्येक क्षण युनिक असतो. एकमेव्-अद्वितीय. आणि तो तसाच जगला पाहिजे. तरच आपण प्रत्येक अनुभवाचा परिपूर्ण प्रत्यय घेवु शकतो. पण प्रत्येक क्षणाला हा पण पाळणं अवघड आहे. आणि काही क्षण, काही नावांसाठी तर अशक्य. तसं प्रत्येकच गोष्टीला एक रुप असतं, एक रंग असतो, एक गंध असतो..पण काही नावं येतानाच आपल्यासोबत अनेक रुप, रंग, सुगंधांची गाठोडी घेवुन येतात. आजही कोणताही सिनेमा बघताना मी फक्त तो सिनेमा बघत नसते तर लहाणपणापासून सिनेमासोबत जुळलेल्या, भोगलेल्या सगळ्या आठवणी जगत असते. सिनेमाच्या त्या जगाबरोबरच अजुन एका वेगळ्या आठवणींच्या जगात फिरुन येत असते.

गुलमोहर: 

पत्ता..

Submitted by मी मुक्ता.. on 28 February, 2011 - 10:08

काल कुठल्यातरी रानात
कोकिळेमागे फिरताना,
मला तू पाठवलेला ढग भेटला होता..
तुझा पाऊस घेवुन आलेला..
माझ्यासाठी..
चला..!
शेवटी तुझा पाऊस माझ्याचसाठी होता तर..
मला कित्ती आनंद झाला म्हणुन सांगु..
त्या आनंदात आम्ही खूप गप्पा मारल्या..
काय काय दाखवलं मी त्याला..
माझी फुलपाखरांची शेती,
नुकतच अंकुरु लागलेलं चांदणं..
मावळतीच्या किरणांना अडकवलेला झुला..
खास तुला द्यायला म्हणुन ठेवलेला, पिकुन भोपळ्यासारखा झालेला
पिवळाधम्मक चंद्र...
आणि मग तिथेच त्यातला थोडा पाऊस शिंपुन
आम्ही इंद्रधनुष्य पण बनवलं..
त्याच्यावरच गप्पा मारत बसलेलो आम्ही..
कितीच्या किती वेळ..
त्याला म्हटलं,

गुलमोहर: 

चूक..

Submitted by मी मुक्ता.. on 27 February, 2011 - 05:32

आभाळात चंद्र,
क्षितिजावर लाली,
फुलांच्यात गुलाब
आणि ॠतुंमध्ये वसंत
खरच इतका महत्वाचा असतो का..
की त्यांच्याशिवाय बाकी सगळंच बिनमहत्वाचं ठरावं?
तशी जगत होतेच की मी माझी पोकळी घेवुन..
मग कोणत्या एका क्षणी हसता हसता डोळे भरुन आले..
सुर्यास्त पहाताना माझ्या नजरेतल्या भावनांचं प्रतिबिंब
तुझ्या नजरेत मला दिसलं..
आणि तुझ्या माझ्याही नकळत त्या मनातल्या पोकळीचे दरवाजे
उघडले मी तुझ्यासाठी...
तुला डोकावू दिलं माझ्या खोल आत..
आणि तसंच सामावुनही घेतलं त्यात..
खरं सांगु का,
तू येण्याआधी ती पोकळी इतकी भयानक खरंच नव्हती..
उलट तीच मला सोबत करत होती..
तिच्या भरुन रिकामं होण्याने,

गुलमोहर: 

Legends- Live in concert

Submitted by मी मुक्ता.. on 27 February, 2011 - 01:01

काल माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस होता. ते म्हणतात ना, big day of my life. (अचूक भाव व्यक्त करेल असं मराठी भाषांतर काय आहे याचं? असो..) काल दि. २६ फेब्रु. २०११ पुण्यात संगीत क्षेत्रातील दोन दिग्गज, दोन श्रेष्ठी, उस्ताद झाकिर हुसैन आणि पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा कार्यक्रम होता. गणेश कला क्रिडा मंच. संध्याकाळी ६.३०. माझी अक्षरशः युगानुयुगांची इच्छा होती या दोघांनाही ऐकायची. कारण तालवाद्यात तबला आणि सूरवाद्यात बासरी हे आधीच माझ्या जिव्हाळ्याचे विषय. त्यात या दोन विभुती म्हणजे संगीतक्षेत्रातल्या दंतकथा. एकत्र..

गुलमोहर: 

ठरेन या जगात मी, महान एकदा तरी..

Submitted by मी मुक्ता.. on 23 February, 2011 - 05:36

बघेन र्‍हास कौतुके, गुमान एकदा तरी
ठरेन या जगात मी, महान एकदा तरी..

भले नको लुटू तुझे हजार चांद मजवरी
मिटून टाकु दे तुझ्यात, जान एकदा तरी..

जिथे विजेस लागलाय छंद कोसळायचा
उभे करीन त्या तिथे, मकान एकदा तरी..

करेल कुठवरी तमा, अशीच लोटली युगे
रचेल मूक क्रंदने, तुफान एकदा तरी..

जरी असेल शांत आज सूर या गळ्यातला
भिडेल उंच अंबरास, तान एकदा तरी..

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मी मुक्ता