वजाबाकी..

Submitted by मी मुक्ता.. on 10 March, 2011 - 00:43

जगात सगळीकडेच अर्धा अधिक अर्धा एक होतो..
तसा प्रत्येक अर्ध्याला शोध असतोच स्वतःच्या पुर्णत्वाचा..
आणि पर्यायाने पुर्णत्वासाठी लागणार्‍या दुसर्‍या अर्ध्याचा..
क्वचितच कोणीतरी पुर्ण एक असतो
आणि आपलं गणित जरा वेगळं ठरलेलं ना..
ठरवलेलं आपण,
आपला एक अधिक एक पण एक..
आणि एक वजा एक पण एकच असेल..
.
.
.
.
.
.
पण वजाबाकीच करायची होती का?

गुलमोहर: 

<<तसा प्रत्येक अर्ध्याला शोध असतोच स्वतःच्या पुर्णत्वाचा..
आणि पर्यायाने पुर्णत्वासाठी लागणार्‍या दुसर्‍या अर्ध्याचा..>>

खुपच छान................

श्यामली.. Happy धन्यवाद..

आनंदयात्री, umeshkadamsir .. आभार.. Happy

Harshalc.. Happy

धनेष.. Happy धन्यवाद...

उमेश.. आभार.. Happy अर्रे बापरे.. अजुन बेस्ट ऑफ मी काय आहे हे मलाच समजलं नाहीये पण इतका विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद... Happy

आह !!!! क्या बात !!! श्यामलीला अनुमोदन. मी पण फॅन लिस्ट मध्ये.

छानच रचना..........आवडली......

खरी कविता मज पामराच्या मते शेवटच्या ओळीत आहे!!

पण इतकं भारी वाचायला मिळालंय की आजचा दिवस फार फार छान जाणार!!

प्रिन्सेस नन्तर मी ही आले पन्ख्यान्च्या लिस्ट मध्ये,,,,,,,,,,मस्त जम्लीय्ये कविता!

नेहमी वजाबाकीच कशाल हवीय?.......
कधीतरी बेरीज झाली तर नाही चालणार???

Pages