मी मुक्ता

अ-स्विकार

Submitted by मी मुक्ता.. on 3 September, 2015 - 09:32

रागावलेल्या माणसाने
बुद्धाला दिलेल्या शिव्या,
बुद्धाने स्विकारल्या नाहीत..
आणि कोणतीही न स्विकारलेली भेट
राहते देणार्‍याजवळ...
तसा त्या माणसाचा रागही त्याच्याच जवळ राहिला..
बुद्ध निघून गेला,
नेहमीच्या अफाट स्थितप्रज्ञतेने..
पण त्या माणसाचं काय झालं?
तो कुठे गेला त्याचा राग घेऊन?
त्याच्या मनात केवळ बुद्धासाठी जन्मलेला राग घेऊन?
पुढे जाऊन तो राग त्याने आणखी कोणावर काढला का?
दिल्या का आणखी कोणाला शिव्या?
जे कोणी स्विकारेल त्याला?
पण केवळ बुद्धासाठीच जाणवलेला राग..
आणखी कोणाला देणार तरी कसा?
मग परत कोणावर रागावलाच नाही का तो आयुष्यात कधी?
त्या माणसाचा आणि त्या कथेचा ,

शब्दखुणा: 

बहुत निकले मेरे अरमान लेकिन...

Submitted by मी मुक्ता.. on 16 August, 2015 - 05:42

स्थळः मरीन ड्राईव्ह
वेळः रात्री ११ ते पहाटे कितीही..
सोबतः बेगम अख्तर, अबिदा परवीन, फरिदा खानुम, रेखा भारद्वाज, जगजित सिंग, गुलाम अली खान, गालिब वगैरे..

शब्दखुणा: 

Mi amor...

Submitted by मी मुक्ता.. on 28 July, 2015 - 10:44

"मुद्दते गुजरी तेरी याद भी न आई हमें, और हम भूल गए हो तुझे ऐसा भी नहीं" माहितेय का हा शेर? तुला कुठून माहिती असणार म्हणा, पाषाणहृदयी आहेस तू. पण तुझ्या पाषाणहृदयाला पाझर फुटताना पाहत आलेय मी आठवतंय तेव्हापासून. मला खात्री आहे तुला हे सगळं माहिती असणार, कळत असणार. कसला भारी आहे ना हा शेर.! तसं पहायला गेलं तर तुझी आवर्जुन आठवण काढल्याला काळ लोटला. पण तुला विसरुन गेलेय असंही नाहीये. इतकी तुझ्या अस्तित्वाची माझ्या जगण्यात एकरुप व्हावी. तुझं माझं नातं असंच आहे. आणि माझंही तुझ्यावर असंच प्रेम आहे. प्रेम, कदाचित प्रेम नाही म्हणता येणार. पण प्रेमासारखं काहीतरी...

शब्दखुणा: 

शहर...

Submitted by मी मुक्ता.. on 16 May, 2015 - 08:56

किती भरभर बदलत जातात शहरं..
अनोळखी होत जातात ..
झपाट्याने बदलण्याचा काळच असतो एकेक..
आणि मग नाहीच थोपवता येत आपल्याला काही..
हरवून जातात जुनी आपुलकीची ठिकाणं..
उन्मळून पडतात मुळापासून रुजलेल्या आठवणींचे वृक्ष..
नव्या गर्दीत नाहीसे होतात आपले सरावाचे रस्ते..
आणि जपून ठेवलेल्या खाणाखुणा कधी पडल्या हे तर कळतही नाही..
.
.
बघता बघता बदललं शहर..
अनोळखी झालं..
जिथं कधी काळी माझं अवघं विश्व नांदायचं..
हरवलं..
तुझ्या नजरेतलं माझं शहर..

शब्दखुणा: 

Thank God..! Finally...

Submitted by मी मुक्ता.. on 1 April, 2015 - 04:18

कालच सर्फ ची एक जाहिरात बघण्यात आली. (जाहिरातीचे काही डिटेल्स चुकले असले तर सॉरी. नेट वर मिळत नाहीये मला ती अ‍ॅड..) दोन म्हातार्‍या बायका चहा घेत गप्पा मारत असतात, "आमच्यावेळी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा ६ रुपये पगार होता. आणि आज माझी सून माझ्या मुलापेक्षा जास्त कमवते. किसने सोचा था औरते इतना आगे चली जाएंगी? आजके जमानेमेंही औरत बनने का मजा है.." मागे सून लॅपटॉपवर काम करत असते.

शब्दखुणा: 

स्वप्नबंबाळ...

Submitted by मी मुक्ता.. on 20 March, 2015 - 02:49

तू जाताना वाटलं नव्हतं
इतकी अवाढव्य बनेल तुझ्या नसण्याची पोकळी
माझं सगळं अस्तित्वच मुळापासून ओढून घेऊ पहाणारी..
माझ्या जगण्याच्या सगळ्या वाटा उद्ध्वस्त करणारी..
सगळी स्वप्नं संदर्भहीन झालियेत आता,
वाक्यातून काढून टाकलेल्या अक्षरासारखी..

उरलाय फक्त शक्यतेचा टीचभर परीघ..
आणि त्याबाहेर पसरलेलं अशक्यतेचं अफाट विश्व..
परीघाच्या आत आहे फक्त तुझ्या नसण्याचं सत्यं आणि
माझं केविलवाणं अस्तित्वं..
पोकळीच्या काठाशी कसंबसं तग धरुन उभं राहू पहाणारं..
आणि परीघाबाहेर नजर जाईल तिथवर विखुरलेत,
तुझ्या असण्याचे आभास..
तुझ्या चाहुली, तुझे शब्द
तुझं हास्य, तुझे स्पर्श..

The Expected Virtue Of Excellence...

Submitted by मी मुक्ता.. on 17 February, 2015 - 05:50

Alejandro González Iñárritu ची ओळख २०१० मध्ये झाली तेव्हा त्याचे triology of death चे तिन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्याला पण ३ वर्षे उलटून गेलेली आणि 'Biutiful' अजून प्रदर्शनाच्या वाटेवर होता. म्हणजे त्याचे प्रदर्शित झालेले तिन्ही आणि लगेचच प्रदर्शित झालेला 'Biutiful' बघितल्याला ५ वर्षे झाली. आणि खरं सांगायचं तर आता ते चित्रपट नीटसे आठवतही नाहीत. नक्की काय संवाद होते, नक्की काय मांडणी होती, पार्श्वसंगीत कितपट प्रभावशाली होतं, कोणत्या प्रसंगानंतर कोणता प्रसंग होता, खरंच नीटसं आठवत नाही. काही गोष्टी अंधुक आठवतात.. चित्रपटातील व्यक्तिरेखा, त्यांचे हावभाव, स्थळं, एकूणच कथा, चित्रपटाची संकल्पना..

Dedicated to The God of Small Things...

Submitted by मी मुक्ता.. on 10 February, 2015 - 13:02

कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
पहिल्या पावसाने दरवळावा आसमंत..
वार्‍यासोबत वाहत यावा आंब्याचा सुगंध..
नदीच्या शरीरात खोल घुसत जावेत भोवरे..
इतकं सहज प्रेम नाही होत माणसांच्या जगात..
जातीपातीच्या.. परिस्थितीच्या.. पैशाच्या.. रंगाच्या..
अनेक भिंती आहेत इथे..
आणि काही लक्ष्मणरेषा..
कधीच ओलांडू नयेत अशा..
ओलांडल्या तर जगबुडी होईल अशा..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
प्रेम म्हणजे नक्की काय हे बहुतेकांना माहित नसलं तरीही..
स्वतःच्या स्वतःला लागलेल्या शोधाला कोणी प्रेम मानलं तरीही..
आणि कोणाला सगळ्या व्याख्यांपलीकडे जाऊन प्रेम करता आलं तरीही..

विसर...

Submitted by मी मुक्ता.. on 5 February, 2015 - 02:31

तू म्हणालास तू काही विसरत नाहीस..
काही विसरु शकत नाहीस..
माझ्या चुका.. माझा मूर्खपणा.. माझे खुळे हट्ट.. माझ्या अपेक्षा..
तू विसरु शकत नाहीस आपल्यातले बेसिक फरक..
आणि विसरु शकत नाहीस,
माझा त्रागा.. आपली भांडणं.. माझं रडणं...
पण तुला माहितेय का? तू समजतोस तसं नाहीये..
ठरवलंस तर तू विसरु शकतोस..
विसरलायेस तू...
तुझ्या येण्याने उगवणारी माझी सकाळ..
तुझ्या निद्राधीन चेहर्‍यावर रेंगाळणारी दुपार..
तुझ्या माझ्या गप्पांमध्ये रंगलेला सूर्यास्त..
आणि तुझ्या डोळ्यांत उतरलेली पौर्णिमेची रात्र..
विसरलायेस तू...
आपल्यासोबत प्रवासाला येणारा श्रावण
तुला माझ्यासाठी हळुवार करणारा शिशिर..

शब्दखुणा: 

Buñuel नावाचं स्वप्न...

Submitted by मी मुक्ता.. on 2 February, 2015 - 04:24

They say movie is the most beautiful lie. Then why everyone including the director try so hard to make it realistic? Make it believable? Make it true? People are anyways paying to watch their lies. Then why not to give them the lie in such a way that they will know its a lie? They will know its not real.. Its surreal.. And there are not more surrealistic, more astoundingly amusing films than those of Luis Bunuel's..

Pages

Subscribe to RSS - मी मुक्ता