मी मुक्ता

नुसते आभाळात ढग दाटले म्हणून पावसाळा होत नसतो...

Submitted by मी मुक्ता.. on 6 June, 2013 - 10:17

नुसते आभाळात ढग दाटले म्हणून पावसाळा होत नसतो...
अवचित दाटलेल्या ढगांसोबत,
आपसूक प्रवासाला निघावं लागतं..
अज्ञात वाटेवर..
अनोळखी पक्ष्याचं विरहगीत ऐकताना,
माझ्या डोळ्यात जमलेले ढग,
नाहीसे व्हावे लागतात,
तुझ्या आश्वासक स्मितहास्याने...
तेव्हा पावसाळा होतो...
नुसते आभाळात ढग दाटले म्हणून पावसाळा होत नसतो...

नुसती वीज चमकली म्हणून पावसाळा होत नसतो...
भन्नाट वादळाशी टक्कर घ्यावी लागते..
घाटमाथ्यावर नेमाने चक्कर टाकावी लागते..
वैतागवाण्या ट्रॅफिक जॅममध्ये गाणी म्हणावी लागतात..
दिवसभर पावसाच्या कौतुकानंतर पुन्हा रात्री गोंजाराव्या लागतात..
हातात हात घेताना तेव्हा,

शब्दखुणा: 

झाड

Submitted by मी मुक्ता.. on 27 May, 2013 - 10:45

एक होतं अरण्य. त्या अरण्यात एक झाड होतं.. खरंतर फुलझाड... इतरांपेक्षा सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलं येणारं.. ऋतूचक्राच्या अखंड चाललेल्या प्रवासात टप्याटप्याला फुलांनी मोहरणारं.. बहराच्या ऋतूची वाट बघणारं.. बहराची कारणं शोधणारं.. आसुसून बहरणारं..
दरवर्षी पाऊस पडायचा.. मग शरदाचं चांदणं न्हाऊ घालायचं.. शिशिर यायचा पानगळ घेऊन.. आणि वसंताच्या चाहुलीबरोबरच झाड भरुन जायचं फुलांनी.. त्याच्या खास सुंदर, सुगंधी, रंगीबेरंगी फुलांनी.. हळू हळू गळून जायची सगळी पानं.. उरायची ती फक्त फुलंच.. अशा वेळी झाडाचा रुबाब बघण्यासारखा असायचा.. समाधानाने अजूनच फुलून यायचं झाडाचं मन अशा वेळी..

शब्दखुणा: 

एका वेदनेची गोष्ट...

Submitted by मी मुक्ता.. on 8 April, 2013 - 05:53

तशी ती पहिल्यापासूनच हळवी.. बर्‍यापैकी स्वतःत राहणारी, तरी संवेदनशील.. नक्की कधी हे नाही सांगता येणार पण खूप आधीची आठवण म्हणजे हृदयनाथांचे आर्त स्वर लेवून भेटायला आलेल्या ग्रेसच्या गहिर्‍या निळ्या दु:खाची.. प्रेमातच पडली ती त्या वेदनेच्या.. जसजसे वय, समज आणि जाणिवा वाढत गेल्या तसतसे ह्या दु:खाच्या वाटेवरचे इतर प्रवासीही सोबती झाले.. साहिरचं चिरविरहाचं दु:ख, गुलजा़रचं चंद्रमौळी दु:ख, गुर्टूबाईंचं ते असं आर्त स्वरात "कदर न जाने मोरा सैया" म्हणणं, गुलाम अलींचं मनाचा तळ ढवळणारं "चुपके चुपके..", आमोणकरांची भैरवी, मेहदी हसनने गायलेला मिर्झा गालि़ब..

शब्दखुणा: 

गुरुत्वाकर्षण...

Submitted by मी मुक्ता.. on 3 April, 2013 - 02:03

तुझ्यापासून वेगळं झाल्यावर,
या अनंत असीम अवकाशात,
आत्ता कुठे मला मिळू लागलाय,
माझा वेग, माझा केंद्रबिंदू, माझी कक्षा...
आता एक ठरवून घेऊ,
तू तुझ्या केंद्रकाभोवती आणि मी माझ्या केंद्रकाभोवती,
आपापल्या कक्षेत फिरत राहू,
एकमेकांचे मार्ग न छेदता..
तरच माझं भ्रमण पूर्ण होऊ शकेल,
कसंय ना,
तुझं गुरुत्वाकर्षण आहेच इतकं जबरदस्त की,
माझी कक्षा मी जरा जरी सोडली,
तर पुन्हा तुझ्यात कोसळण्याखेरीज,
पर्याय नाही राहणार मला....

शब्दखुणा: 

ते दोघे...

Submitted by मी मुक्ता.. on 2 April, 2013 - 03:24

ते दोघे खू..प्प काळाने भेटतात..
अमका तमका, अमकी तमकीच्या गप्पा होतात..
जुन्या कविता, जुनेच किस्से..
मग काय काय नवीन चाललयं याची उजळणी करतात..
नव्या कविता, नवे किस्से...
बोलता बोलता, 'everything changes'
आणि 'some things never change' या जुन्याच वादालाही पोचतात..
विषय कुठे चाललाय हे कळून मग शांत होतात...

ते दोघे खूप काळाने भेटतात..
समोरचा नक्की किती बदललाय,
हे शब्दांशब्दांतून चाचपडत राहतात..
आपण कितीही बदललो तरी आपल्या आतल्या,
कधीच न बदलणार्‍या कशापर्यंत तरी उतरतात..
मग ओरखडे इतक्या आतही उमटल्याचं पाहून खिन्नपण होतात...

ते दोघे खूप काळाने भेटतात..

शब्दखुणा: 

धडपड..

Submitted by मी मुक्ता.. on 22 January, 2013 - 00:37

माझ्या उदासीला 'तुझ्या नसण्याचं' लेबल लावण्याचे
सोयिस्कर दिवस केव्हाच मागे पडलेत..
अनादी अनंत पसरलेल्या अंधारात उगवावा प्रकाशाचा किरण,
आणि मग तो च काय ते सत्य बनून जावा..
तसा 'एकटेपणा' झळाळलाय,
कारणांच्या पसार्‍यातून..

कुठं काही खुट्ट् झालं की अंधारात लपायची सवय झालेली मनाला..
एखादं सोयिस्कर कारण गुरफटून घेऊन..
आता ह्या झळाळलेपणाला कुठं लपवावं?
'आणखी एक कारण' या कॅटेगिरीत ते बसत नाही..
आणि त्याला जिथे नेऊ तिथल्या कारणांचा फोलपणा याच्या प्रकाशात लपत नाही..

शब्दखुणा: 

PIFF 2013 - Movie reviews in short..

Submitted by मी मुक्ता.. on 17 January, 2013 - 07:01

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही आलेला स्पेशल वीक. थंडीसोबत लागणारे वेध आणि येणारं स्पेशल फिलींग. रोज सकाळी उठून उत्साहाने हव्याहव्याश्या काळोखात शिरायचं जिथे एक पूर्णतं अनोळखी जग माझ्यासाठी उभं असायचं.. दर वर्षी वाटतं की हे कधी संपूच नये आणि मग तरी ते एक दिवस संपतं.. ह्म्म.. असो..

नेहमीप्रमाणेच या वर्षीचे काही प्रयोग फसले काही यशस्वी झाले. त्या सगळ्याच म्हणजे या वर्षीच्या पिफमध्ये पाहिलेल्या चित्रपटांचा हा थोडक्यात रीव्हू..

Kamr Palm (kaf elqamar) - Egypt

विषय: 
शब्दखुणा: 

समजूतदारपणा..

Submitted by मी मुक्ता.. on 13 January, 2013 - 23:34

काय झालं..? ....... काही कळत नाहीये...
काही भांडण वगैरे?..... नाही नाही.. किती सारखे होतो (म्हणजे आहोत) आपण ..
काही गैरसमज? .... गैरसमज.. आणि आपल्यात? शक्यच नाहीये..
मग आठवणच यायची बंद झाली का?.. तसंही नाही. रोज नाही पण बरेचदा येतच असते की आठवण..
मग इंटरेस्ट च कमी झाला नाही?... तसं काही झालं असतं तर कशाला एकमेकांना इतक्यांदा साद घातली असती?
मग नक्की झालं तरी काय?
तेच तर कळत नाहीये ना..
आपण कायमच खूप समजून घेतलं ना एकमेकांना?
कधी मी साद घातली तर तू व्यस्त..
कधी तुझ्या हाकेला नेमकी मी व्यस्त..
तरी कधी राग नाही आला..
"काहीतरी महत्वाचं काम असल्याशिवाय तू असं करणार नाहीस.."

शब्दखुणा: 

काळोखाची गाणी

Submitted by मी मुक्ता.. on 10 January, 2013 - 06:17

पुन्हा नव्याने मुकाट झाली,
आयुष्याची वाणी..
नाते उरले, विरली त्यातील,
तुझी नि माझी गाणी...

मुक्या मुखाने कथा वदावी,
ऐकायाला बहिरे..
तरी चालली गोष्ट निरंतर,
थांबत नाही कोणी...

छाती फुटून यावी असले,
दु:ख दाटूनी आले..
पण अश्रूंचे भासच डोळा,
झरले नाही पाणी...

सांजभयाची किनार सुंदर,
नकळत भुलवी प्राणा..
सांजभयाचा पदर विखारी,
साकळलेला नयनी...

कोसळला मग चंद्र नभातून,
तारे विझता विझता..
आभाळाच्या भाळी आता,
काळोखाची गाणी...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मी मुक्ता