पत्ता..

Submitted by मी मुक्ता.. on 28 February, 2011 - 10:08

काल कुठल्यातरी रानात
कोकिळेमागे फिरताना,
मला तू पाठवलेला ढग भेटला होता..
तुझा पाऊस घेवुन आलेला..
माझ्यासाठी..
चला..!
शेवटी तुझा पाऊस माझ्याचसाठी होता तर..
मला कित्ती आनंद झाला म्हणुन सांगु..
त्या आनंदात आम्ही खूप गप्पा मारल्या..
काय काय दाखवलं मी त्याला..
माझी फुलपाखरांची शेती,
नुकतच अंकुरु लागलेलं चांदणं..
मावळतीच्या किरणांना अडकवलेला झुला..
खास तुला द्यायला म्हणुन ठेवलेला, पिकुन भोपळ्यासारखा झालेला
पिवळाधम्मक चंद्र...
आणि मग तिथेच त्यातला थोडा पाऊस शिंपुन
आम्ही इंद्रधनुष्य पण बनवलं..
त्याच्यावरच गप्पा मारत बसलेलो आम्ही..
कितीच्या किती वेळ..
त्याला म्हटलं,
"ए, सांग ना.. काय काय बोलतो तो माझ्याबद्दल?"
तोही रंगात येवुन बरसु लागला,
मीही तल्लीन होवुन भिजू लागले..
तुझ्या आठवणी सांगु लागले..
आणि अशाच गप्पा रंगात आलेल्या असताना
अचानकच काहीतरी चमकल्यासारखा निघुन गेला तोंड फिरवुन..
ह्म्म...
तरी नशीब! आम्ही सगळा पाऊस संपवला नव्हता..
तुझा ढग म्हणे पत्ता चुकला होता..

गुलमोहर: 

पुन्हा एकदा सही लिहिलय......

पण नेहमीच पत्ते का चुकतायत???? Sad त्याला तुझ्या कविता ऐकवल्या नव्हत्यास का???

आठवणी व्यक्त करण्याची वेगळी पद्धत चांगली वाटली
पण,
“मला तू पाठवलेला ढग भेटला होता..”
“तुझा ढग म्हणे पत्ता चुकला होता”

या दोन ओळींमधल्या विरोधाभासाचं कारण लक्षात आलं नाही.

UlhasBhide,
Happy तू पाठवलेला ढग मला भेटला होता आणि शेवटी गप्पांमध्ये मला कळालं की तो माझ्यासाठी नव्हताच मुळी.. तो चुकून मला भेटला होता. तो दुसर्‍याच कोणासाठी तरी होता. पण 'तू' माझ्या ओळखीचा, माझा मित्र म्हणुन मला वाटलं की तो माझ्यासाठीच पाठवलायेस तू. असा अर्थ आहे.

भुंगा,
Happy

प्राजु, श्यामली, अमित,
खूप खूप आभार.. Happy

मुक्ता, पुन्हा एकदा वेगळीच पण प्रभावी मांडणी.. मस्तच!

तरी नशीब! आम्ही सगळा पाऊस संपवला नव्हता..
तुझा ढग म्हणे पत्ता चुकला होता..

क्या बात है!

तुझं नांव दिसलं की आम्ही मात्र वाचायचं चुकत नाही. Happy
आणि हो.. हे आपल्या आवडत्या १० त.

आवडली. इस्टाईल छानच आहे कविता लिहीण्याची. Happy
मला ते परिकथेप्रमाणे केलेले कल्पना विलास खुप आवडले.

>>काय काय दाखवलं मी त्याला..
माझी फुलपाखरांची शेती,
नुकतच अंकुरु लागलेलं चांदणं..
मावळतीच्या किरणांना अडकवलेला झुला..
खास तुला द्यायला म्हणुन ठेवलेला, पिकुन भोपळ्यासारखा झालेला
पिवळाधम्मक चंद्र...
आणि मग तिथेच त्यातला थोडा पाऊस शिंपुन
आम्ही इंद्रधनुष्य पण बनवलं..
त्याच्यावरच गप्पा मारत बसलेलो आम्ही..
कितीच्या किती वेळ..
त्याला म्हटलं, >>

छान

शेवट वेगळे वळण घेणार आहे हा अंदाज येऊनही-
थक्क झालो!
खरच का नाही कविता वाचायला दिल्या _किमान ढगाला_'पत्ता चुकलो' म्हणण्यापूर्वी ?
तो नाही पण ढग तरी लाजला असता ना !
आणि हो IT चे पण नुकसान नसेल झालेले Happy
रामकुमार