"ती गेली तेव्हा.." ऐकुन त्यातल्या अबोध सूरांनी
काळजात अनाहत कळ उठवलेली..
त्यातल्या गाभ्याला हात घालुन तो अलगद माझ्यासमोर
उलगडुन दाखवलेलास तेव्हा..
बाकिच्या बायका साड्या, दागिन्यात रमत होत्या
त्यावेळी समुद्रावरच्या वार्यात आणि
डोंगरावरच्या ढगांत स्वतःला हरवत होतीस तेव्हा..
आजुबाजूच्या बायका, एकमेकिंची उणिदुणी
काढण्यात समाधान मानायच्या त्यावेळी
मु़काट बसुन असायचिस आणि अशा या स्वभावामुळे
कळपापासुन वेगळं पडलेलं तुला पाहिलं तेव्हा..
तू नॉस्टॅल्जिक झाल्यावर
सांगितलेल्या आठवणींतून
तू पण माझ्यासारखीच
बंडखोर असल्याचं जाणवलं तेव्हा
पुलंच्या विनोदाला, कुसुमाग्रजांच्या शब्दाला
आणि गुलाम अलींच्या सूराला
त्याच उत्कटतेने तुला दाद देताना
अनुभवलं तेव्हा...
........
आपली आई वेगळी असल्याचं जाणवतं तेव्हा..
हल्ली हल्ली स्वतःचं म्हणुन निर्माण केलेलं कस्पटासमान अस्तित्व
मिटवुन टाकुन फक्त आईची मुलगी बनुन जावसं वाटतं..
किंवा,
कधीच स्वतःचं अस्तित्व न मिळू शकलेल्या
एका मुलीची आई...!!!
कवितेचा आशय व्यवस्थित
कवितेचा आशय व्यवस्थित मांडलाय.
पण कविता फारच personal विषयावरची वाटली.
प्रांजळ मतप्रदर्शनाबद्दल क्षमस्व !
अतिशय सुंदर कविता... पण कविता
अतिशय सुंदर कविता...
पण कविता फारच personal विषयावरची वाटली.
मला तर सगळ्या कविता personal वाटतात. लिहिताना कवीचा personal अनुभव आणि वाचताना माझा personal अनुभव त्याच्याशी रिलेट होणं.. मला कवितेतले फारसे कळत नाही पण जेव्हा असे काही रिलेट होते तेव्हा मला ती कविता आवडतेय असे वाटायला लागते.
आणि फक्त एकाच व्यक्तीला आईबद्दल असे वाटतेय हे कशावरुन? ब-याच जणांना वाटत असेल ना त्यांच्या आईबद्दल असे काहीतरी?
मी मुक्ता, कविता खूप आवडली.
मी मुक्ता,
कविता खूप आवडली. आई विषय हा माझा वीक पॉइंट आहे. आई हे असं व्यक्तीमत्व आहे की जवढं लिहावं तेवढं कमीच आहे. कविता वयक्तिक नसावी असा संकेत नाही. मी तर म्हणेन वैयक्तीक असल्यास त्यात जास्त उठावदारपणा येतो. अर्थात हा आपापला दृष्टीकोण असतो.
मस्त आणी अभिनंदन
सर्वांचे खूप आभार..
सर्वांचे खूप आभार..
the more u write
the more u write personal,
the more u become universal!
इथे मनातील भावना व्यक्त होणेच अपेक्षित आहे
हम यहां आते है कलेजा निचोडने को
दर्द तैय्यार नही खाके कब्र छोडने को!
(इति-अस्मादिक)
आई ही एक दैवी अनुभूतीच असते
आणि ती कशीही असली तरी वेगळीच जाणवते!
कविता आवडली हे सांगणे न लगे!
रामकुमार
आवडली.
आवडली.
रामकुमार, अगदी अगदी.. The
रामकुमार,
अगदी अगदी.. The more you become personal the more it becomes universal..
आणि त्याहीपेक्षा म्हणजे, या जगात इतके सारे अनुभव, भावना, सुखं, दु:ख आहेत की त्यामानाने आपल्या भावनांचा, अनुभवांचा परिघ फारच मर्यादित असतो. त्यामुळेच आपण जेव्हा स्मिता पाटीलचे किंवा बर्गमन चे अतिशय वेगळ्या जगातील चित्रपट पाहतो तेव्हा आपल्याला अत्यंत अपरिचित अशा त्या जगातील अनूभुतींचा अनुभव स्वतंत्र कलाकृती म्हणुन घेतो. आणि तरीदेखिल त्या आपल्याला तितक्याच भिडतात.

अर्थात जेव्हा आपण कलाकृतींशी स्वतःला रिलेट करु शकतो तेव्हा त्या आपल्या आयुष्याचा भाग होतात, एक वेगळा आनंद देतात हा भागही तितकाच महत्वाचा..
प्रतिसादाबद्दल आभार..
धन्यवाद शूम्पी...
इथे मनातील भावना व्यक्त होणेच
इथे मनातील भावना व्यक्त होणेच अपेक्षित आहे>> सहमत..
कविता झक्कास वाटली.....
सोपी आणि थेट.. आवडली...
सोपी आणि थेट.. आवडली...
धन्यवाद रोहण, धनेष..
धन्यवाद रोहण, धनेष..
मस्त... आवडली.
मस्त... आवडली.
आभार रोहित..
आभार रोहित..
आशय मांडलाय आईच्या वर्णनाला
आशय मांडलाय आईच्या वर्णनाला साजेसा. पण आईची महती वर्णन करतांनाची वरील उदाहरणे तेवढी ताकदीची नाही वाटली. उल्हासजींनी म्हटल्याप्रमाणे पर्सनल.
पुलंच्या विनोदाला, कुसुमाग्रजांच्या शब्दाला
आणि गुलाम अलींच्या सूराला
त्याच उत्कटतेने तुला दाद देताना
अनुभवलं तेव्हा...>>>>>
आधीच्या ओळींपासून हा भाग एकदम फारकत घेउन पेस्ट केल्यासारखा वाटला.
आणि शेवट असा का हे मला नाही कळले. इन सस्पेन्शन ऑफ कन्फ्यूजन.
क्षमस्व. पु.ले.शु.
मुक्ता, प्रचंड आवडली ही
मुक्ता, प्रचंड आवडली ही कविता... विशेषतः या ओळी मन सुन्न करुन गेल्या....>>>>
आजुबाजूच्या बायका, एकमेकिंची उणिदुणी
काढण्यात समाधान मानायच्या त्यावेळी
मु़काट बसुन असायचिस आणि अशा या स्वभावामुळे
कळपापासुन वेगळं पडलेलं तुला पाहिलं तेव्हा..
साहित्याच्या इतर forms मध्ये
साहित्याच्या इतर forms मध्ये रचनाकार तेवढा दिसत नाही जितका कवी कवितेत दिसतो.
काही forms मध्ये तर तो लुडबुडु नये अशी अपेक्षा केली जाते.
संकेतस्थळावरील भटसाहेबांचे विचार देत आहे.
मला वाटते ते इथे अप्रस्तुत ठरणार नाहीत.
"लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते."
धन्यवाद सानी...
धन्यवाद सानी... ह्म्म...
उमेशजी, मेल केलाय.. प्रतिसादाबद्दल आभार.
रामकुमार..
छान कविता.
छान कविता.
उत्तम! अकृत्रिमता आवडली
उत्तम! अकृत्रिमता आवडली कवितेतली! शेवटाला तर अजून उंचावर जाते!
गिरीराज, मुटेजी, खूप आभार..
गिरीराज, मुटेजी,
खूप आभार.. 
धन्यवाद मुक्ता. चु भु दे घे.
धन्यवाद मुक्ता. चु भु दे घे.
वाह!!!! अगदी नेमकेपणानं
वाह!!!!
अगदी नेमकेपणानं मांडलंत!!
हल्ली हल्ली स्वतःचं म्हणुन
हल्ली हल्ली स्वतःचं म्हणुन निर्माण केलेलं कस्पटासमान अस्तित्व
मिटवुन टाकुन फक्त आईची मुलगी बनुन जावसं वाटतं..
किंवा,
कधीच स्वतःचं अस्तित्व न मिळू शकलेल्या
एका मुलीची आई...!!!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
आवडली म्हणन्यापेक्षा मी भावली म्हणेल.
खुप टचिन्ग वाट्ली!
खुप टचिन्ग वाट्ली! पु.ले.शु........
........अॅना
सर्वांचे खूप खूप आभार..
सर्वांचे खूप खूप आभार..
खुपच छान कविता आहे. आईची महती
खुपच छान कविता आहे. आईची महती नविनच शब्दात व्यक्त केलीत.