आपली आई वेगळी असल्याचं जाणवत तेव्हा

आपली आई वेगळी असल्याचं जाणवतं तेव्हा..

Submitted by मी मुक्ता.. on 5 March, 2011 - 04:46

"ती गेली तेव्हा.." ऐकुन त्यातल्या अबोध सूरांनी
काळजात अनाहत कळ उठवलेली..
त्यातल्या गाभ्याला हात घालुन तो अलगद माझ्यासमोर
उलगडुन दाखवलेलास तेव्हा..

बाकिच्या बायका साड्या, दागिन्यात रमत होत्या
त्यावेळी समुद्रावरच्या वार्‍यात आणि
डोंगरावरच्या ढगांत स्वतःला हरवत होतीस तेव्हा..

आजुबाजूच्या बायका, एकमेकिंची उणिदुणी
काढण्यात समाधान मानायच्या त्यावेळी
मु़काट बसुन असायचिस आणि अशा या स्वभावामुळे
कळपापासुन वेगळं पडलेलं तुला पाहिलं तेव्हा..

तू नॉस्टॅल्जिक झाल्यावर
सांगितलेल्या आठवणींतून
तू पण माझ्यासारखीच
बंडखोर असल्याचं जाणवलं तेव्हा

गुलमोहर: 
Subscribe to RSS - आपली आई वेगळी असल्याचं जाणवत तेव्हा