कसे हे सांगायचे न बोलताही आता
वाटते हळवे काही न पाहताही तुला
अलवार हे वारे कसे सांगते गुज काय
धुंद गंध अजूनही का भासते मज रात
तू पाहशी नभी तेच का जे माझ्या मनी
कधीच्या खुणा अवतरल्या या नभांगणी
सांगतील का तुज, जे हुरहुरे माझ्या उरी
तुलाही गाठतील का नक्षत्रांच्या आठवणी
नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ सर्वांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित विशेष दिनाचीच ओळख करून देत आहे.
…
आठवणी
अचानक आले बोलावणे, सत्वर निघोणी येणे
नुकताच तर आलो होतो, ओली हळद निरखीत होतो
खाल्ले चार घास वसावसा, घेतला निरोप कसाबसा
हातातुनी हात सुटेना, नजरेतुनी नजर हटेना
पोहचताच रणांगणी, झडल्या स्वागताला फैरी
जोडिला तोफगोळे, ज्वालांनी आकाश लाल पिवळे
विसरुनी नातीगोती, सुसाट सुटलो वेगाने
निर्दय मारेकरी झालो मी पेश्याने
काळवेळेचे भान न उरले, माहीत नाही किती सरले
रक्त लांच्छित कोसळलो धरणी, काळजात सगींनी की आठवणी
राजेंद्र देवी
तु प्रेम करावस माझ्यावर... असंही काही नाही
तु हवीस आयुष्यात माझ्या... असंही काही नाही
आठवणी कवटाळून हसता येणार नाही कदाचित
म्हणुन रडेनच आयुष्यभर... असंही काही नाही
समुद्राच्या लाटांशी सुर बरे जुळतात माझे
मिळेलच गलबता किनारा... असंही काही नाही
मिळेल मकरंद अमाप त्याला प्रत्येक फुलावर
आवडेलच प्रत्येक फुल... असंही काही नाही
दुःखाशी जरा कमी गाठभेट होते
दिमतीला सुखच... असंही काही नाही
हल्ली हल्ली आठवण तुझी येईनाशी झालीये
म्हणुन विसरेनच मी तुला... असंही काही नाही
माणूस हा मुलत: गप्पिष्ट प्राणी आहे. गप्पा मारायला त्याला फार आवडते. दोन गोष्टीवेल्हाळ माणसे भेटली, की मग त्यांना स्थळ काळाचेही भान राहत नाही. एकातून दुसरा... दुसऱ्यातून तिसरा असे लडी लागल्यासारखे विषय निघत जातात.
गप्पा वाफाळत्या चहाबरोबर रंगतात, गप्पा गरमागरम पोह्यांसोबत रंगतात, तश्या त्या भरल्या पानावरही रंगतात अन गावच्या पारावरही रंगतात.
मायबोली हा तर आपल्या सगळ्यांचा हक्काचा अड्डा.
इथे अनेक धागे, अनेक पाने केवळ गप्पांना वाहिलेली आहेत.
राहुन गेले..
तुझ्यासवे अवखळ
बालपणीचे ते क्षण
पुन्हा एकदा
वेचायचे होते
ते क्षण वेचणे
राहुन गेले
तुझे जीवनगीत
ऐकत तुझ्या
कुशीत रातभर
जागायचे होते
ते जागणे आता
राहुन गेले
तु शिकवलेस
मज चालावयास
तुला आधारासाठी
हात देणे राहुन गेले
तुझ्याकडुन अजुन
जगरहाटीचे नियम
शिकायचे होते
पण ते नियम
शिकणे राहुन गेले
खूप लहानपणीची एक घटना आठवते. ती एक अतिशय उदासवाणी सकाळ होती. पावसाळा नव्हता. तरीही वातावरण कुंद. ढगाळलेले. जाग आली तीच बाहेर सुरु असलेल्या कसल्याश्या गोंधळ आणि गलक्यामुळेच. उठून पाहिले. घरातल्या व शेजारपाजारच्या मोठ्या माणसांच्या चेहऱ्यांवर धक्का बसल्याचे काळजीचे भाव होते. सगळेजण गंभीरपणे कसलीशी कुजबुज आणि चर्चा करत होते. त्याचवेळी रेडीओवर लता मंगेशकरांचे ते 'गाईड' मधले गाणे लागले होते "काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल. कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला, आज फिर जीने की तमन्ना है. आज फिर मरने का इरादा है". तसाच बाहेर आलो.
आठवणी तुझे.....
हवीहवीशी वाटणारी !
ह्रदयात प्रेम भरनारी....
प्रेमाने हाक मारणारी!
नजरेने बोलणारी....
समजे पर्यंत सांगणारी!
मनातल्या मनात हसनारी.....
मन मोकळ्या पणाने बोलनारी.....
माझे आठवण जपणारी
माझं ह्रदयात राहणारी!....
फक्त तुच आहेस गं......
आठवणींचा ठेवा अन विचारांची शिदोरी
आठवणींचा ठेवा अन विचारांची शिदोरी
(मागे लिहिलेल्या लेखाचाच हा एक भाग आहे.त्यामुळे तीच तीच नावे येतील लेखात. सर्व लेखाचे तुकड्या तुकड्यात टाकले तर आठ दहा भाग होतील सहज. 'मैत्र' नावाने काही भाग येथे टाकतो आहे.)