"असंही काही नाही"

Submitted by मी_अनामिक on 6 October, 2019 - 10:18

तु प्रेम करावस माझ्यावर... असंही काही नाही
तु हवीस आयुष्यात माझ्या... असंही काही नाही

आठवणी कवटाळून हसता येणार नाही कदाचित
म्हणुन रडेनच आयुष्यभर... असंही काही नाही

समुद्राच्या लाटांशी सुर बरे जुळतात माझे
मिळेलच गलबता किनारा... असंही काही नाही

मिळेल मकरंद अमाप त्याला प्रत्येक फुलावर
आवडेलच प्रत्येक फुल... असंही काही नाही

दुःखाशी जरा कमी गाठभेट होते
दिमतीला सुखच... असंही काही नाही

हल्ली हल्ली आठवण तुझी येईनाशी झालीये
म्हणुन विसरेनच मी तुला... असंही काही नाही

कुणीही ओळखावं इतकं नाव नाही माझं
म्हणुन 'अनामिक' मी... असंही काही नाही

गझल लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न असुन तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. टिकांचही स्वागत आहे...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खुप सुंदर! आवडली.. Happy
(मला गजलेविषयी तितकीशी तांत्रिक माहीती नाही.)

सगळे शेर आवडले. मलाही गजल लिहिण्यातली तांत्रिक माहिती नाही. ते ‘सुर’ ऐवजी ‘सूर’ केलं आणि ’तु’ ऐवजी ‘तू’ केलं तर बसेल का मात्रेत?
पुलेशु!