नक्षत्रांच्या आठवणी

Submitted by _तृप्ती_ on 24 June, 2020 - 08:08

कसे हे सांगायचे न बोलताही आता
वाटते हळवे काही न पाहताही तुला
अलवार हे वारे कसे सांगते गुज काय
धुंद गंध अजूनही का भासते मज रात

तू पाहशी नभी तेच का जे माझ्या मनी
कधीच्या खुणा अवतरल्या या नभांगणी
सांगतील का तुज, जे हुरहुरे माझ्या उरी
तुलाही गाठतील का नक्षत्रांच्या आठवणी

Group content visibility: 
Use group defaults