लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
Kitchen कट्टा/ओटा / शेगडी
माझा Kitchen कट्टा/ओटा / शेगडी spotlessly clean हवा.
(बाकी घर कसंही असू देत. )
(दुसऱ्यांच्या स्वयंपाक घरात जाऊन ओटा judge करत नाही )
चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.+१११
तुझा पगार किती? हा प्रश्न डोक्यात जातो.
आपली / दुसऱ्यांची वैयक्तिक माहिती त्यांचा consent न घेता न विचारता गावभर सांगणारी लोकं. थोडंफार gossip ठीक आहे, एका व्यक्तीजवळ मन मोकळं केलं वगैरे. पण गावगप्पा करणारी लोकं जवळून पाहिली आहेत. नावासहित त्या वक्तीला point out करून gossip पसरवणारी जमात.
मस्त गं किल्ली. मी याबाबतीत
>>>>>>>>>Kitchen कट्टा/ओटा / शेगडी spotlessly clean हवा.
मस्त गं किल्ली. मी याबाबतीत फेल आहे.
>>>>>>तुझा पगार किती? हा प्रश्न डोक्यात जातो
असं विचारतात? बाप रे किती नाकखुपसेपणा.
>>>>>दुसऱ्यांच्या स्वयंपाक घरात जाऊन ओटा judge करत नाही
हाहाहा अगं पण पेट पीव्हज दुसर्यांच्या संदर्भातच असतात आणि हो मनातल्या मनात न आवडणार्याच म्हणजे जजमेन्टलच
सार्वजनिक ठिकाणी किंवा
सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासात मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी लावून ठेवणारी माणसे.
>>>>>>सार्वजनिक ठिकाणी किंवा
>>>>>>सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासात मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी लावून ठेवणारी माणसे.
टोटली!!! आमच्या लाँग आयलंडमध्ये बसमध्ये कोणी ना कोणी मोठ्यांदी स्पीकरवरती संभाषण करतच असतं. आणि ते अलाऊड आहे. विस्कॉनसिनच्या लहान गावात त्यावरती बंदी होती. ते एक बरं होतं.
सामो, माझा ओटा judge करते.
सामो, माझा ओटा judge करते. कधी कधी वेळे अभावी राहून जातं. मग चिडचिड होते.
नवरा मला सांगून थकलाय की
>>>>>>कधी कधी वेळे अभावी राहून जातं
नवरा मला सांगून थकलाय की रात्री ओटा साफ करत जा, झुरळं फिरतात. पण मी नेहमी विसरते, अगं खरच विसरते कारण स्वयंपाक झाला की सगळं गरम असतं आणि मी म्हणते थंड झाले की करु आणि मग ब्राऊझिंग वगैरेत विसरुनच जाते मग तोच करतो पण मग सकाळी बोलणी बसतात आणि ते मला पटते. ओटा स्वच्छ न ठेवणं चांगले नाही ते.
फोटो क्युट आहे सामो.
फोटो क्युट आहे सामो.
डोक्यात जाणाऱ्या बाबी खूप आहेत.आठवून सांगते.
1. सध्या एक कलीग आहे ज्युनिअर.प्रत्येक वाक्यानंतर बोलताना आणि टिम्स मध्ये वाक्याच्या शेवटी माझं नाव जोडतोच.
म्हणजे कल्पना करून बघा, तुमचं नाव क्ष असेल.
"हॅलो क्ष."
"मला ते समजावून सांगा क्ष."
"मी ते काम केलं नाही कारण तू पाठवलेली झिप फाईल डाउनलोड झाली नाही क्ष."
"मला हे काम आवडलंय क्ष.
"पण मी कोणतंही प्रॉमिस करणार नाही क्ष."
"माझ्याकडून कोणत्याही आउटपुट ची अपेक्षा करू नकोस क्ष.मी अजून एक काम करतोय क्ष"
हे सर्व एका संभाषणात.त्याला सांगावंसं वाटतं की अरे बाबा तू एका माणसाशी चॅट करतोयस, एकाच माणसाचा नंबर घेऊन फोन करतो आहेस.त्या माणसाला माहीत आहे तू त्याला उद्देशुनच बोलशील.प्रत्येक वाक्याच्या शेवटी नाव घ्यायची गरज नाही.
>>>>फोटो क्युट आहे सामो.
>>>>फोटो क्युट आहे सामो.
धन्यवाद ६ वर्षांपूर्वीचा.
>>>>>>>प्रत्येक वाक्याच्या शेवटी नाव घ्यायची गरज नाही.
कुठेतरी वाचलेले असते की नाव घेतले की व्यक्तीला महत्व दिल्यासारखे वाटते, अधिक लवकर व्यक्ती ओपन अप होते वगैरे. हे असले फुसकट रिसर्च कोण करतं देव जाणे. पण फुसकट साईटसवरती हे असे हवाबाण सोडलेले असतात.
किचन ओट्या बाबत +१ .
किचन ओट्या बाबत +१ . जेवताना तोंडाचा आवाज करणारे आणि जोरात ढेकर देणारे कोणी आसपास असेल तर आवडत नाही जरी या नैसर्गिक गोष्टी असतील तरीही . सार्वजनिक ठिकाणी मोबाईल वर व्हिडिओ कॉल करत बोलणारे किंवा u tube , news channel , गाणी बिना इअरफोन ऐकणारे डोक्यात जातात .
फोटो सुंदर आहे, ये खिलासा
फोटो सुंदर आहे, ये खिलासा चेहरा
किल्ली
किल्ली
तुमचा वैताग पोहोचला, मी_अनु !
तुमचा वैताग पोहोचला, मी_अनु !
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
--------------
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
मी रोज मेट्रो ने प्रवास करते
मी रोज मेट्रो ने प्रवास करते , बरीच लोक डोक्यात जातात
१. escalator वर उजव्या बाजूला उभी रहाणारी लोक - कधीतरी एकटी व्यक्ती , कधीतरी दोन मैत्रीणी/मित्र्/नातेवाईक बाजूबाजूला उभे असतात .
२.मेट्रो मध्ये मोठ्या आवाजत फोनवर रील्स ऐकणारी लोक , एकदा तर एक मुलगी फोन व्हिडीओ कॉल वर तिच्या कॅनडाच्या कझिनशी बोलत होती , कॉल स्पीकरवर होता
३.मेट्रो मध्ये खाणारी लोक -
३.exit वर , तिकीट/कार्ड उजव्या बाजूच्या मशीनवर टॅप करायचे असते . लोक उजव्या हातात फोन कानाला लावून बोलत असतात आणि डाव्या हाताने टॅप करत्तात .
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा+१११
बायकांनी स्वयंपाक करायचा, पुरुषांची पंगत आधी बसणार, त्यांना गरम गरम वाढून द्यायचं, वाकावे लागणे, कुणाच्या ताटात किती आहे वगैरे पाहणे, आग्रह करणे, आणि शेवटी थंडगार जेवण कसेतरी पोटात ढकलणे.
आणि तोपर्यंत लगेच चहाची फर्माईश होणे.
(सासरी असं आहे. Detailed अनुभवलं आहे.)
विकु
विकु
दक्षिण भारतीय आहे का तो अनु? इथे बरीच पद्धत आहे नाव घेऊन बोलण्याची. अर्थात प्रत्येक वाक्यात नाही, पण आपण मराठी माणसं समोरच्या व्यक्तीशी बोलताना क्वचितच नाव घेतो, किंवा काही महत्त्वाचं सांगायचं असेल तर नाव घेतो, त्यापेक्षा खूप जास्त वेळा दक्षिण भारतीय लोक समोरच्या व्यक्तीचं नाव घेतात बोलताना. आता मलापण थोडी सवय लागली आहे तशी पण मराठीत बोलताना नाही होत तसं माझं.
मी जेंव्हा हाताने भात खातो
मी जेंव्हा हाताने भात खातो तेंव्हा पाच बोटांच्या चिमटीत घास पकडून खातो, पण जेंव्हा मुठीत घास पकडून खाताना पाहिले तेंव्हा बरेच आश्चर्य वाटले.
>>>>>>>>>escalator वर उजव्या
>>>>>>>>>escalator वर उजव्या बाजूला उभी रहाणारी लोक - कधीतरी एकटी व्यक्ती , कधीतरी दोन मैत्रीणी/मित्र्/नातेवाईक बाजूबाजूला उभे असतात .
चिंचोळ्या रस्त्यात दोन दोन, तीन तीन अशी आडवी रेघ करुन रस्ता अडवुन चालणारी लोकंही मला आवडत नाहीत.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
हो तो दक्षिण भारतीय आहे.
हो तो दक्षिण भारतीय आहे.
अजून वैताग आणणारी हॉटेल सवय:
अजून वैताग आणणारी हॉटेल सवय:
1. फोडणीत मोहरी भरपूर असणे आणि ती तेल तापवून फुटलेली नसणे.तश्याच न फुटलेल्या कडवट मोहरीवर घाईत बाकी गोष्टी घालून पदार्थ शिजवणे.
2. प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीत लसणाचे व्हिजिबल तुकडे आवडतीलच असं मानून प्रत्येक(हो प्रत्येक) पदार्थात लसणाचे तुकडे घालणे.
3. 'कमीच असते साखर आमच्या चहात' म्हणून पाक बनवून देणे किंवा 'स्पेशल कमी साखरेचा चहा' रिक्वेस्ट नुसार जास्त पैसे घेऊन पाक बनवणे.
4. सॉलटेड लाईम सोडा असं 3 वेळा बजावून सांगितलेला असताना गोड आणणे.तो परत पाठवल्यावर त्याच गोड सोड्यात मीठ घालून पाठवणे
5. प्लेन व्हेज सँडविच मध्ये मेंशन न करता बदाबदा चीज किंवा व्हेज मेयो टाकून देणे.
,
हे सर्व सदर दुकानांमध्ये कोणतीहि गर्दी, कस्टमर घाई किंवा विचलित व्हायला तिसरे एखादे कारण नसताना.
भारतात सर्व घटक द्रव्ये स्पष्ट डिक्लेअर केलेला आणि पॅक नसलेला पदार्थ मिळणे फार अवघड होते.नट किंवा लॅकटोज ऍलर्जी वाल्याना तर चान्सच नाही.
नॉन हॉटेल सवय:
उलट चप्पल (तळ वर अशी पडलेली) सरळ न करणे.
कपडे उलट काढून सुलटे न करणे.
कपडे उलटच धुवायला टाकणे.
जेवताना सर्वात सावकाश जेवणाऱ्या माणसाला जग मधले पाणी शिल्लक न ठेवता भराभर खाणे संपवून पाणी संपवून टाकणे
स्वतःच्या पदार्थातले कडीपत्ते ताटाबाहेर थेट टेबलवर काढून ठेवणे.('तुम्हाला काय पॅसिव्ह स्मोकिंग सारखं पॅसिव्ह कडीपत्ता हार्म होतो का, ताटात कडेला बाजूला काढलं तर?')
हाहाहा पॅसिव्ह कढीलिंब
हाहाहा पॅसिव्ह कढीलिंब
>>>>>कपडे उलटच धुवायला टाकणे.
अगं रया जाते की सुलट करुन टाकलं तर. म्हणजे जात असेल कदाचित, आणि घाम तर आत येतो ना. म्हणुन उलटे टाकत असावेत.
>>>>>उलट चप्पल (तळ वर अशी पडलेली) सरळ न करणे.
ईईईईईई!!!
दक्षिण भारतीय आहे का तो अनु?
दक्षिण भारतीय आहे का तो अनु? >> +१
माझ्या टीममध्ये पण एक मुलगी आहे, ती टाईप करताना पण ओके क्ष अस दर वाक्याला लिहते.. आपण वाचताना पूर्ण ओळ वाचल्यावर आपलाच नावं डोक्यात जायला लागतं
>>>>आपलाच नावं डोक्यात जायला
>>>>आपलाच नावं डोक्यात जायला लागतं Proud
हाहाहा सॉलिड्ड!!
छत्री वापरून झाल्यावर बंद
दुसऱ्याने आपली छत्री वापरून झाल्यावर बंद करून तिच्या निऱ्या व्यवस्थित न करता, अर्ध्या तारा बाहेर ठेवून बंद लपेटून ओढून ताणुन बटण लावणे, आणि तशीच आपल्याला परत करणे.
हो अगदी मानव.
हो अगदी मानव.
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
मला ठराविक लोकांच्या बऱ्याच
मला ठराविक लोकांच्या बऱ्याच गोष्टी/ सवयी डोक्यात जातात. पण सर्वसाधारण सांगायच्या झाल्या तर -
१) घरात किंवा बाहेर ताटात गरजेपेक्षा जास्त पदार्थ घेऊन ते न खाता टाकून देणे. हे लहान मुले नाहीत तर मोठी माणसं करतात. स्वतःच्या भुकेचा अंदाज कसा येत नाही, तेच मला कळत नाही. एखादा पदार्थ आवडत नसेल तर नको म्हणून सांगावं किंवा जास्त असेल तर अगोदरच कमी करावा, टाकून कसला देतात!
२) गप्पा मारताना दुसऱ्याचं ऐकूनच न घेणं, दुसऱ्याला बोलूच द्यायचं नाही. त्यामुळे तो संवाद न होता सक्तीची श्रवणभक्ती होते.
३) वेळ न पाळणे. विशेषतः आपल्याला एखाद्याने जेवायला किंवा कार्यक्रमाला बोलावले असेल तर विनाकारण निवांतपणे जाणे आणि वर जणू काही झालेच नाही असे वावरणे.
सार्वजनिक ठिकाणी इतरांचा
सार्वजनिक ठिकाणी इतरांचा विचार न करणारे थेट डोक्यात जातात:
१. एटीएम मधून पैसे काढून आतच मोजत उभे राहणे. बाहेर लोक तिष्ठत उभे असतात, याला फिकीर नसते. जसे काय पैसे कमीजास्त असले तर एटीएम सोबत वादच घालणार आहे हा
२. पार्किंग चे पट्टे कसे आहेत किंवा इतर गाड्या पार्क कशा केल्यात न पाहता बाईक आडवी/तिरकी/कशीही लावून निघून जाणे.
३. पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी घाई, पण आपले भरून झाल्यावर मात्र निवांत अगदी सावकाशीने आपली गाडी हलवणे
अशी अनेक उदाहरणे आहेत. पण हो या प्रत्येक उदाहणात जेंव्हा मी दुसऱ्या बाजूला असतो तेंव्हा मी आपल्याकडून इतरांना अशी गैरसोय होऊ नये हे कटाक्षाने पाहतो हे सुद्धा नमूद करावे लागेल.
अजून एक उदाहरण म्हणजे गाडी चालवताना इतरांचा विचार न करणारे लोक. अगदी चारच दिवसांपूर्वीचे उदाहरण. रिक्षाने चाललो होतो. तर एक महोदय गर्दीच्या पण अरुंद रस्त्यात कार लावून सहकुटुंब आईस्क्रीम खात बसले होते. किती ट्राफिक जॅम. पब्लिक हॉर्न वाजवून वाजवून कशीबशी वाट काढून जातंय. हे निवांत बसलेत आत. माझ्या रिक्षावाल्याने सुनावले त्याला. तो उचकला. ह्याने सुध्दा रिक्षा बाजूला घेऊन खाली उतरला. बराच राडा झाला. बाकीचे पब्लिक सुध्दा मग त्याला बोलू लागले. "कोणीतरी बोलावे लागते हो असल्या लोकांना" रिक्षावाला परत रिक्षात येत मला म्हणाला.
>> गप्पा मारताना दुसऱ्याचं
>> गप्पा मारताना दुसऱ्याचं ऐकूनच न घेणं, दुसऱ्याला बोलूच द्यायचं नाही. त्यामुळे तो संवाद न होता सक्तीची श्रवणभक्ती होते >> अगदी खरं आहे. माझा एक मित्र असे करण्यात एकदम अव्वल आहे! समोरच्याचे एक दोन शब्द होईपर्यंत हा चालू होतो आणि आपलेच सांगत बसतो. अशा लोकांचे कामाच्या ठिकाणी कसे जमते असा प्रश्न मला कायम पडत आला आहे.
माझे पेट पीव्ह -
१. गरजेला म्हणून आपण कोणालातरी एखादी गोष्ट वापरायला द्यावी आणि त्या माणसाने ते विसरून जावे. आपलीच गोष्ट दुसर्याच्या मागे लागून परत मागताना माझी जाम चिड्चिड होते. फोन बिघडला म्हणून एक मित्र माझा स्पेअर फोन घेऊन गेला तो तीन महिने गायबच झाला. थंडीच्या दिवसात घरी येताना जॅकेट विसरला म्हणून एका मित्राला जॅकेट दिले तर हे महाशय नंतर गावभर माझे जॅकेट घालून फिरताना दिसायचे. आणि परत द्यायची आठवण केल्यावर "अरे हे तुझे आहे का? हा हा हा मी विसरलोच.." हे ऐकायला मिळाले.
२. भर मीटींग मधे फरा फरा नाक शिंकरणारे लोक. अमेरिकेत हे फार बघायला मिळते. म्हणजे शिंके सारख्या न थांबवता येणार्या गोष्टी साठी अगदी सॉरी सॉरी म्हणतात पण नाक शिंकरायला जरा बाजूला किंवा बाहेर न जाता जागच्या जागी जोराने "ट्रंपेट वाजवून" काही झालेच नाही असे वागायचे!
३. इतर कोणाच्या ऑफीसात असे कोणी आहे का माहिती नाही, पण आमच्याकडे एक दोन लोक आहेत ज्यांना प्रत्येक विषयावर काही तरी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. ह्यांच्याशी रिलेटेड टॉपीक नसतो, ह्यांचे टास्क नसते, ह्यांचा काहीही संबंध नसतो पण उगाच काहीतरी उदाहरणेच सांग, बोलणार्याचेच परत बोलून दाखव असे करून चर्चे मधे पाणी घालत बसतात. हे बोलायला लगले कि इतर सगळे डोळे फिरवायला लागतात (रोलींग आईज ह्या अर्थी ) आणि एकमेकांना टीम्स वर सेपरेट मेसेज करून गप्पा चालू करतात.
४. आपल्याशी बोलताना च्युईंग गम चावणारे लोक. हे बोलता बोलता कधी ते खाली पडतय का माझ्याच तोंडावर फेकलं जातय ह्याची भीती मला वाटत रहाते. असे चावत चावत बोलणे मला "डीसरीस्पेक्ट्फुल" वाटते. एक इंटरव्ह्यु घेताना कँडीडेट असा च्युईंग गम चावत उत्तरे होता आणि तो अनुभव वाईट होता.
ता.क. घरात गोष्टी जागच्या जागी परत ठेवल्या पाहिजेत ह्या माझ्या आग्रहाला बायकोने " तुला ओ सी डी आहे" असा टॅग लावून गारद करून टाकले आहे!!
>>>>>>असे चावत चावत बोलणे मला
>>>>>>असे चावत चावत बोलणे मला "डीसरीस्पेक्ट्फुल" वाटते. एक इंटरव्ह्यु घेताना कँडीडेट असा च्युईंग गम चावत उत्तरे होता आणि तो अनुभव वाईट होता.
बॉडी लँग्वेज एक्स्पर्टस म्हणतात की च्युइंग गम खात बोलणे 'कॅज्युअल, केअर फ्री' असे दिसते खरे. तसे असेलच असे नव्हे पण तसे दिसते.
>>>समोरच्याचे एक दोन शब्द होईपर्यंत हा चालू होतो आणि आपलेच सांगत बसतो.
मायक्रो अॅग्रेशन म्हणेन मी किंवा लीडरशिप स्किल्स चा सराव करणे.
Pages