तो अवघड घाट उतरताना नेहाच्या मनात थोडीशी धाकधूक होती. पण ती ज्या निग्रहाने आणि कराराने निघाली होती तो त्याहून कैक पटींनी अधिक होता. सराईतासारखी बाईक चालवत ती अंतर काटत होती. रस्त्यावरचे इतर प्रवासी एकतर तिच्याकडे कुतुहलाने पाहत होते किंवा मग 'आजकालच्या पोरी, तुम्हाला सांगतो..' या मथळ्याखाली येणारा नैतिक निबंध वाचत पुढे जात होते. तिचं मात्र या कशाकडेच लक्ष नव्हतं. वार्यावर उडत असल्यासारखी ती गाडी चालवत होती. मध्येच एखादं मनोरम दृश्य पाहण्यासाठी म्हणून क्षणभर थांबुन त्या खोल दर्यांमधून घोंघावणारा रानवारा श्वासात भरून घेत त्याच्यासारखीच बेभान वाहत होती. सूर्य पश्चिमेकडे कलला होता.
सुशांत ,बाँलिवुड मधील एक उगवता तारा काही अपरिहार्य कारणामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करतो आणि काल सत्तेत आणि आज विरोधात असलेल्या नेत्यांच्या हाती कोलित मिळते मीडियाला ब्रेकिंग न्युज सापडतात आणि मग एका आत्महत्येचे सुरु होता ते राजकारण आणि सुशांतची आत्महत्या की खुन हा प्रश्न निर्माण केला जातो आणि न्यायाची मागणी करतराजकारण सुरु होत तर सुशांतच्या सरणावर मीडिया टिआरपिची पोळी भाजुन घेतो चौकशीला अनेक फाटे फुटतात सुशांत ड्रग अँडीक्ट होता, सुशांत गांजेकस होता बेवडा होता चारचार पोरीफिरवत होता आणि शेवटी तो मनोरूग्ण होता हे मीडिया महिनाभर ब्रेकिंग न्युजच्या नावाखाली दाखवत असतो तर राजकारणी मतांच्या पो
माईंची एकसष्टी.
"मी आणि माझी छोटी बहीण अमृतवल्ली यांचं शिक्षण फार कष्टात झालं. आमच्या मोठ्या काकांनी आमची सगळी इस्टेट बळकावली आणि आम्हाला घराबाहेर काढलं. बाबा एका छोट्याश्या कंपनीत स्टोअर कीपर म्हणून काम करायचे. आम्ही लहानपणी बरेच हाल सोसले. आई इतरांच्याकडे स्वैपाक करायला जायची. अशा परिस्थितीत माझं शिक्षण झालं. इंग्रजी विषय घेऊन एम. ए. केलं आणि आणि नंतर शिमोगा इथल्या एका कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून मी नोकरीला सुरुवात केली. अमृतवल्लिने ही तेच केलं आणि त्यानंतर आमच्या घरात थोडीशी आर्थिक सुबत्ता आली."
सध्या महाराष्ट्रात जे पुजा चव्हाण हीच्या मरणा वर राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्र युपीच्या रांगेत उभा राहतोय की काय असे वाटण्याजोगे दुर्दैवी आहे. एक जीव गेलाय त्यावर राजकारणी त्यांची पोळी भाजत आहे. ज्या मंत्र्याचा या प्रकरणाशी संबंध आहे असे बोलले जातेय तो मंत्री बारा दिवस पसार काय होतो नंतर समाजापुढे येउन भाषण काय देतो हे सर्व लाजीरवाणे आहे.
"अरे दिपक ! हे आर ओ वॉटर प्युरीफायर कालपासून चालतच नाहीये. प्यायला पाणी कसे मिळणार ?"
"कंपनीच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून कंप्लेंट दे. ते सर्विस मॅन पाठवतील. त्याच्याकडून दुरुस्त करून घे." "हेल्पलाइन नंबर तुला माहित आहे का ?"
"नाही ग ! गुगलवर शोध ना .."
"अरे हो.. विसरलेच.." ज्योतीने लगेच गुगल वरून वॉटर प्युरीफायर कंपनीचा हेल्पलाइन नंबर शोधून कॉल केला आणि कम्प्लेंट दिली. सर्विस मॅनला दुपारी दोन वाजता पाठवतो, असे त्या हेल्पलाइन वर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले.
आज महात्मा गांधी पुण्यतिथी. महात्म्यांचा क्रुर खुन होउन ७२ वर्षे झालीत. खुन्यांना फासावर टांगले गेले.खुनी कुप्रसिद्ध झाले तर
महात्मा अमर झाला.
भारतात बुध्द व गांधीजी हे दोन महापुरुष होउन गेले. गौतम बुद्ध व गांधीचा देश म्हणुन जग भारताला ओळखते..
अश्या ह्या भारताच्या स्वातंत्र्य नायक असलेल्या महात्म्याचा आज स्म्रृतिदिन. महात्मा गांधीना भावपुर्ण श्रध्दांजली.
महात्मा गांधी हा विषय काही सहा सात ओळीत मांडण्यासारखा नाही. सहा वर्षापुर्वी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता त्याची लिंक देत आहे.
प्रख्यात कवी यशवंत मनोहर सरांनी विदर्भ साहित्य संघाकडून मिळालेला ' जीवनव्रती ' पुरस्कार नाकारला आहे.
त्यांची भुमिका ही पुढीलप्रमाणे होती.
ह्या धाग्याद्वारे मैत्रीच्या ह्या वर्षातील (२०२१) उपक्रमांविषयक माहिती आणि आवाहन एकाच ठिकाणी संकलित करण्याचा मानस आहे.
कंपन्यांना त्यांचा माल तुम्हाला विकायचा असतो आणि त्यासाठी ते मार्केटिंग करतात, ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. आता मार्केटिंग करायचे तर त्याला खर्च येतो. अनावश्यक खर्च झाला तर फायदा कमी होतो. त्यामुळे मार्केटिंग हे कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त, यशस्वी कसे होईल, जाहिराती योग्य त्या लोकांना किंवा कंपन्याना कश्या पोचतील हे बघणे, हे कंपन्यांचे उद्दिष्ट असते. (किंवा असायला हवे). एक उदाहरण म्हणजे समजा तुमची कंपनी, शेतीवर कीड लागू नये याचे फवारणी यंत्र बनवत असेल तर त्याची जाहिरात मुंबई, पुणे या शहरात करून काय फायदा? त्याची जाहिरात अशा ठिकाणी झाली पाहिजे की जिथे शेती होते.
Children, including refugee children, are the future. They need special protection and care to realize their potential.”
– UNHCR, Policy on Refugee Children