सेलेब्रिटी, आत्महत्या, राजकारण आणि बदनामी

Submitted by ashokkabade67@g... on 2 March, 2021 - 00:22

सुशांत ,बाँलिवुड मधील एक उगवता तारा काही अपरिहार्य कारणामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करतो आणि काल सत्तेत आणि आज विरोधात असलेल्या नेत्यांच्या हाती कोलित मिळते मीडियाला ब्रेकिंग न्युज सापडतात आणि मग एका आत्महत्येचे सुरु होता ते राजकारण आणि सुशांतची आत्महत्या की खुन हा प्रश्न निर्माण केला जातो आणि न्यायाची मागणी करतराजकारण सुरु होत तर सुशांतच्या सरणावर मीडिया टिआरपिची पोळी भाजुन घेतो चौकशीला अनेक फाटे फुटतात सुशांत ड्रग अँडीक्ट होता, सुशांत गांजेकस होता बेवडा होता चारचार पोरीफिरवत होता आणि शेवटी तो मनोरूग्ण होता हे मीडिया महिनाभर ब्रेकिंग न्युजच्या नावाखाली दाखवत असतो तर राजकारणी मतांच्या पोळु साठी आंदोलन करीत असतात एक कंगनासारखी बाई जगभर नावाजलेल्या मुंबई पोलीसांच्या तपास यंत्रणेला संशयाच्या भोवऱ्यात उभे करत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करत साऱ्या महाराष्ट्राला असुरक्षित म्हणत महाराष्ट्र बदनाम करतेरिया चक्रवर्ती चे नाव पुढे येते आणि काही काळ या आत्महत्येशी संबध नसतांनाही लाँक अपमधे जाते शेवटी तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे जातो पण शेवटी सिद्ध काहीच होत नाही सुशांतच्या वाट्याला मरणोत्तर फक्त आणि फक्त बदनामीच येते तर रियाचे कुटुंब उध्वस्त होते आणि मुंबई पोलिसांच्या नितीधैर्याचे खच्चीकरण होते बाकी हाती काहीच येत नाही.।
पुजा चव्हाण एक टिकटाँक स्टार पुण्यात येते आणि आत्महत्या करते परत त्याच तिकीटावर तोच खेळ सुरू होतो, काही अँडियो क्लिप समोर येतात आणि एका सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांचे नाव समोर येते व विरोधकांच्या हाती आयते कोलित सापडते मीडियावर ब्रेकिंग न्युज सुरु होतात टिआरपि वाढवायची आयती संधी हाती येते रोज दिवसभर नवनवे खुलासे समोर येतात त्यात मंत्र्याचे चारित्र्यहरण होण्यापेक्षा पुजाचेच चारित्र्यहरण होत असत कुठल चँनल सांगत की पुजाच्या घरात दारुच्या बाटल्या सापडल्यात पण तीच्या पिएम् रिपोर्ट मधे मद्याचा अंश सापडत नाही पण मीडियावर दिवसभर तिच्या रुममधल्या रित्या दारुच्या बाटल्यामात्र दाखवल्या जातात काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या असलेल्या आणि आपल्या पतीला जेलमधे जावे लागू नये म्हणून पत्नी कर्तव्य निभावत भाजपवासी झालेल्या चित्राताई वाघ घसा फाडुन हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात की,गर्भपात करणारी महिला पुजा चव्हाण च आहे विचार करा आपली बहिण आपली कन्या याजागी असती तर आपण असाच घसा फाडला असता का नाही ना यात पुजाची प्रतीमा व्याभिचारी स्त्री अशीच निर्माण झाली ना राजकारण्यांनो न्याय मागण्याच्या नादात आणि मीडिया टिआरपि वाढवण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाले असतील कदाचित पण पुजाच्या कुटुंबाचे काय पुजाला पाच बहिणी आहेत त्यांच्या कडे समाज कुठल्या नजरेने पाहिल त्यांची लग्न होतील कात्यात पुजाच्या तथाकथित आजीने पुजाच्या कुटुंबाला सदर मंत्र्याने पाच कोटी रुपये दिल्याचा आरोप केला पोरीचा सौदा करणारा बाप म्हणत पुजाच्या वडलांची बदनामी मीडियावर सुरु झाली पुजा मरण पावली ती सुटली आता तिला किर्तीवा अपकीर्ती ची काहीच भीती नाही पण जीवौत असलेल्या तीच्या कुटुंबातील सदस्यांचे काय आयुष्यभर बदनामीचे चटके त्यांना सोसावे लागतील त्याच काय.?पुजाला न्याय मिळो वा ना मिळो राजकारणि त्याच राजकारण करत रहातील मीडिया टिआरपि वाढवत राहील मात्र पुजाच्या कुटुंबावर अन्यायच होणार आहे यासाठी जसा बलात्कार पिडीतेचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आणण्यास कायद्यान बंदी आहे तसच पिडीत तो स्री असो वा पुरूष त्याचे नाव घेण्यास कायद्यान बंदी का करु नये यामुळे पिडीतास न्याय मिळो वा ना मिळो पण पिडीतेचे कुटुंब तरु बदनामीच्या बोहऱ्यात सापडणार नाही।एक खासदार मुंबईत आत्महत्या करतो तेंव्हा मीडिया आणि राजकारणी न्यायाची मागणी का करत नाही कारण त्यातुन काहीच प्राप्त होणार नाही हे यांना माहित असते म्हणून हे प्रकरण आपल्यलाच गोत्यात आणिल हे माहिती असल्याने अशा बाबतित तोंडाला चिकटपट्टी लावून कोमात जातात मग असा कायदा करण्यास काय हरकत आहे म्हणजे पिडीत व तीच्या कुटुंबाची बदनामी तरी टळेल .मीत्रांनो आपण प्रतिक्रिया द्यालच त्यात टिकाही असेल पण मीत्रांनो या लेखाकडे राजकारणाच्या एँगलने ंं पहाता पिडीत व्यक्ती वत्याच कुटुंब यांची होणारी बदनामी व त्यावर कायदा का असु नये याएँगलने विचार करुन प्रतिसाद द्या ही विनंती।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

राजकारण , अर्थाकारण सगळे बाजूला राहु दे. मुळात तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळच का आली? तिला या व्यतीरीक्त दुसरा कुठला पर्याय का दिसला नाही? किंवा तिने तसा विचार का केला नाही. एवढी सुंदर, धाडसी मुलगी खरे तर पुढे जाऊन तिचे स्वतंत्र करीअर बनवु शकली असती. पण हा दुर्दैवी निर्णय घेण्यापूर्वी ती, तिच्या आई वडिलांशी का बोलु शकली नाही हाच प्रश्न आहे.

Will you marry her? CJI asks man accused of raping minor, grants protection from arrest
The man told the court that he was a government employee who will be suspended if he was arrested or detained under criminal charges.

https://amp.scroll.in/latest/988254/will-you-marry-her-cji-asks-man-accu...

सरकारी कर्मचार्यावर बलात्काराची केस
तो बोलला , मला जेलात घातले तर माझी नोकरी जाईल
म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याला बेल दिली .
शिवाय हेही विचारले की लगीन करणार का ?
आज केले लगीन , शिक्षा माफ , अन मग परत घटस्फोट दिले तर ..

न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती कडे वाटचाल

पोटार्थी प्रोपागंडा चालवणारे मिडियावाले आणि पक्षार्थी असले धागे काढणारे आयडी यांच्यात गुणात्मक काडीचाही फरक नाही.... दोघेही तितकेच अवगुणी आणि लाचार!