नकार पुरस्काराला

Submitted by सचिन पगारे on 15 January, 2021 - 23:47

प्रख्यात कवी यशवंत मनोहर सरांनी विदर्भ साहित्य संघाकडून मिळालेला ' जीवनव्रती ' पुरस्कार नाकारला आहे.
त्यांची भुमिका ही पुढीलप्रमाणे होती.

डाॅ.ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे
तुमच्याकडे चौकशी केली, पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची
प्रतिमा ठेवणारच असं कळलं.
मराठी साहित्यातील माझी प्रखर
इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन
आपण अशा दुरुस्त्या कराल असं
वाटलं होतं,पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार
नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.
स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना
शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणा-या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतःनाकारलीच आहेत.
माझा सन्मान म्हणजे जिच्या
अनन्यतेमुळे मी ओळखला जातो
त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान !
माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे
अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं
मला अजिबात मान्य नाही.
म्हणून आपण मला दिलेला
जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे
नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मला समजावून घ्यावं.मनोहर म्हैसाळकर म्हणजे
माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारा
माणूस. ते मला निश्चित समजावून घेतील ही खात्री मला आहे.
आयुष्यभर जपले ते मी कोणत्याही कारणास्तव नाकारू
शकत नाही कारण मी मला
नाकारलं तर माझ्याशी
जगण्यासारखं काहीही नाही.
क्षमस्व!
-- यशवंत मनोहर

पुरस्कार वापसी हा प्रकार हल्ली पहावयास मिळत असताना पुरस्कार नाकारणे ही घटना आपल्या महाराष्ट्रात पहावयास मिळाली आहे.
कार्यक्रम हा साहित्य ाााााााा आधारीत असल्वयाने माडखोलकर, कुसुमाग्ररज आदी साहित्यिकांच्या प्रतिमा तेथे लावाव्यात अशी त्यांची सुचना होती.

देवी सरस्वती प्रतिमा लावल्याने पुरस्कार नाकारणे ह्याबद्दल मायबोलीकरांना काय वाटते? हे योग्य आहे की अयोग्य ?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

देवी सरस्वती प्रतिमा लावल्याने पुरस्कार नाकारणे ह्याबद्दल मायबोलीकरांना काय वाटते? हे योग्य आहे की अयोग्य ?
--

याने स्वत:हून पुरस्कार नाकारला हे अगदी योग्य केले. कारण या ढोंग्याना पुरस्कार देणे हा त्या पुरस्काराचा अपमान आहे.

भडकाऊ पण शंभर कोटी क्लबचा धागा.)) (((()? ()))

धागा हा भडकाऊ असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्रातील सर्व आघाडीच्या व्रुत्तपत्रात ही बातमी आलेली आहे. न्युज मध्ये ही दाखवली गेली आहे.. मायबोली हे मराठी मनाचे मोठे मंच आहे ही जी घटना घडली त्याबाबत येथे धागा येणे चर्चा होणे स्वाभाविकच आहे.

मांडणी जर अशी केली.

यशवंत मनोहर यांना ज्या वेळी पुरस्कारासाठी विचारणा केली गेली तेव्हां त्यांनी मी नास्तिक असल्याने देवीदेवतांच्या प्रतिमा नसतील तर पुरस्कार स्विकारता येइल असे सांगितले होते. याप्रमाणे आयोजकांनी सरस्वती सोडून इतर कोणतीही प्रतिमा न ठेवण्याचे ठरवले. पुरस्काराच्या वेळी तसे कळवले. पण सरस्वतीची प्रतिमा देखील नको यावरून मतभेद झाले आणि मनोहर यांनी पुरस्कार स्विकारण्यासाठी येऊ शकत नसल्याचे कळवले. माझी भूमिका पहिल्यापासून माहीत असल्याने वैयक्तिक संबंधात वितुष्ट येणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली.

या शब्दात जे जसे झाले तसेच दिले तर त्यावर चर्चा होत नाही असा अनुभव आहे.

"त्यांनी प्रसाद म्हणून दिलाय, तुम्ही शिरा म्हणून खा" लॉजिक लावता आले असते. उगाच आडमुठेपणा करून आपले वेगळेपण ठसणे याव्यतिरिक्त काही उपयोग नाही. त्यांना कोणी नमस्कार करण्याची सक्ती केली तर ती नाकारणे ठीक आहे.

त्यांनी प्रसाद म्हणून दिलाय, तुम्ही शिरा म्हणून खा"
बरोबर

उद्या सनी लिओनीला एखादा पुरस्कार जाहीर केला आणि ती बोलली नागडी चित्रे लावाल तरच येईन , मग ? सजावट तिच्या मर्जीने ठरवणार का ?

ते त्यांच्या पैशाने सजावट करत आहेत , तुमचा रोल फक्त ते देतील ते घेणे , इतकाच होता , तुमच्या उंबर्याच्या आत तुम्ही नका लावू अमक्या देवीचे फोटो

@ वरचा प्रतिसाद
सनी लिओनीने एखाआ कर्मकांड करणा-या महिलेला / पुरूषाला पुरस्कार देण्याचे ठरवले आणि त्या वेळी ती अर्धनग्न राहणार असेल तर पुरस्कार स्विकारणा-याने त्याबाबत स्विकारायच्या आधीच क्लिअर केले तर ? आणि ऐन वेळी सनी लिओनीने मला ते शक्य नाही असे कळवले तर ?

माध्यमात बातम्या भडक पद्धतीने आल्या आहेत. मी यशवंत मनोहर यांचा खुलासा आणि अजून एक कुणाचा तरी दुजोरा वाचला होता आणि विसरून पण गेलो होतो. त्यांनी सुरूवातीलाच मी अशा प्रतिमा असतील तर मी पुरस्कार स्विकारणार नाही असे सांगितले होते. तर मग त्याच वेळी का नाही क्लिअर केले त्यांना ?

त्या वेळी बघू वगैरे छाप उत्तरं नक्कीच दिली गेली असतील. ऐन वेळी इतरांनी हेच म्हटले असेल की हा कोण लागून गेला ? पुरस्कार देतोय तो गपगुमान घे, आम्ही सरस्वती ठेवू किंवा अन्य काही आमचा प्रश्न आहे. त्यामुळे मनोहरांना दोन दिवस आधी तसे कळवले गेले असेल.
मग त्यांनी काय कळवायला पाहीजे ?

साहित्य संमेलनाला जर आख्खे फादर अध्यक्ष म्हणून चालतात तर सरस्वतीच्या प्रतिमेचं काय इतकं
या कवी महाशयांचा फादर दिब्रटो ना विरोध असेल नाही गेल्या वर्षी सासं चे अध्यक्ष म्हणून.

एकंदरीत फारच असहिष्णु दिसताहेत

माझ्यामते या प्रकरणाला अजुन हवा देउ नये. दोन्हि पार्ट्यांची मतं आपापल्या दृष्टिकोनातुन बरोबर आहेत असं मानुन पुढे जावं. पुरस्कार नाकारण्याची अनेक कारणं असतांत, त्यात अजुन एकाची भर. होपफुली हे प्रकरण पुढे चिघळणार नाहि अशी आशा बाळगुया...

बुद्धीप्रामाण्यवादी दृष्टीकोनातून निर्णय घेतला असेल तर स्वागत करायला हवे.
मला त्यांच्या पुरस्कार नाकारण्याच्या निर्णयाचा आदर आहे.

हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे.>> एकदम खणखणीत स्टँड. रिस्पेक्ट यशवंत सर.

उगीच कुठेही देव धर्म घुसवित राहायचे आणि मग कुणी खरे बोलले की त्यालाच वेड्यात काढायचे हे नवीन नाही. Wink

<< उगीच कुठेही देव धर्म घुसवित राहायचे आणि मग कुणी खरे बोलले की त्यालाच वेड्यात काढायचे हे नवीन नाही >.

----- सरस्वतीला विद्येची देवता मानणे कधी पासून सुरु झाले ? अशा प्रथेचा धर्मात प्रवेश कसा आणि कधी झाला असेल ?
सरस्वतीचा आणि पुस्तकांचा काय संबंध यावर विचार करायला लावणारी कृती आहे.

त्यांनी सुरूवातीलाच मी अशा प्रतिमा असतील तर मी पुरस्कार स्विकारणार नाही असे सांगितले होते. तर मग त्याच वेळी का नाही क्लिअर केले त्यांना ? >>>>> हे महत्वाचे आहे. शिवाय नकार देताना त्यांच्या प्रतिक्रियेत कुठे त्यांच्या भूमिकेचा दंभ किंवा हटवादाचा दर्प जाणवला नाही.

मायबोलीकरांना काय वाटते? हे योग्य आहे की अयोग्य ?>>
मायबोलीकरांचे जावु द्या. तुम्ही खुष झाले की नाही ते सांगा पाहु.

<< त्यांचा व्यक्तीगत निर्णय या पलीकडे अजून काही महत्व नाहीये या घटनेला. >>

---- निर्णय व्यक्तीगत असला तरी विचार करायला लावणारा नक्कीच आहे. पुरस्कार साहित्यासाठी दिला जाणार होता, तो काही धार्मिक कार्यक्रम नव्हता आणि त्यांनी त्यांची भूमिका अगोदरच सुस्पष्ट केली होती. घरचा खासगी कार्यक्रम असेल तर सरस्वतीची तसबीर असण्याबद्दल आपत्ती असण्याचे कारण नव्हते/ नाही.

पुरस्कार नाकारण्याची एक अत्यंत छोटी कृती काय केली- पण सर्व सोशल मिडिआ त्यांच्यावर अक्षरश: तुटून पडलेला आहे, लोक वाईट्ट प्रकारे वैयक्तिक कमेंट करत आहेत. विचार स्वातंत्र्याची अशी गळचेपी चिंताजनक आहे.

त्यांचा स्टॅन्ड आतातायी वाटतो.

त्यापुढे, "विद्येची देवता, काळी पाटी, पाटीपूजन, अपमान" वैगेरे भावविभोर मेसेज पण आतातायी वाटतात.

मानव यांच्या मताशी सहमत.

मला वाटतं दोन्ही बाजू बरोबर आहेत.... त्यांनी आधीच क्लिअर केलं होतं हेही खरं असेल आणि या सोहळ्यात वर्षानुवर्षे सरस्वतीची मूर्ती, दीपप्रज्वलन वगैरे प्रकार/प्रथा असतील . त्या एका माणसासाठी का बदलणार ! So जे झालं ते ठिकच झालं म्हणायचं

कार्यक्रमाला सरस्वती पुजन होते. सहित्यिक काही कोण्या धर्माला सामोरं ठेऊन लिहित नाहीत तर मग हे असले पुजन वगैरे काय कामाचे..? आणि करायचेच असेल तर तर सरस्वती पुजन प्रमाणे अजान, जिंगल्स, धम्म गीत ई.ई पण ठेवण्यात काय गैर आहे..??