महात्मा गांधीना भावपुर्ण श्रध्दांजली

Submitted by सचिन पगारे on 30 January, 2021 - 06:02

आज महात्मा गांधी पुण्यतिथी. महात्म्यांचा क्रुर खुन होउन ७२ वर्षे झालीत. खुन्यांना फासावर टांगले गेले.खुनी कुप्रसिद्ध झाले तर
महात्मा अमर झाला.

भारतात बुध्द व गांधीजी हे दोन महापुरुष होउन गेले. गौतम बुद्ध व गांधीचा देश म्हणुन जग भारताला ओळखते..

अश्या ह्या भारताच्या स्वातंत्र्य नायक असलेल्या महात्म्याचा आज स्म्रृतिदिन. महात्मा गांधीना भावपुर्ण श्रध्दांजली.

महात्मा गांधी हा विषय काही सहा सात ओळीत मांडण्यासारखा नाही. सहा वर्षापुर्वी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता त्याची लिंक देत आहे.

https://www.maayboli.com/node/47473

Group content visibility: 
Use group defaults

महात्मा गांधीजींना अश्रूपूर्ण आदरांजली !
ज्या क्रूरकर्म्याने त्यांची हत्या केली त्याचेच वैचारीक वंशज आता सत्तेत आले आहेत. ही मंडळी संकरीत असल्याने गोडसेपेक्षा जास्त धूर्त आहेत. हे स्वतःच हल्ले करून दुस-याचं नाव घेतात असे गोध्रा, संसद हल्ला, मुंबई हल्ला, अक्षरधाम मंदीर हल्ला यावरून वाटते. २०२४ ला सत्ता मिळवण्यासाठी ही मंडळी नियोजित राममंदीरावर सुद्धा स्वतःच इतर रंगाच्या वेषात हल्ला करतील अशी भीती वाटते.
त्यामुळे देशाला गांधीजींची किती गरज आहे यावर विश्वास बसतो.

पगारे ना या धाग्यावर महात्मा गांधीजीं ना श्रद्धांजली देण्या ऐवजी इतर पक्षा वर राजकीय टीका केलेल्या चालतात का ?

गोध्रा, संसद हल्ला, मुंबई हल्ला, अक्षरधाम मंदीर हल्ला यावरून वाटते.
यात पुलवामा पण जोडा.

म. गांधींची क्रूरपणे हत्या करणाऱ्या अनाजी पंतुकड्याच्या विखारी विचारधारेच्या पिलावळीचा षंढनायक नथुराम गोडसे याचा तीव्र निषेध करून राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांना आदरांजली..!

श्रद्धांजली. त्यांनी संयमाने राजकारण आणि समाजकारण केले, कधीही विरोधकांना विषारी किंवा तीव्र शब्दांनी संबोधले नाही. कधीही उच्च स्वरात राणा भीमदेवी थाटात बोलले नाहीत. सदैव विनम्र राहिले. हिंदू धर्माचे आचरण ठेवूनही धर्मातीत वृत्तीने राहिले. ह्या गोष्टी अनुकरण करण्याजोग्या आहेत.

महात्मा गांधींचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी ओळखले की हिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे कठीण. कारण
१. ब्रिटीशांच्या बाजूने आपलेच लोक आपल्यच्च लोकांना मारत होते.
२. हे कार्य अत्यंत गुप्ततेने करावे लागते, नि आपल्या देशातले लोक काय, ५ रु. साठी फितुरी करून भावाला विकतील, भाउबंदकी!

महात्मा गांधींनी देशातील सर्व लोकांना एकत्र आणले. त्यांनी अहिंसा हा मार्ग स्वीकारला - गुप्तता नाही!
सांगून सवरून. आम्हाला तुमचा कायदा मान्य नाही - आम्ही मोडणार, काय करायचे ते करा!! त्यालाहि हिंमत लागते. सर्व लोकांचा पाठिंबा असल्याने हे शक्य झाले.

दुर्दैवाने आपल्या लोकांना स्वातंत्र्य मिळवणे नि त्यानुसार आपल्या राज्यात सुरक्षितता ठेवणे, राज्य कारभार करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे कळलेच नाही.

जेंव्हा देशाला स्वातंत्र्य मिळत होते ( बोलणी चालू होती) तेंव्हा महात्मा गांधी कलकत्त्या मध्ये हिंदू मुस्लिम दंगली मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. ज्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य भर झगडले तिचा उपभोग न घेता दोन धर्मातला विखार कमी करण्यासाठी ते शेवट पर्यंत प्रयत्न करत राहिले . कलयुगातल्या ह्या खऱ्या संताला भावपूर्ण श्रद्धांजली .

महात्मा गांधी यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे ते हिंदूंचे सर्वात मोठे आणि आदरणिय नेते होते तरी पण त्यांनी इतर धर्मियांची स्थळे पाडली नाहीत. दंगली घडवून आणल्या नाहीत. त्यांनी हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, ईसाई, पारसी, जैन, शीख, मुसलमान व ईस्लाम धर्मियांना आपसात गुण्यागोविंदाने रहायला शिकवले.

त्यांची अहिंसा डोळस होती. भारताला हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यापासून धोका आहे हे त्यांनी ओ़ळखले होते. त्यामुळे काळी टोपी, गोल चष्मा, कोट असा पेहराव असणा-या आणि माफी मागण्यात तरबेज असणा-या एका मुडदेफरासाने जेव्हां त्यांना संघात दाखल व्हा नाहीतर आम्ही कुठल्याही थराला जाऊ असा दम दिला तेव्हांही त्यांनी मी प्राण त्यागण्यास तयार आहे पण मी संघात जाणार नाही असे उत्तर दिले. यालाच अहिंसा म्हणतात. यांमुळेच या अतिरेकी संघटनेने त्यांची हत्या केली.

संघाचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी यंग इंडीया ही गुप्त संघटना स्थापन केली होती असे म्हटले जाते. पण त्याची कुणकुण लागल्याने गोडसेने भेकडपणे त्यांची हत्या केली.

महात्मा गांधींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन _/\_
काळाच्या पुढे विचार असलेले हे व्यक्तिमत्त्व होते.
त्यांच्या स्वराज सारख्या संकल्पना जर वेळीच प्रत्यक्षात आल्या असत्या तर भारताचे आजचे चित्र फार वेगळे असते. गांधीजींचे एक वचन जे माझे अत्यंत आवडते आहे आणि ज्याची आजच्या काळात जाणीव राहणे आवश्यक आहे ते उद्धृत केल्याशिवाय राहवत नाही - there is always enough for everyone's needs but not for everyone's greed.