बैलशिंग्या........?

Submitted by तायड्या on 15 August, 2011 - 12:52

धनेश -- काकन-- ककनार -- हाँर्नबिल

Copy of IMG_4942.JPGCopy of IMG_4943.JPGCopy of IMG_4936.JPGCopy of IMG_4937.JPGCopy of IMG_4939.JPG

B N H S आणि पक्षीमित्र डाँ सलीम अलींची आठवण आली ना ?

गुलमोहर: 

मस्तच!!! Happy
पहिले दोन मला कृत्रिम वाटले Happy
मी कायम पिंजर्‍यात बघितलेत प्राणिसंग्रहालयातल्या.>>>>आणि फोटोत Sad

>>पहिले दोन मला कृत्रिम वाटले
अनुमोदन. मी फक्त फोटोत पाहिलेत. असे प्रत्यक्षात पहायला मिळणं म्हणजे खरंच महान योग.

मी कायम पिंजर्‍यात बघितलेत प्राणिसंग्रहालयातल्या.>>>>आणि फोटोत<<<<
जिप्सी कर्नाळा पक्षी अभयअरण्यात गेलासतर हे पक्षी बघायला मिळतील. पण सहज नाही.

दापोलीत गव्ह्याला. दोन दिवस मागावर होते. पण वेळ जमत नव्हती. शेवटी मिळाले . काजूच्या वृक्षावर होते . तो बंगला बंदच असतो. त्यामुळे तिथे आले असणार.

पक्ष्यांचे फोटो काढायचे म्हणजे खूप पेशन्सचे काम व लक् ही पाहिजे साथीला.
तुम्ही फारच मेहनत घेतलेली दिसते हे फोटो काढायला......अप्रतिम फोटो आहेत व तुमच्या पेशन्सला सलाम.

मस्तच फोटो.
तरीच मला वाटलं. हे पक्षी कोकणातच मुक्तपणे वावरताना दिसतात.
पुर्वी कर्नाळ्याला पिंजर्‍यात एक होता. तो आपण फेकलेला पॉपकॉर्नही सहज झेलायचा !!!

धनेश कोकणात कर्कश आवाजात ओरडत जाताना बर्‍याच वेळां दिसतात व ते थांबतातही मोठ्या वृक्षांवर. पण कधीही घराजवळ किंवा माणसाच्या वाटेला आलेले पाहिले नाहीत. इथं तर चक्क खिडकीवर बसून पोझ देताहेत !! << तो बंगला बंदच असतो. त्यामुळे तिथे आले असणार.>> हेच कारण असणार . दुर्मिळ प्र.चिं.बद्दल धन्यवाद.

पहिले दोन मला कृत्रिम वाटले स्मित
मी कायम पिंजर्‍यात बघितलेत प्राणिसंग्रहालयातल्या.>>>>आणि फोटोत अरेरे>>>अनुमोदन पण काही म्हणा मस्तच आहेत.

मस्त फोटो.. घराच्या जवळ पाहुन मलाही आश्चर्य वाटले.

हे पक्षी कोकणातच मुक्तपणे वावरताना दिसतात.

हो, मी पाहिलेय ब-याच वेळा पण उंच झाडांवरच... माणसे तर अजिबात आवडत नसावी यांना...