पक्षीच पक्षी!! दक्षिण फ्लोरीडा, अमेरिका...

Submitted by दैत्य on 11 January, 2012 - 20:05

काही दिवसांपूर्वी फ्लोरीडाला ट्रिप मारण्याचा छान योग आला. तेव्हा एक छान कार भाड्याने घेऊन मायामीच्या दक्षिणेला समुद्रात असलेली बेटं म्हणजेच 'की वेस्ट', दक्षिण फ्लोरीडात असणारं सुमारे १५ लाख एकर एवढं मोठं अवाढव्य 'एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क' आणि मायामी शहरापासून अगदी अर्ध्या तासावर, बहुतांश भाग समुद्राखाली असलेलं 'बिस्केन नॅशनल पार्क' ह्या तीन ठिकाणी जाऊन आलो. अनेक वेगळ्यावेगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी इथे मुक्तपणे वावरताना दिसतात, त्यातल्याच काही पक्ष्यांचे फोटो अपलोड करत आहे.
इथे नेहेमीच खूप पर्यटक असतात त्यामुळे कदाचित पक्ष्यांना त्यांची सवय झाली आहे, कारण ह्यातल्या एकाही फोटोसाठी झाडांवर चढणे, उलटे लटकणे, धावत जाऊन फोटो काढणे वगैरे वगैरे विशेष परिश्रम घ्यावे लागले नाही!

हे पक्षी सगळीकडे दिसत होते.(बगळे असावेत बहुतेक!)

त्यातलेच हे दोन!

ही आपल्या चिमणीसारखी दिसणारी छोटी चिमणी!

ह्या भाऊंच्या एक फूटावरून काढलेला फोटो! ह्यांना एकतर चष्मा लागला असावा नाहीतर तंद्री!

ही सगळ्या पक्ष्यांची कॉमन जागा. हा एकदम उथळ समुद्राचा भाग असून ह्याखाली खूप कोरल्स आहेत.

हा तर मस्त उन्हात पंख वाळवत होता!

मोराचे रंग असलेलं कबुतर!

ह्यानं तर अजिबात न घाबरता मला पार्कींग लॉट मधून स्टोरपर्यंत रस्ता दाखवला!

हे मला ओळखता येणारे एकमेव पक्षी, सीगल्स (चुकण्याची शक्यता आहे, सांभाळून घ्या!), साउथ बीच, मायामी..

गुलमोहर: 

मस्त फोटोज !
<<< ह्या भाऊंच्या एक फूटावरून काढलेला फोटो! ह्यांना एकतर चष्मा लागला असावा नाहीतर तंद्री! >>> दैत्या, सांभाळुन रे बाबा, एवढ्या जवळ कशाला गेलास त्याची चोचचं १ फुट दिसतेय. Proud

छान फोटो. दिलेली नावेही मनोरंजक Happy

मोट्ठ्या पाणपालींचे नाही का काढले फोटो? खूप असतात तिथे.

आता दिसत आहेत पक्षी.........आधी उडुन गेलेले वाटते Happy

छान..

सगळ्यांना धन्यवाद!
आता गॅलापेगॉस बेटांवर जाऊन या.-- हापिसातून सुट्टी मिळाली तर नक्की जाईन !! Wink

मोट्ठ्या पाणपालींचे नाही का काढले फोटो? खूप असतात तिथे. >> लोल. चविष्ठही असतात.. पाणपाली म्हणजे इंग्रजीत काय? अ‍ॅलिगेटर तर म्हणत नाही ना? कारण अ‍ॅलिगेटर खाल्ला आहे (आणि चवही आवडली आहे!!;))

Pages