कंड्या तरूचे वर बैसलेला...

Submitted by तायड्या on 23 August, 2011 - 14:11

खंड्या... kingfisher
शिकार करण्यात मोठा तरबेज . उंच ठिकाणी बसून टेहळणी करतो. मासा किंवा किडा दिसला की झपकन सूर मरून पकडतो. पावसाळ्यात ह्याचे रंग तजेलदार दिसतात.
Copy of IMG_0499.JPGCopy of IMG_2847.JPGCopy of IMG_2850.JPGCopy of IMG_3150.JPGCopy of IMG_3370.JPGCopy of IMG_3373.JPG
वरचे सगळे व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर
अता ही खालची छोटी पिल्ले नाहित बरे का...
हा आहे small blye kingfisher
Copy of IMG_4566.JPGCopy of IMG_4567.JPG

गुलमोहर: 

छान फ़ोटो.
याची आणखी एक वेगळी जात सावंतवाडीला बघितली होती.
पाण्यात झेप घेत्ताना हा नेहमी सूर्याचे स्थान बघून कोन
ठरवतो. या सावधगिरीमूळे याला नेहमीच मासा मिळतो.

तळ्याकाठी गाती लाटा
लाटामध्ये उभे झाड
झाडावर धिवराची
हाले चोच लाल जाड

अशी एक कविता होती लहानपणी. Happy कुणाला आठवते का?

धन्यवाद आणि दिनेशदा ती वेगळ्या प्रकारची जात आहे त्याचे प्रचि मिळाले तर जरूर दाखवा.

सुंदर फोटो....

तळ्याकाठी गाती लाटा
लाटामध्ये उभे झाड
झाडावर धिवराची
हाले चोच लाल जाड
अशी एक कविता होती लहानपणी. कुणाला आठवते का?
>>>>>> जागोमोहनप्यारेजी
हो मला आठवते..actually फोटो पहात असताना मनात का कोण जाणे ह्याच ओळी उमटल्या.....खाली आपला प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटल......

आमच्याकडे यांची रेलचेल नेहमीच असते.>>>>येस्स्स, जागूकडे भरपूर पाहिले होते, पण झूम लेन्स न आणल्याने फोटो खास आले नव्हते.

तायड्या फोटो अतिशय सुंदर Happy

>>तळ्याकाठी गाती लाटा
लाटामध्ये उभे झाड
झाडावर धिवराची
हाले चोच लाल जाड >> जामोप्या, मला ही आठवते ही कविता. खरंतर खंड्याची पहिली ओळख मला या कवितेतूनच झाली, त्यामुळे ती कविता विसरणं निव्वळ अशक्य आहे. Happy