गद्यलेखन

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग १

Submitted by पुरंदरे शशांक on 14 November, 2013 - 23:45

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग १

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना सर्वसामान्य लोक "माऊली" या नावानेच हाक मारतात. तेराव्या शतकाच्या अगदी शेवटी ज्यांनी या महाराष्ट्रात जे अलौकिक असे जीवन जगून दाखवले त्यांच्या विषयी अजूनही सर्व भाविकांच्या मनात एक विलक्षण श्रद्धा आहे, आदर आहे.
याचे मुख्य कारण हे त्यांनी केलेले चमत्कार नसून संस्कृतातील भगवद्गीता मराठीत आणण्याचे जे थोर कार्य केले तेच होय. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणतो.

रामलला

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 14 November, 2013 - 11:34

“ए आज्जी मी आलो !”
मोठ्याने आरोळी ठोकत मी माजघर ओलांडून देवघराकडे धाव घेई .आजी तिथे नक्की असणार हे माहित होते.हातातील वही व पोथी बाजूला ठेवून आजी प्रेमाने माझे स्वागत करीत असे .”सुनील किती वाळलास रे ” ,म्हणून गालावरून हात फिरवे आणि स्वत:च्या कानशिलावर बोट मोडत असे .मामाकडून आजोळहून घरी आल्यावर हा नेहमीच पहिला सीन असे .मग सुटीतील दोन महिण्याच्या गैरहजरीचा मोबदला सव्याज मिळत असे .

फिनिक्स-पान०३

Submitted by पशुपति on 14 November, 2013 - 07:37

“माझे यार विशेष काही नाही. काही दिवस कोलकत्त्यामध्ये एका कंपनीत होतो. आता इकडे आलो. आई-वडिलांचे चाललेच होते...आपलं प्रांत का सोडतो? पण मी विचार केला, बघावे फिरून इकडे-तिकडे! अनायासे लागला जॉब आणि इकडे आलो. चित्रकलेबद्दल म्हणावे तर सध्या काहीच नाही. मन उगीचच भरकटत असते. कशातच लक्ष लागत नाही. करायला काहीच नाही म्हणून नोकरी करतोय. बर ते जाउदे....चालतो आता.”
“अरे, जेवून तरी जा.” रामप्रसाद.
“छे रे! आता मी नवीन रस्ते शोधात लॉज वर जाणार आहे. चालणे पण होईल आणि मन पण शांत होईल!!”
सुब्रतो गेल्यावर सुचित्रा रामप्रसादला म्हणाली, “ असा एकाएकी का उठून गेला हा?”

फिनिक्स-पान०२

Submitted by पशुपति on 13 November, 2013 - 23:25

हाउसवाईफचा इंग्लिश डिकशनरी अर्थ काय असेल तो असेल, पण मराठीतमात्र नोकरी न करणारीबायको हाच अर्थ प्रचलित आहे.
माधवराव पेपर वाचत डूलकी घेत होते. आई मात्र ह्या दोघांचे संभाषण ऐकत आपल्याला पण भाग घेता येईल का ह्या विचारातएखादा धागा पकडण्याच्या बेतात होती.तेवढ्यात सुब्रतोने तो गुंता सोडवला. “आप मांजी, ताश खेलना पसंद करेंगी?” आंधळा मागतो एक डोळा,.... आणि तिघेही मग पुणे येईपर्यंत पत्ते खेळत बसले.सुब्रतो तात्पुरता एका लॉज मधे उतरला आणि माधवराव रिक्षात बसून आपल्या बायको-मुलीसह कोथरुडच्या त्यांच्या घरी गेले.

फिनिक्स

Submitted by पशुपति on 13 November, 2013 - 10:11

फिनिक्स
सुब्रतो चक्रवर्ती.......कोलकत्त्याहून इंजिनियरिंग पास झाला व ताबडतोब पुण्यात एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीत नोकरी
मिळाली. “दास ऑटो “ही मुळची कोलकत्त्याची एक मोठी ऑटोपार्ट तयार करणारी कंपनी. पुण्यात पण त्यांचे एक युनिट
आहे. तिकडेच कामावर रुजू व्हायला सुब्रतो पुण्याला यायला निघाला होता. गाडीत बसल्या बसल्या त्याचे विचार सुरु झाले
होते. ‘ आत्तापर्यंत सर्व आयुष्य कोलकत्यात गेलेले......एक महानगर ......नुसतेच महानगर नाहीतर महासागर म्हणावे
लागेल. कसे असेल बरे पुणे ?.......कोलकत्त्या एवढे गजबजलेले असेल ? का एखादे छोटेखानी शहर असेल.......? छे....?

आधुनिक सीता - २१

Submitted by वेल on 13 November, 2013 - 04:50

भाग १६ - http://www.maayboli.com/node/45780
भाग १७ - http://www.maayboli.com/node/45869
भाग १८ - http://www.maayboli.com/node/45994
भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013
भाग २० - http://www.maayboli.com/node/46199

*****************************************

आधुनिक सीता - २०

Submitted by वेल on 7 November, 2013 - 07:19

सर्व माबोकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

भाग १५ - http://www.maayboli.com/node/45696
भाग १६ - http://www.maayboli.com/node/45780
भाग १७ - http://www.maayboli.com/node/45869
भाग १८ - http://www.maayboli.com/node/45994
भाग १९ - http://www.maayboli.com/node/46013

************************************************

मदन आणि यम

Submitted by अश्विनी भावे on 7 November, 2013 - 04:46

कुठेतरी ऐकलेली कथा आहे....

एकदा यम (म्रुत्यु देवता) कामासाठी एका वनात फिरत होते. फिरता फिरता खूप उशीर झाला.
यम देवता दमून विश्रन्ती साठी एका गुहेमध्ये गेले. झोपण्या आधी त्यानी आपला धनुष्य बाण काढून ठेवला. आणि ते झोपी गेले.

योगायोगानी त्याच वेळी मदन (प्रेम देवता) त्या गुहेत आल्या. अन्धार असल्यामुळे झोपलेले यम महाराज मदनाला दिसले नाहीत. मदनाने सुद्धा आपले धनुष्य बाण काढून ठेवले.

दुसर्‍या दिवशी सकाळी यम घाईघाईनी गुहेतून बाहेर पडले. आणि चुकुन जाताना आपले काही बाण गुहेत विसरले आणि त्याऐवजी काही बाण मदनाचे घेतले.

काही वेळानी मदन सुद्धा उठले आणि शिल्लक राहीलेले बाण घेउन बाहेर पडले..

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

एका मूर्ख मुलीचं मनोगत..

Submitted by रमा. on 6 November, 2013 - 22:55

मी त्याला विचारलं - "पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडणार्‍या व्यक्तीला काय म्हणतात? ",
तो म्हणाला, "लकी".
मी विचारलं, "पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीकडून प्रेमभंग करून घेणार्‍या व्यक्तीला काय म्हणतात?"
तो म्हणाला, "मूर्ख"...

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन