अंदाज-हवा-मानाचा

Submitted by bnlele on 5 November, 2014 - 00:17

नुकतेच आंध्र-ओरिसा तटावर एका चक्रवर्ति वादळानी भयंकर थैमान घातल.
जागतिक-राष्ट्रीय स्तरावर शास्त्रज्ञांनी पूर्वानुमान केल आणि हानिवर बचाव-नियंत्रण
शक्य तेव्हढे कराण्याचे खांबीर प्रयत्न झाले. राक्षसि थरार चित्रवाणिवर दिसला.
पावसा बरोबर मदतीचा पूर आला पण तो अपुराच ठरला- केंद्र आणि राज्यसरकार
एकजूट पण आधाशी,संधिसाधु व्यापारी बेछूट ! कमाईची पर्वणी - जीवनावश्यक- दूध,पाणी
अन्न कमि म्हणून वारेमाप महाग ! पिळवणुकीच चित्र हादरा देणार पाहून मन व्यथित.
पुनर्वसनाचे उपाय केवळ शासकीय यंत्रणेनीच करायचे असा सोइस्कर गैरसमज करून बाकी मोकळे!
याच वेळी राज्यात विधान सभेच्या नेवडणुकीचा विविध पक्षांचा प्रचार आचार-संहितेच्या उंबरठ्यावर
शिगेला पोहोचलेला होता. अत्त्याचार,भ्रष्टाचार नकोत अशा घोषणा गाजवून सर्वत्र कल्लोळ माजलेला होता
सामांन्याना म्हणे हवी लोकशाही. प्रत्यक्षातली ठोकशाही सत्तेच्या स्पर्धेत दिसलीच नाही त्यांना कि बुद्धिपुरस्सर
डोळेझाक होती ? सूज्ञास सांगणे न लगे !
त्सुनामि-वादळं निरंतर येतच असणार आणि शास्त्रज्ञ अंदाज वर्तवून जागरुक करण्याचा प्रयत्न करणार ही बाब नित्याचीच झाली
आहे. हुदहुड नंतर निलोफरचा फटका आहेच कि नाही?
सर्व चित्र-वाहिन्या "आम्हीच प्रथम"च्या चढाओढित गुंतुन समाधानात. मोजक्याच संस्था पुनर्वसना मदतीचा हात शासकांना
देणार- याची बातमी माध्यमातून क्वचित आढळणार हे सत्य. निराधार कुटुंबांच्या आर्थिक समस्यांवर अंधुक प्रकाशच दिसणार.
पण सार्वस्व गमावालेल्यांच्या मनावर खोलवर झालेल्या जखमा जनमानसावर उमटतील असा प्रयास कमि कां दिसावा?
राजकारणातले क्षुल्लक वाद सुद्धा अनेक वाहिन्यांवर चर्चेत दिसतात- तज्ञांसोबत रंगवले जातात !
जनमानसाची संवेदनशीलता पुनर्वसनाच्या समस्या- आर्थिक,मानसिक,आणि, सर्वकश उपाय-योजनां चर्चेतून नक्कीच प्रभावी होतील.
श्राव्य-दृष्य माध्यमानी अशा चर्चांना मानस्शास्त्रज्ञ, मानसोपचार-शास्त्त्रज्ञांना आमंत्रित केल तर परिणामकारक ठरतील.
"सत्यमेव जयते किंवा मुमकिन है" निर्विवाद उपयोगी असल्याचे सर्वमान्य आहे.
पुनर्वसना संबंधी समस्या - नैसर्गिक/प्राकृतिक कारणातून उद्भवली असो अथवा मानवी चुकीनी आली असो प्रयास पूर्वक
घडवून आणलेल्या चर्चांतून नक्कीच उपयोगी ठरतील.
म्हणून वाटल अंदाज हवा मनाचा .-खर्‍या अर्थानी मानाचा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users