मराठी भाषा दिवस २०२२ - उपक्रम - अभिवाचन/साहित्यवाचन
नमस्कार मंडळी,
जगभरात पसरलेल्या मराठी मायबोलीने मराठी माणसांना मायबोलीच्या प्रेमळ धाग्यात गुंफलं आहे. हे अंतर कमी करण्यासाठी आपल्या मायबोली वर साजरे होणारे उत्सव, उपक्रम ह्यांचा महत्वाचा वाटा आहेच.
नवीन आव्हाने स्वीकारत मायबोली वरचे उपक्रम केवळ लिखित स्वरुपात न ठेवता, मायबोलीवरचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी एक माध्यम वापरायचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून आपण करत आहोत.