स्व-काळजी- जबाबदारी कोणाची?
बर्याच दिवसांपासून या विषयावर लिहायचं मनात होतं.माझ्या फेसबुक मित्रयादीतील Dr.Shilpa Chitnis Joshi आरोग्य/आजारांविषयी अनेक महितीपर,बोधप्रद पोस्टस् लिहीत असतात.
त्या वाचल्यावर नवीन महिती कळतेच. परंतू त्या वाचून, काही कंमेटस् वाचून एक प्रश्न बराच काळ मनात घोळतोय. तो म्हणजे स्व-आरोग्य, स्व-काळजी ही जबाबदारी कोणाची?
माझ्या मते डॅाक्टरस् हे पेशंटसला treat करतात; काही वेळा आजार होऊ नये म्हणून prevent करतात.मार्गदर्शन करतात.
मला सुदैवाने खूप चांगले डॅाक्टर्स मिळाले. ज्यांनी मला मोठ्या आजाराच्या, मरणाच्या दाढेतून बाहेर काढलं. त्यामुळे मी डॅाक्टर्स बद्दल खूप कृतज्ञ आहे.
