न न न-काव्य

Submitted by टवाळ - एकमेव on 18 January, 2018 - 00:50

काव्य काव्य म्हणजे नक्की काय असतं ?
मला विचाराल तर
उगीच शब्दांचा सव्य आणि अपसव्य असतं
वाचकांसाठी बरेचदा सर्वसाधारण
पण लिहीणार्‍या साठी मात्र नेहमीच भव्य असतं

यमक साधणे हेच काही वेळा गंतव्य असतं
कारण मुक्तछंदाला फारसं भवितव्य नसतं
पण नाविन्य सांभाळून गेयता
हे खरोखरच एक दिव्य असतं

असेल कवि जर गोड गळ्याचा
तर काव्य देखील सुश्राव्य असतं
पण कवि जर असेल "काका" चा बांधव
तर चांगल्या कवितेचं ही "काव्य" बनतं

काव्य म्हणजे अभिरुची,
काव्य म्हणजे अभिव्यक्ती
काव्य म्हणजे _प्रेम, विरह, त्याग आणि आसक्ती

काही काव्य ढाळत बसतात
उगीचच नक्राश्रु
काही काव्य करतात
व्यवस्थेची बिनपाण्यानं श्मश्रु

बरेचदा काव्याला असते वेदनेची झालर
क्वचित एखादं फुटकळ काव्य देखील
मिळवून देतं डॉलर

काव्य कधी गद्यातून बोलतं
काव्य कधी पद्यातून गातं
अस्सल काव्य अस्सल कविच्या
धमन्या धमन्यांतून वाहतं

व्याकरणात चुकलात तरी काव्य करता येतं
ईंग्रजीतून शिकलात तरी काव्य करता येतं
कारण काव्य असतं कविच्या प्रतिभेचा सारांश
ते असतं त्याच्या ईतिहासाचा निष्कर्ष
आणि तीच असते त्याच्या अभ्युदयाची आशा,
एकमेव

काव्य काव्य म्हणजे नक्की काय असतं ?
उगीच शब्दांचा सव्यापसव्य असतं
उगीच शब्दांचा सव्यापसव्य असतं

- कविराज प्रो. (नम्र) टवाळ

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! वा! हे काही (न) काव्य वाटत नाही.
फक्त ते डॉलर वालं जरा गंडलंय इतकंच.
बाकी छान.