Submitted by च्रप्स on 21 September, 2021 - 10:28
आजीला अचानक किडनी सूज आल्यामुळे ऍडमिट करावे लागले, डॉक्टर म्हणाले शुगर शूट झाल्यामुळे असा त्रास झाला आहे...
आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरीच बीपी आणि शुगर चेक करण्याचा प्लॅन आहे...
चांगले मशीन सुचवू शकता का... वापरण्यास सोपे असावे आणि ऍक्युरेट...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.omronhealthcare
https://www.omronhealthcare-ap.com/in/category/8-blood-pressure-monitor
There are 2 main types in bp machine. Main differences are
1. Whether belt is tied to arm or auto fitted
Auto fitted belt is having limitations of cuff size 22-42 cms.
2. Various parameters that are measured.
Website also have compare option, which help to choose correct one as per your requirements.
गेली अनेक वर्षे Omron `BP
गेली अनेक वर्षे Omron `BP monitors वापरत आहे. सध्या "intelli wrap cuff" आणि manual wrap cuff वाला असे दोन्ही मशिन्स आहेत.
जुने सात आठ वर्षांनी खराब झाल्यावर नवे " intelli wrap cuff" घेतले
बाबा वृद्धत्वामुळे बरेच कृश झाले असल्याने ते अनेकदा एरर देत रहाते. त्यामुळे मग परत manual wrap cuff वाले घेतले.
intelli wrap cuff मी वापरतो.
दोन्ही व्यवस्तथीत चालतात, दोन्हीवर पाच वर्षांची गॅरंटी आहे.
ग्लुकोज मोजण्यासाठी "arkray" कंपनीचे Glucocard 01 mini हे Glucometer गेली ९ वर्षांपासून आहे. बायको नियमीत वापरते.
तुमच्या आजींना लौकर बरे वाटण्यास शुभेच्छा.
वाचतो आहे.
वाचतो आहे.
सध्या जवळच्याच पथॉलजी सेंटरला दोनदा बिपी पाहून आलो. त्याने manual wrap cuff वाले वापरले आणि मशिनवरचे रीडींग सांगितले. २०/- रुपये. जाऊ शकणाऱ्यांसाठी सोय चांगली आहे. अनुभव आणि खात्री.
( मशीनचं नाव वाचलं नाही. पुढच्या वेळेस पाहीन.)
पण वयस्करांसाठी घरीच मोजण्याचे यंत्र घ्यावे लागेल.
च्रॅप्स , अॅमेझॉनवर चांगली
च्रॅप्स , अॅमेझॉनवर चांगली मशिन्स अवाईलेबल आहेत. बरीचशी इथलाच ब्रँड आहेत. One Touch etc. काही मशिन एकदम सेन्सिटिव्ह आहेत आणि एकदम कमी ब्लड मध्ये रीडींग घेतात. उदा. हे खालचे मशिन.
https://www.onetouch.com/products/glucose-meters/onetouch-ultra2
अमेरिकेतून घेवून दिलत तर अगदीच स्वस्त आहे.
पुण्यात /कोल्हापुरात असाल तर एकजण मेडीकल वाला आहे तो घरी आणुन देतो. त्याचा संपर्क देवू शकेन.
आणखी एक, आजीना रोज ट्रॅक
आणखी एक, आजीना रोज ट्रॅक करायला सांगितल असेल तर ग्लुकोक मोनिटरिंग अॅप खुप उपयोगी पडते. घरातील कुणीतरी डाऊनलोड करू शकतील का ? ग्लुकोज ब्लड शुगर ट्रॅकर अॅप एकदम चांगल आहे.
मी accucheck active ग्लुको
मी accucheck active ग्लुको मीटर वापरते. डायबीटीस स्पेशालिस्टने हे सगळ्यात चांगले आहे म्हणून रेकमेंड केले होते. त्यात 500 रीडिंग्स सेव्ह करता येतात. नंतर डेटा केबलने रिंडिंग दुसऱ्या डिव्हाईसवर ट्रान्सफर करता येतात. शहरातल्या कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळते. कसे वापरावे याचे बरेच डेमो युट्यूबवर उपलब्ध आहेत.
आमच्याकडे ऍक्युचेक वापरतात.
आमच्याकडे ऍक्युचेक वापरतात. एकदा टेक्निक जमले तर ज्ये ना स्वतःही वापरू शकतात. सर्विसही चांगली मिळते.
माझ्याकडेही ऍक्युचेक आहे
माझ्याकडेही ऍक्युचेक आहे
पण त्यांचे अजून एक मॉडेल निघाले आहे
जुन्या व नव्या मशीनच्या पट्ट्या वेगवेगळ्या असतात , कृपया नीट चेक करून घ्यावे , मोबाईलवर मशीन व स्ट्रिप्सचा डबा असे दोन्ही फोटू ठेवावेत
फोटो नमुना म्हणून दिले आहेत , ( रिकमांडेशन किंवा जाहिरात नाही)
एक मनगटावर लावायचं बीपी
एक मनगटावर लावायचं बीपी मॉनिटर सुद्धा असतं.
सगळ्यात आधी माझ्याकडे ते होतं. ते सुद्धा योग्य रिडींग दाखवतं. पण ते जरा नीट वापरावं लागतं.
जे बीपी मोजले जाते आणि जे रेफरन्स धरले जाते ते आपल्या हार्टच्या लेव्हलला मोजले जाते. दंडाला cuff लावला आणि हाताचे कोपर सरळ खाली ठेवले की ती हार्टची लेव्हल होते.
तेच हात सरळ वर करून मोजले तर रिडींग कमी येईल. (झोपून मोजले तर उत्तम)
मनगटाला लावायचे बीपी मीटर लावायला फार सोपे. पण मनगटाला लावले की कोपरा टेबलवर टेकवून मनगट हार्टच्या लेव्हलला आणायचे आणि त्यास्थितीत ठेवण्यासाठी खाली काही आधार द्यायचा.
हे केले नाही, मनगट खाली केले तर रिडींग जास्त दाखवते. (वर कुणी करणार नाही, पण समजा जर कुणी हात पूर्ण वर करून मोजलेच तर फारच कमी रिडींग येईल.)