माझी योगचर्या

Submitted by अनन्त्_यात्री on 21 June, 2024 - 08:10

भुजंगासनाची
माझी रीत न्यारी
डसेन जिव्हारी
नकळत

शीर्षासन तर
माझे आवडते
नको ते उलटे
पाहतो मी

"धनुरा"सनाची
सवय लाविली
"मशाल" फेकली
दूरवर

सध्या "पद्मा"सन
घालतो मुकाट
ED चे झेंगट
कोणा हवे?

Group content visibility: 
Use group defaults

मस्त आहे Lol पद्मासनावरची कोटी जबरदस्त आहे.

फक्त धनुरासन नक्की कसे असते ते न आठवल्याने मशाल चा संदर्भ कळाला नाही. नंतर पुन्हा वाचल्यावर संदर्भ लक्षात आला. हा ही भारी आहे.