सिंगापुरातील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या अंतिम सामन्याची रात्र - बी

Submitted by विकवि_संपादक on 28 April, 2011 - 11:40

२ एप्रिल शनिवारचा दिवस म्हणजे कार्यालयाला सुट्टी. त्यात आनंदाची भर म्हणजे विश्वकरंडक क्रिकेट सामन्यातील भारत विरुद्ध श्रीलंकेमधील अंतिम लढत.

मला शुक्रवारी रात्री फेसबुकावर कळले की ग्लोबल ईंडियन ईंटरनॅशनल स्कूलमधे प्रोजेक्टवर मॅच दाखविणार आहेत. माझ्याकडे घरी केबल मी घेतले नव्हते. जी काही मजा चाखली मॅच बघण्याची ती एकतर ईंटरनेटवर किंवा अधूनमधून मित्रांच्या घरी जाऊन. घरी बसून एकट्यानीच ती मॅच बघायची आणि मग प्रश्न पडायचा हा आनंद जो उफाळून येत आहे तो कुणापुढे व्यक्त करायचा! इथे असे आपले कुणीचं नाही. बाहेर रात्रीचे बारा वगैरे वाजलेले असताना भारताने पाकिस्तानाला हरवले हे ओरडून कुणाला सांगता देखील यायचे नाही. सगळी घरे चुपचाप निजलेली. पण तिकडे भारतात मात्र अगदी जल्लोष चाललेला आहे हे फोनवरुन बाहेरच्या जगातला जो आवाज ऐकायला यायचा त्यावरुन कळायचे. तो आवाज ऐकून फार भरुन यायचे. शाळेतले पोरवयातील दंगा करणारे दिवस आठवून मन आतल्या आत आसवे गाळायला लागायचे! आपण फार मोठे देशभक्त नाही आहोत पण क्रिकेटमधील आपला विजय अभिमानाने ऊर भरून आणतो.

आज सकाळपासून मला कधी एकदाचे पाच वाजतात आणि आपली मॅच सुरु होते ह्याचे वेध लागले होते. मी ३ वाजताच घरुन बाहेर पडलो. जेव्हा शाळेत पोहोचलो तेव्हा शाळेतील सभागृहात विद्यार्थी, त्यांचे पालक, मित्र-मैत्रिणी आणि ज्यांना इथे मॅच दाखवली जाणार आहे हे माहिती होते ते सर्व तिथे जमले होते. पूर्ण सभागृह अगदी दाटीवाटीने गच्च भरले होता. तीन-तीन प्रोजेक्टर लावले होते. एक मोठा माईक पण लावला होता. खाली रात्रीच्या जेवणाची परवड होऊ नये म्हणून शाळेतील कॅन्टीन सुरु ठेवले होते. पोरवयातील मुलेमुली आपल्या गालावर भारताच्या तिरंग्याचे चित्र रंगून इकडे तिकडे फिरत होती. मीही एक चित्र माझ्या गालावर काढून घेतले. पण खूप लाजिरवाणे वाटत. कधीकाळची ही हौस आता कुठे पुर्ण झाली होती!

मॅचला सुरवात झाली. माझ्या बाजूला बसलेले दांपत्य हे श्रीलंकन आहेत हे मला नंतर कळले. आपण विकेट घेतली की ते खिन्न व्हायचे आणि त्यांनी चौके मारले की ते नाचायचे. पण त्यांचा वर्ग अगदी तोकडा होता. त्यांना त्यांचा आनंद साजरा करायची हिम्मत देखील होत नव्हती.

आपली मॅच जेंव्हा सुरु झाली तेंव्हा तर अर्धी मॅच मी पाहूच शकलो नाही. सारखे सारखे हातपाय गार पडून श्वास घ्यायला जड जाऊन मन अस्वस्थ व्हायला लागायचे. मी पायर्‍यांवरुन वर खाली करुन फक्त कुणी रन काढली तर आत डोकवायला जायचो. शेवटच्या काही ओव्हर्स तर अशा होत्या की जितके चेंडू शिल्लक होते तितक्याच रन देखील हव्या होत्या. कुणाची विकेट गेली किंवा एकही चेंडून बिनारनचा गेला तर आपले आता काही खरे नाही असे वाटायचे.

शेवटी आपण मॅच जिंकलो आणि शाळा अगदी आवाजानी दणाणून गेली. पोलिसांचे शाळेला लगेच फोन आलेत. मग लगेच माईकवर घोषणा करुन आवाज कमी करा . . . आवाज कमी करा असे शाळेच्या प्राचार्यांनी सांगितले. पण मुले कुठे ऐकतात! आणि ती देखील इतकी मोठी बाजी मारल्यावर पोलिस प्रत्यक्षात जरी तिथे अवरतले तरी देखील ही मुले ऐकणारी नव्हती. त्या मुलांमधे आम्ही मोठ्यांनी पण आपली ओरडण्याची हौस फेडून घेतली. हम जीत गये म्हणून लोकांनी नारे लावलेत.

रात्री दोन वाजता लोक आपापल्या घरी परतली. बाहेरचे निरव शांत जग खळबळून जागे झाले. बस ट्रेन मिळण्याचा प्रश्नचं नव्हता. एक तासानी मला कॅब मिळाली. अजूनही त्या रात्रीचा कैफ उतरलेला नाही!

त्या रात्रीची काही प्रकाशचित्रे:

WorldCupInSingaporeIMG_6227.jpgWorldCupInSingaporeIMG_6232.jpgWorldCupInSingaporeIMG_6239.jpgWorldCupInSingaporeIMG_6259.jpgWorldCupInSingaporeIMG_6269.jpgWorldCupInSingaporeIMG_6288.jpgWorldCupInSingaporeIMG_6301.jpgWorldCupInSingaporeIMG_6303.jpgWorldCupInSingaporeIMG_6314.jpgWorldCupInSingaporeIMG_6319.jpgWorldCupInSingaporeIMG_6325.jpgWorldCupInSingaporeIMG_6327.jpgWorldCupInSingaporeIMG_6344.jpgWorldCupInSingaporeIMG_6346.jpgWorldCupInSingaporeIMG_6349.jpgWorldCupInSingaporeIMG_6352.jpgWorldCupInSingaporeIMG_6354.jpgWorldCupInSingaporeIMG_6376.jpgWorldCupInSingaporeIMG_6382.jpgWorldCupInSingaporeIMG_6389.jpgWorldCupInSingaporeIMG_6391.jpgWorldCupInSingaporeIMG_6401.jpgWorldCupInSingaporeIMG_6430.jpgWorldCupInSingaporeIMG_6444.jpgWorldCupInSingaporeIMG_6447.jpgWorldCupInSingaporeIMG_6449.jpgWorldCupInSingaporeIMG_6450.jpgWorldCupInSingaporeIMG_6453.jpgWorldCupInSingaporeIMG_6455.jpgWorldCupInSingaporeIMG_6456.jpgWorldCupInSingaporeIMG_6457.jpgWorldCupInSingaporeIMG_6463.jpgWorldCupInSingaporeIMG_6465.jpgWorldCupInSingaporeIMG_6466.jpgWorldCupInSingaporeIMG_6478.jpgWorldCupInSingaporeIMG_6483.jpgWorldCupInSingaporeIMG_6484.jpgWorldCupInSingaporeIMG_6498.jpgWorldCupInSingaporeIMG_6510.jpgWorldCupInSingaporeIMG_6511.jpgWorldCupInSingaporeIMG_6516.jpgWorldCupInSingaporeIMG_6519.jpgWorldCupInSingaporeIMG_6522.jpgWorldCupInSingaporeIMG_6533.jpgWorldCupInSingaporeIMG_6540.jpgWorldCupInSingaporeIMG_6541.jpgWorldCupInSingaporeIMG_6543.jpgWorldCupInSingaporeIMG_6550.jpgWorldCupInSingaporeIMG_6556.jpgWorldCupInSingaporeIMG_6557.jpgWorldCupInSingaporeIMG_6559.jpgWorldCupInSingaporeIMG_6561.jpgWorldCupInSingaporeIMG_6565.jpgWorldCupInSingaporeIMG_6568.jpgWorldCupInSingaporeIMG_6571.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.. सुप्पर्ब अनुभव.. अश्या वेळी आपल्या लोकांची गर्दी बरोबर असेल तर हा प्रसंग अनुभवताना अजूनच बहार येते. त्यावेळी ओळखीचा,अनोळखी यात काहीच फरक राहात नाही..
आम्हीही एका इन्डिअन रेस्टॉरेंट मधे आमच्या भारतीय स्टाफ सकट आमचं बुकिंग करून ठेवलं होतं. त्या रेस्टॉरेंट मधे भारतीयांच्या जोडीला इतर ही अनेक देशांचे लोकं सामना पाहायला जमले होते.
प्रत्येक षटकार,चौक्यावर आरोळ्या मारल्या जात होत्या. सचिन ची विकेट पडल्यावर प्रचंड दडपण आलं होतं,खाण्यापिण्यात लक्षही लागत नव्हतं धड. मग जशी जशी विजयाची आकांक्षा वाटू लागली, आमच्या स्टाफ च्या पोरांनी दणादण रसगुल्ले, गुलाबजाम खायला सुरु केले. Happy
विजयाचा क्षण निश्चित झाला आणी संपूर्ण रेस्टॉरेंट मधे एकच जल्लोष उडाला. लोकं खुर्च्या सोडून उभे राहून नाचू लागले.
रच्याकने प्रेक्षक मंडळीत काही पाकिस्तानी,बंगलादेशी,ऑस्ट्रेलिअन्स आणी ब्रिटीश ही होते. त्यांनी मात्र आमच्या या आनंदसोहळ्यात अजिबात भाग घेतला नाही. गपचुपपणे त्यांनी तिकडून काढता पाय घेतला..

बी,

मस्त वर्णन! वाचताना व नंतर प्रचि बघताना मजा आली. मी पूर्वी सिंगापूरात असताना कंपनीतर्फे स्थानिक संघाविरूध्द सिंगापूर रीक्रीएशन क्लबच्या मैदानावर दोन क्रिकेट सामन्यात खेळलो होतो. तुझ्या लेखामुळे सिंगापूरच्या आठवणी जागृत झाल्या.