क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका दिवसात ३८६. माझ्या आठ्वणीतल्या तरी भारताने एका दिवसात काढलेल्या सगळ्यात जास्त धावा.

- आज एकूण ३८५ धावा झाल्या. हा विक्रम नाही. यापूर्वी २००७-०८ मध्ये मद्रासमध्ये द. आफ्रिकेविरूद्ध भारताने पहिल्या दिवशी ३८६ धावा केल्या होत्या.

टेस्ट मध्ये ७० चा स्ट्राईक रेट !! हे असे फक्त सेहवाग ठेवायचा. जय हो द्रविडकी . जुना द्रविड दिसला बॉस. हा द्रविड अन सा.अफ्रिकेच्या सिरीज मध्ये चाचपडत खेळणारा द्रविड नक्कीच वेगळे आहेत.

भारताला नेमकं झालयं तरी काय? ऑसीं सोबत खेळतानाही बहुतेक वनडे मध्ये पहिल्या ४ विकेट ५०-६० च्या आतच? आज टेस्ट मध्ये ही तसेच. काहीतरी माणसिक लोचा झालाय का?

>>माणसिक लोचा झालाय का?
माणसिक लोचा वगैरे काही नाही... सेहवाग आणि गंभीरचा बॅडपॅच एकदम सुरु झालाय!

काल दिलशान आणि आज महेला जयवर्धने.. तो अजुन आउट व्हायचाय.. २०४ झाले त्याचे... आणि त्याला आडनाव बंधू प्रसन्ना तो पण चिकटला.. गेली मॅच.. ड्रॉ झाली तर ठिक.. नाहीतर मुरली आणि हेराथ मिळून चवथ्या आणि पाचव्या दिवशी फेस आणतील आणि हारु मॅच...

हिम्स,
असेही काही नाही. मी तरी या पुढील सामन्याचे विवेचन असे करेनः
सकाळचा पहिला एक तास फार महत्वाचा आहे. यात बरेच वेळा खेळपट्टीवरीळ दव अन ओलसरपणामूळे चेंडू स्विंग होतो अन सिम मुह्वमेंटही असते. उद्याच्या या पहिल्या एक तासात भारताला जर एक दोन विकेट्स (दोन्ही जयवर्धने सकट) पट़कन मिळाल्या तर लंकेची आघाडी २००-२२५ च्या आसपास थोपवता येवू शकते. अर्थात एकंदर आपल्या "महान" गोलंदाजांची गेल्या दोन दिवसातील कामगिरी बघता, हे तितकेच अशक्य (कठीण?) वाटतय जितकं सेट झालेल्या द्रविड ला बाद करणं.
तेव्हा बहुतांशी २७५-३०० धावांची आघाडी घेवून लंका डाव घोषित करेल पण त्यासाठी किमान ३० ओवर्स त्यांन्ना खेळाव्या लागतील (४ च्या सरासरीने कालच्या १६५ धावात अजून १२०-१३० ची भर). थोडक्यात तोपर्यंत उपहाराची वेळ आली असेल. त्यानंतर भारताने डाव चालू केल्यावर लंकेच्या गोलंदाजांना दुपारच्या उन्हात, ठणठणीत खेळपट्टीकडून तितकेसे सहाय्य मिळेल असे वाटत नाही. मुरलीची गोलंदाजी परवा युवी अन धोणी दोघांनीही व्यवस्थित खेळली होती, यातच बरेच काही आले.
अर्थात, मुरली फारच अनुभवी अन खरच "महान" आहे, लंकेसाठी हा सामना एकहाती फक्त तोच फिरवू शकतो. ईतर गोलंदाज विशेषतः वेलेगेडारा ने जरी पहिल्या डावात सेहवाग, गंभीर, सचिन आणि लक्शमण यांना बाद केले असले तरी, सचिन ला पडलेला चेंडू सोडता ईतर तिघांनिही पायावर कुर्‍हाड मारून घेतली होती. (तीघांचेही शून्य फूटवर्क!)
नंतर याच व इतर गोलंदाजांना द्रविड, युवी, धोणी ने अगदी सहज धुतलं होतं.
या खेळपट्टीवर ज्या प्रकारे धावा कुट्ल्या गेल्या आहेत ते पहाता, सेहवाग, सचिन, गंभीर कंपनीचे हात (पाय) धावा काढायला शिवशिवत असतील.
सेहवाग, गंभीर कसे सुरुवात करतात यावर बरेच काही अवलंबून आहे. पुढे त्यानंतर सचिन शतकी खेळी करायचे ठरवून आला आणि तसे खेळला तर उद्या दिवसखेर बहुदा २५० धावा भारताने केल्या असतील. (सेहवाग, गंभीर मिळून १००+, सचिन १०० Happy
अन्यथा राहुल द्रविड नेहेमीप्रमाणेच गोंद लावून एक बाजू धरून ठेवेल अन मग अडला हरी लक्षमणाचे पाय धरी या न्यायाने लक्षमण देखिल मोठी खेळी करून Very Very Special Laxman ही उपाधी पुन्हा: सिध्ध करू शकतो. (अर्थात हे लक्षमणच करू शकतो. एरवी चार महिन्यात एकही सामन्यात न खेळवता मग कसोटी संघात घेवून त्याच्याकडून पहिल्या चेंडूपासून पदलालित्य वगैरे ची अपेक्षा करणे अन त्याऊपर त्याने शतक वगैरे करणे हे प्रकरण कुणालाही झेपण्यासारखे नाही)

तेव्हा एकतर ३ बाद २५० कींव्वा २ बाद २५० धावफलक बघायला मिळू शकतो. (६० ओवर्स, ४ च्या सरासरीने)

पुन्हा पाचव्या दिवशी सकाळचे पहिले सत्र महत्वाचे ठरेल अन सामन्याचा एकंदरीत निकाल (अनिर्णीत वा लंकेचा विजय) या सत्रात ठरेल असेल मला वाटते. हे सत्र भारताने व्यवसथित खेळून काढले तर पाचव्या दिवशी उपाहारापर्यंत, भारताने १२०-१५० धावांची आघाडी घ्यायला हरकत नाही. चहापानापर्यंत ही आघाडी २५०-२७५ पर्यत वाढवून पुन्हा लंकेला खेळायला दिले जावू शकते (सर्व भारतीय गोलंदाजांचा याला हमखास विरोध असणार.. जेव्हडे धुतले तेव्हडे पुरे आहे म्हणत असतील) Happy

अर्थात यात बर्‍याच गोष्टी जर तर वा गॄहित आहेतः
सेहवाग झोपेतून जागा होईल किंव्वा या सामन्यात खेळला नाहीस तर पुढील सामन्यातून बाहेर असा प्रेमाचा सल्ल्ला त्याला दिला गेला असेल. (ही कसोटी आहे, एकदिवसीय नाही हे त्याला कुणीतरी समजावून सांगा रे)
गंभीर ला सूर सापडेल.
सचिन २० वर्ष झाल्यानिमित्त काहितरी संस्मरणीय खेळी करेल. निदान या खेळपट्टीवर तरी ही अपेक्षा माफक आहे. (असे म्हणावे तर नेमके तो खेळतो तेव्हा आपण हरतो असा वाईट्ट इतीहास आहे!)
द्रविड अन लक्षमण दिल्या "वचनाला" जागतील... Happy

उद्या सेहवाग, सचिन अन लक्षमण कसे खेळतात यावर बरेच काही आवलंबून आहे असे मला वाटते. त्याच बरोबर जुन्या चेंडू वर रिवर्स स्विंग करायची करामत झहीर ला जमली (भारताच्या हवामानात?) तर आपल्याला संधी आहे अन्यथा, get ready for dravid's memorable match savings innings, AGAIN!!!

लंकेका पलडा भारी है, लेकीन पूरी पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! ते आपल्या खेळाडूंवर शक्य त्या सर्व मार्गाने दबाव आणणार हे निश्चीत. खेळपट्टी काही विशेष चमत्कार करेल असे दिसत नाही. तेव्हा एकंदरीत आपल्यासाठी दुसरा डाव हा मानसिक क्षमतेची कसोटी असेल, ज्यात आपला गत ईतीहास फार चांगला नाही. याउलट सेहवाग "पेटला" तर अचानक लंकेच्या खेळाडूंची शारिरी़क अन मानसिक कसोटी लागल्याच चित्र पहायला मिळू शकेल. कारण सेहवाग हा "कोट" आहे सुतळी बाँब नव्हे.. तो धडधडत असतो तेव्हा फक्त कान बंद करून अन जमलच तर डोळे उघडे ठेवून फक्त बघायचे असते. अर्थात या गोष्टीलाही फार फार काळ लोटला आहे. अलिकडे तो लवंगी एव्हडाही फुटत नाही!

सर्वात मोट्ठे गृहितक म्हणजे, खेळपट्टी ब्रेक होणार नाही आणि मुरलीला अधिक फायदा होणार नाही. अन्यथा एरवी पाटावरही हातभर चेंडू वळवू शकणारा हा माणूस खराब खेळपट्टीवर काय करामत करू शकतो हे मी वेगळे लिहायची गरज नाही. Happy

तेव्हा ऊद्या सकाळचे सत्र संपेपर्यंत धीर धरायला हवा.. या क्षणाला तरी लंकेचा विजय अजून दूर वाटतोय.

पुढील उर्वरीत सामन्यांसाठी भज्जी ला हाकलून "जंबो" ला परत बोलवा रे. त्याची उणीव जाणावते आहे Sad
झहीर चा व्यंकटेश प्रसाद झालाय अन आपण ऑसी मधे नाही भारतातील खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करतोय हे इशांत विसरलाय.
(एकंदरीत उर्वरीत मालिकेत आपली परिस्थिती बिकट आहे. थोडक्यात लिहायचे तर आपण सचिन, द्रविड, अन लक्षमण यांवर अजूनही पूर्वी ईतकेच अवलंबून आहोत... सचिन कसोटी खेळायला लागल्या पासूनचा हाच काय तो जमा खर्च! )

योग, एकदम मस्त लिहीलय.
>>सेहवाग झोपेतून जागा होईल किंव्वा या सामन्यात खेळला नाहीस तर पुढील सामन्यातून बाहेर असा प्रेमाचा सल्ल्ला त्याला दिला गेला असेल. >> हे अगदी खरं.

बाकी कसोटीचा निर्णय आजच्या दिवसावरून ठरवता येणार नाही.

भज्जी ला हाकलून "जंबो" ला परत बोलवा रे. >> अगदी अगदी..
भज्जी, सेहेवाग माजलेले आहेत... इशांत शर्मा ला बसवायला हवा होता.. Sad

on a lighter note...
श्रीनाथ अन प्रसाद ही जोडी फलंदा़जी करताना जितकी करमणूक व्हायची तितकी tom and jerry देखिल करत नाहीत. श्रिनाथ महान होता. बॉल मारून हमखास आकाशात बॉल शोधत शोधत धावायचा (स्वतानेच मारलेला बॉल कुठे गेला हे शोधणारा हे एकमेव भारतीय खेळाडू असेल).. अन मग त्याचे ते जीभ काढत, घाम गाळत धावणे.. अन प्रसाद हमखास धावचित होत असे, तेही भारताला अगदी चार पाच धावा हव्या असताना... आहाहा काय करमणूक होती दोस्त. आपण हरल्याचं दुख्ख विसरून जायला होत असे.
पण बहुतांशी सामने आशियातील पाटा क्रिकेट्पट्टीवर खेळल्यामुळे दोघांचीही कारकीर्द लवकर संपुष्टात आली. मला वाटतं स्वा. सावरकरांनंतर कुणी काळ्या पाण्याची (पाट्याची) शिक्षा साक्षात भोगली असेल तर ती श्रीनाथ, प्रसाद जोडीने. पाटा खेळपट्टीवर हेडन, लारा, सईद अन्वर, जयसूर्या अशा बेदरकार कत्तल करणार्‍या फलंदाजांन्ना दिवसभर चेंडू टाकत रहायचे म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षाच! त्या मनानी फिरकीचं बरं आहे, चेंडू टाकायला इतकं पळावही लागत नाही..
मला आठवणीत नाही पण ब्रेट ली भाई ला श्रीनाथ खेळतानाच्या क्लिप्स कुठे आहेत का? क्रिकेट मधले अनेक नव नविन फटके अशा वेळी जन्मले असतील यात शंका नाही :). एकदा कधी तरी त्याने ५० का काहितरी धावा केल्या होत्या असं आठवतय.
असो.. जुने ते सोने Happy
एकदा आवडत्या खेळाडूंच्या काही विशिष्ट लकबी वा गोष्टी लिहायला हव्यात..
मियादाद ने मारलेल्या शारजातील फेमस षटकारानंतर चेतन शर्मा या मानवाचं काय झालं कुणाला माहीत आहे का? नंतर दिसलाच नाही गडी.... त्याला शेवटच्या क्षणी यमाच्या जागी मियादाद दिसला नाही तरच नवल.. नशीब एकेकाचं... Sad

राखणार की हारणार असा प्रश्न पडतोय.

ला शेवटच्या क्षणी यमाच्या जागी मियादाद दिसला नाही तरच नवल.. नशीब एकेकाचं... >> योग त्याला उशा:प मिळाला आहे रे. ऋषिकेश कानिटकर नामक गंधर्वाने ढाक्यात चौका मारुन त्याला उशा:प दिला. Happy

मियांदाद पेक्षाही ती ऑसींसोबतची मॅच वाईट आहे.

नागपुर T20 चे तिकीट्स ऑनलाईन घेण्यासाठी कुणाला साईट माहीती आहे का?

ह्ह्म्म... चिंताजनक लक्षणे: (लंकेची आघाडी या वेळी जवळ जवळ २५० होती) आणि सकाळच्या सत्रात जवळ जवळ २५ ओवर्स टाकून झाल्या होत्या:
185.3
Mishra to DPMD Jayawardene, no run, that was a shooter! Landed on the rough and crept through so low and caught him low on the pads, he can't appeal because it landed outside leg
Murali will like the sight of that

187.2
Mishra to DPMD Jayawardene, no run, oh well the low bounce again from the rough, some how beats the edge and the stumps
Herath should target that spot

187.4
Mishra to DPMD Jayawardene, no run, low bounce again

11.30: It's lunch. If you're an Indian supporter, you've had nothing to smile about all morning. Credit to this pair for taking this session very seriously and making sure they frustrate India as much as possible. Save for the balls that kept low, the Indians never looked like taking a wicket. Gave the impression that they wanted to throw in the towel. No aggression from any of the bowlers and the spinners couldn't do much.

I would have declared about half an hour before lunch.

End of over 191 (maiden) Sri Lanka 708/5

------------------------------------------------------------------------------------एकूण आघाडी: २८२.
बहुदा जयाचे ३०० आणि प्रसन्न चे १५० झाले की डाव घोषित करतील. लंकेला डाव घोषित करायला ऊशीर झालाय खरा. पण मला वाटतं ३५० ची आघाडी घेवून ते निव्वळ मानसिक खच्चीकरणाचा खेळ करू पहात आहेत कारण आघाडी २०० असली कींव्वा ३०० असली तरी लंकेची हार अशक्य आहे. ऊरली भारताची हार, तर या खेळपट्टीवर भारताचे फलंदाज सहज दिड दिवस "ऊभे राहू शकतील" बहुदा याची जाणीव लंकेला आहे.
या जागी ऑसी असते तर ऊपाहाराच्या आधीच तोड फोड फलंदाजी करून ३०० ची आघाडी घेवून भारताला खेळायला दिले असते. मला वाटतं या एका बाबतीत ते ईतरांपेक्षा दोन पावले पुढे आहेत. कारण निव्वळ स्वताचा पराभव होवू नये याची सोय न करता, ते आपला विजय नक्की कसा होईल या दृष्टिने डावपेच खेळतात.
ऊपाहाराच्या आधी समजा सेहवाग वा गंभीर ला बाद करता आले असते तर भारतावर प्रचंड दडण आले असते. तेव्हा मानसिक दडपणाचाच खेळ करायचा तर लंकेने आधी डाव घोषित करून आपल्या गोलंदाजांन्ना जास्ती जास्त षटके मिळतील हे बघायला हवे.
तर भारताने केवळ मुरली ला लक्ष्य करून प्रतिहल्ला चढवला तर ईतर गोलंदाजी अपोआप कुचकामी ठरेल.
i remember sunny's ( gavasakar's) old mantra: play to the merrit of the ball.
on this pitch likely you will get 5 easy balls and one odd ball.

सचिन, द्रविड.. विरुध्ध मुरली ... भन्नाट रंगणार आहे...

>Sanjay Das: "The Sri Lankans are the real gentlemen of the game of cricket. They play their game quietly without fanfare, controversies, sledging, pre-match psychology and whatever else. Its just good clean cricket the kind I love. And they are doing very well in the rankings too. Certainly they are setting a good example."
पटलं.

योग.. एकदम जबरदस्त विवेचन.....

पण श्रीलंकेनी ७६० धावांवर डाव घोषित केलाय.. म्हणजे ३३४ धावांची आघाडी... भारताचा एकूण इतिहास बघात केवळ नशीब असेल तरच मॅच वाचेल... अर्थात तशी आशा करायला काहीच हरकत नाही आहे पण.. सगळ्याच 'जर... तर' च्या गोष्टी आहेत

हिम्स्,
खेळपट्टी खराब झाली नाही तर मला वाटतं सचिन, द्रविड, अन लक्षमण कंपनी यावर आरामात खेळतील.
there is no doubt about their capabilities and talent, only application is required...
गंभीर ने नांगर टाकायचा अन सेहवाग ने नेहेमीप्रमाणे ("स्वैर") फटकेबाजी करायची असे डावपेच दिसत आहेत. thats fine only if he plays to the merrit of the ball.
तूर्तास सेहवाग किती तग धरतोय हे पहायचं.. त्याच्या हातात तलवार आहे पण प्रत्त्येक चेंडू ला ती ऊपसून उपयोग नाही, ती कधी म्यान ठेवायची अन कधी पाजळायची ती विवेकबुद्धी (असलीच) तर त्याने वापरावी ही किमान अपेक्षा. अन्यथा हा प्राणी गेले अनेक मालिका आपल्या संघात काय करतोय असा प्रश्ण निश्चीत उभा रहातो.

अरे, चहापानाला भारत ७७/०, क्या बात है! (सेहवाग ४७, गंभीर २८)
सेहवाग असाच निश्चयाने अन धांदरट्पणा न करता खेळला तर दिवस संपेपर्यंत लंकेची धावांची मोठी मालगाडी अगदीच बारा डब्या एव्हडी वाटेल. Happy
(संगाकाराची क्षेत्ररचना मात्र अनाकलनीय आहे.. सेहवाग खेळतोय म्हणून काय झालं? deep field placement? ते पण ३००+ ची आघाडी असताना? २००९ ipl मधे दिल्ली कडून खेळायची सेटींग करतोय की काय? ):)

शक्य आहे का योग असे काही... गेला सेहवाग नेहमी प्रमाणे... बाराच्या भावात... कदाचित तिथे समोर सचिनच पहिजे त्याला समजवायला.. दुसर्‍या कोणाचे ऐकतच नसेल तो...
आता भिंत आलीये.. पहिल्या डावात खरे तर कोटा पूर्ण केलाय त्याने.. पण माहित नाही कदाचित दुसर्‍या डावात पण खेळेल...

गेला की भाउ- सेहवाग......
आता गंभीर्-द्रविड पैकी कोण धावचित होतय का ते पहायचं.. त्या बाबतीत दोघांचं कधीच जमत नाही.
द्रविड येतो तेव्हा सुरूवातिचा अर्धा तास मात्र दुसर्‍या फलंदाजाला फ्रस्ट्रेशन येतं.. द्रविड अगदी साध्या चेंडूंनाही डीफेंसिव्ह खेळतो अन अचानक समोरची गोलंदाजी चांगली वाटायला लागते अशाने दडपण येवू शकतं..
अशावेळी धावफलक हलता ठेवणं फार मोलाचं ठरतं. दिवस संपेपर्यंत व्यवस्थित खेळले तर १६०-१७०/१ असे व्हायला हरकत नाही.
बघुया काय करतायत..

द्रविड येतो तेव्हा सुरूवातिचा अर्धा तास मात्र दुसर्‍या फलंदाजाला फ्रस्ट्रेशन येतं.. द्रविड अगदी साध्या चेंडूंनाही डीफेंसिव्ह खेळतो अन अचानक समोरची गोलंदाजी चांगली वाटायला लागते अशाने दडपण येवू शकतं..>>>>
योग.. ह्या कसोटीत पहिल्या डावात द्रविडनी तू जे म्हणतो आहेस त्याला छेद द्यायचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि तो त्यात बर्‍यापैकी यशस्वी पण झाला... पण लेकाचा दुसर्‍या दिवशी लगेच बाद झाला.. नाहीतर कदाचित अजून वेगळे चित्र बघायला मिळाले असते...
अर्थात आज मॅच वाचवायची असे असल्यामुळे कदाचित पूर्वीचा द्रविड परत बघायला मिळू शकतो...

गेला रे पण पन्नास करून गेला.. >>> पण उपयोग काय त्याचा ह्या मॅच मध्ये.. खरे तर जितका वेळ जास्त खेळता येईल तितका वेळ खेळणे अपेक्षित होते. पण असो.. तो जायचा तो गेलाच...

>खेळता येईल तितका वेळ खेळणे अपेक्षित होते. पण असो.. तो जायचा तो गेलाच...
हो रे... अचानक icu मधला पेशंट पुन्हा रिकव्हर होतोय असे दिसत असतानाच त्याने "राम" म्हटला. फक्त त्याला अजून ईतक्यात "उचलणार" नाहीत एव्हडच Happy
>ह्या कसोटीत पहिल्या डावात द्रविडनी तू जे म्हणतो आहेस त्याला छेद द्यायचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि तो त्यात बर्‍यापैकी यशस्वी पण झाला... पण लेकाचा दुसर्‍या दिवशी लगेच बाद झाला.. नाहीतर कदाचित अजून वेगळे चित्र बघायला मिळाले असते...
अर्थात आज मॅच वाचवायची असे असल्यामुळे कदाचित पूर्वीचा द्रविड परत बघायला मिळू शकतो...
मान्य! पहिल्या डावात ज्ञानेश्वरांनी (का मुक्ताईने?) चालवलेल्या भिंती सारखा सुटला होता.

एकंदर प्रकार बघता, तुम्ही चूक करत नाही तोवर तुम्ही बाद होणार नाही अशी खेळपट्टी दिसतीये.

उद्या उपाहारापर्यंत बहुदा अजून ५०० धावा कुटल्या जातील अन तरिही आपला संपूर्ण डाव शिल्लक असेल.
थोडक्यात, पाच दिवसात २००० धावा, तरिही सर्व गडी बाद होवू शकत नाहीत असा सामना अनिर्णीत राहिला तर सर्वजण खेळपट्टीला दोष द्यायला मोकळे. असेही ही खेळपट्टी नुसती पाटच नाही तर "निर्जीव" आहे असेच एकंदरीत दिसते आहे. अन्यथा निदान खेळपट्टी मंद होते, किंव्वा खराब होते अन परिणामी फलंदाजी करणे अवघड होवून बसते. पण ज्या प्रकारे गंभीर अन द्रविड खेळत आहेत, ईथे एखाद दुसरा अचानक वळणारा वा खाली राहणारा चेंडू सोडता फार काही खेळपट्टीत जीव राहिला आहे असेही नाही.
(ही खेळपट्टी बनवणारा माळी ipl च्या खेळपट्ट्या बनवतो का भाऊ?) Happy

-----------------------------------------------------------------------------------
अरे हे काय द्रविड ला पायचीत लाटला की Sad तेही जेमतेम ४ षटक शिल्लक असताना?
शेवटी कंटाळून पंचांनीच सूत्र हाती घेतली की काय? Happy

Massive wicket for Sri Lanka and it changes the complexion of the game. India have sent out Amit Mishra as a nightwatchman. He's standing there, exposing all three stumps as Welegedara runs in Happy

End of over 41 (8 runs) India 177/2
A Mishra 4* (5b 1x4) UWMBCA Welegedara 8-0-30-1
G Gambhir 70* (115b 7x4) KTGD Prasad 8-0-42-0
_______________________________________
आयला मी जेव्हा जेव्हा अपडेट द्यायला लिहीलय तेव्हा गडी बाद झाला. हे काय jinx? Sad

योग मी लिहायलाच आलो होतो की वॉल पडली म्हणून.. आता पडली की पाडली ते प्रत्यक्ष री प्ले बघितला कीच कळेल. पण एक बरय व्यवस्थित रन रेट आहे त्यामुळे विकेट नाही टाकल्या तर भरपूर धावा होतील असे दिसते आहे...

अगदी.
मला तर ही खेळपट्टी कमी धावपट्टी अधिक वाटते आहे.. कुणीही या अन विमाने उडवा- धावांची अन विक्रमांची. Happy
या खेळपट्टीच्या माळ्याला मुंबई विमानतळची धावपट्टी दुरुस्त करायच्या कामावर लावला पाहीजे. जाम बिकट अवस्था आहे मुंबई च्या रनवे ची..

छे! फारच बोरींग खेळतायत राव...
लंका वाट बघतीये काधी फलंदाज चूक करतोय अन फलंदाज वाट बघतायत कधी षटके संपतायत...
पुन्हा एकदा पंचांनी सूत्रे हातात घेतली तर काहितरी घडामोडी होतील .. Happy
आता ऑसीज गोलंदाजी करत असते तर वेगळं चित्र पहायला मिळालं असतं का??

च्यामारी परत एक्दा अपडेट लिहीले अन गंभीर गेला की राव... सेहवाग सारखाच नको तिथे नको तेव्हा बडवायला गेला Sad
>_______________________________________
आयला मी जेव्हा जेव्हा अपडेट द्यायला लिहीलय तेव्हा गडी बाद झाला. हे काय jinx?
jinx is on....... तेव्हा सामन्यात बोर वाटायला लागलं की येवून अपडेट देतो Happy
------------------------------------------------------------------------
ज्या प्रकारे सचिन प्रत्त्येक चेंडू ला पाय लावतोय ते बघता, लवकरच साहेब स्वताला पायचीत करून दाखवतील यात शंका नाही. २० वर्ष आणि सर्व विक्रम नावावर असताना याने असं का खेळावं तेही अशा निर्जीव खेळपट्टीवर... खेळायला आल्यापसून त्याची body lanaguage प्रचंड बचावातमक वाटते Sad
हा अती बचाव नडाणार आहे बॉस..

योग्या.. शुभ बोल की...
असाच सारखा बोर झालास आणि दर पंधरा मिनिटानी अपडेट देत राहिलास तर आपण मॅच नक्कीच हारू... त्या दृष्टीने गंभीर साहेबांनी वाटचाल करुन दिलीच आहे...

Pages