विडंबन

साद (२०१२ ची)

Submitted by देवा on 13 August, 2008 - 03:16

प्रेरणा: पुलस्तिची गझल--- पडसाद
आणि मायबोलीवरचा एक सुपरिचित BB

एक दुर्री तीन अठ्ठा, साद नि प्रतिसाद आहे
केवढा व्यासंग त्यांचा हासवांची दाद आहे

कोणत्या टक्क्यात मी? का? ते मला कळलेच नाही
केवढे संदर्भ त्याला अन जुना प्रवाद आहे

गुलमोहर: 

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी..!

Submitted by मी अभिजीत on 31 July, 2008 - 03:21

दिल्लीच्या दरबारामधली राजा आणिक राणी.
हरता हरता डाव जिंकला बनली एक कहाणी..!

राजा वदला कशी बिनसली "न्युक्लिअर डील" ची भाषा.
माझ्या नशीबासवे खेळती या "पंज्याच्या रेषा.
त्या राणीच्या डोळा पण ना दाटून आले पाणी ..! ..१

गुलमोहर: 

(दूर आहे डेडलाईन अजूनि)

Submitted by संदीप चित्रे on 30 July, 2008 - 17:00

('तरूण आहे रात्र अजूनि' हे गाणं एका सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरच्या नजरेतूनि)

दूर आहे ‘डेडलाईन’ अजूनि, साहेबा पेटलास का रे....
एवढ्यातच मानगुटीवर, तू असा बसलास का रे....

अजूनही सुकल्या न कागदी, रिक्वायरमेंटच्या ओळी

गुलमोहर: 

तुझ्या गळा, माझ्या गळा..!

Submitted by मी अभिजीत on 29 July, 2008 - 09:13

तुझ्या गळा, माझ्या गळा,
सीबीआय चौकशीच्या माळा.

दाद मागायची कोणाला ?
चला रे आता कोर्टात चला.

तुज "पोटा", मज "मोक्का".
आणखी "टाडा" कोणाला?
लाज वाटते का तुम्हाला ?
मला कुणाची, देशाला.

तुझ्या गळा, माझ्या गळा.
सीबीआय चौकशीच्या माळा.

गुलमोहर: 

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही..!

Submitted by मी अभिजीत on 25 July, 2008 - 02:59

(अबू सालेम त्याच्या साथीदाराला ऐकवतो)

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही.
क्रिकेटला शारजाला पोचायचा दाऊदही.

कळेना भारताला कराचीत की दुबईत तो,
कसा होता नि नव्हता व्हायचा दाऊदही.

मधूनच जाग जेव्हा येई इंटरपोलला,

गुलमोहर: 

तुझ्यासाठी

Submitted by कौतुक शिरोडकर on 12 July, 2008 - 01:02

मी तोडले चंद्र तारे तुझ्यासाठी
मी मोडले रितीरिवाज तुझ्यासाठी
त्या गुन्ह्यांची भोगतो शिक्षा आज
किचनमध्ये रात्रंदिवस असतो तुझ्यासाठी

गुलमोहर: 

दिवस असे की...

Submitted by nikhilmkhaire on 28 June, 2008 - 02:22

दिवस असे की पगार होत नाही
अन् खायला भाकर नाही

फाटक्या तुटक्या छत्रीखाली भिजतो
कागद- काडी चाऊन थुंकून देतो
चाऊन चाऊन भूक भागत नाही
त्या चावणे म्हणवत नाही
दिवस असे की पगार होत नाही....

पैशाचे हे एकसंधसे तुकडे

गुलमोहर: 

भ्रष्टाचार

Submitted by MOHAN DHAVALIKAR on 25 June, 2008 - 05:18

भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार असतो.
तुमचा आमचा सेम नसतो
काय म्हणता?
हे कस शक्य आहे?
असु द्या
तरी सुध्दा,
तुमचा आमचा सेम नसतो.
मराठीतुन करप्शन म्हणत
हिन्दीतुन भ्रष्टाचार म्हणत
करप्शन करता येत

गुलमोहर: 

पवार आयपीलात रमला गो नाखवा

Submitted by सत्यजित on 8 June, 2008 - 14:13

चालः गोमू माहेरला जाते गो नाखवा..

पवार आयपीलात रमला गो नाखवा
ह्याला देशातले शेतकरी दाखवा

संसाराची आमच्या झाली होळी
IPLवर भाजतोय करोडोची पोळी
हा भाजतोया करोडोची पोळी
ह्या शेतकर्‍यांना विष तरी चाटवा..

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विडंबन