बेंच आहे साक्षिला

Submitted by कौतुक शिरोडकर on 16 July, 2009 - 03:43

वेळ जागे, रांग लागे, क्लर्क नयनी त्रागला,
बेंच आहे साक्षिला, बेंच आहे साक्षिला
झोपण्याचा छंद आहे, शासनाच्या राशीला,
बेंच आहे साक्षिला, बेंच आहे साक्षिला !

फॉर्म हा छापला, हा कधी का बोलतो ?
एकही, ओळ ती, वाचणारा पोळतो
छापखान्यांच्या चुकांनी, मेंदु सारा कुंथिला !

सोसतो, भोगतो, जो सुखाने यंत्रणा
हाय.. मग चोळतो, तो खुणांच्या वंगणा
आज लाचेने ढिगारी, मार्ग सहजी शोधिला !

(सगळ्या मान्यवरांची दंडवतासह क्षमा मागून.)

गुलमोहर: 

मला वाटल सॉफ्टवेअर वाल्यांचा बेंच की काय.. Happy छान आहे!!!

सॉफ्टवेअर वाल्यांचा बेंच की काय >>> अगदी अगदी सत्यजित Happy
पण हे विडंबन छान आहे Happy

मस्तच, चालीसकट म्हणून बघिटली . Happy
धनु.

मस्तच.. मी पण म्हणुन पाहिली चालीसकट (मनातल्या मनात)

नुसतीच विडंबनं करायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंयस का? Uhoh
बाकीचं लिखाण विसरलास की काय?
बास आता हे Sad