नमस्कार,
ही कविता मला "देव म्हणजे काय" या बाफ वर चर्चा वाचुन सुचली होती (काही वर्षे झाली त्याला बहुतेक). तेव्हा ती वाहत्या पानावर होती म्हणुन कोणी वाचली नव्हती.(असा मी माझा समज करुन घेतला :)) म्हणुन आता परत पोस्टत आहे.
दोन संदर्भः
१. यातील "स्वार्थाचा चष्मा" ही उपमा नंदिनीच्या "विठ्ठल तो आला आला" या अप्रतिम लेखातुन घेतली आहे. आभार नंदिनी!
२. त्या बाफवर कोणीतरी संतांना साक्षात्कार झाला होता म्हणजे संतांचा "केमिकल लोच्या" झाला होता (आठवा :लगे रहो मुन्नाभाई.. :)) असे लिहिले होते.
---------------------------------------------
देव म्हणजे देव म्हणजे देव असतो..
तुमचा आणि आमचा अगदी सेम असतो..
ख्रिस्ती लोक "गॉड" म्हणुन हाक मारतात
मुस्लीम लोक "अल्लाह" म्हणुन साद घालतात
भाषा वेगळी असली तरी देव तोच असतो
बाहेर तो दिसत नाही त्याला आत पहावा लागतो
समर्थाना राम म्हणुन भेटला
मीरेला श्याम म्हणुन भेटला
मला भेटायला मात्र तो कधीच येत नाही
कारण माझ्या डोळ्यावरचा स्वार्थाचा चष्मा
मी कधीच काढत नाही..
कोणी म्हणतात देवाची मला गरज पडत नाही
कारण त्याच्यावाचुन माझे काहीच अडत नाही
गरजेपोटी केली त्याला भक्ती म्हणत नाहीत
जीवन जगण्याची त्यातुन शक्ती मिळत नाही
देव म्हणजे देव म्हणजे देव असतो..
"यांचा" आणि आमचा मात्र सेम नसतो..
सहांच्या ताब्यातुन सुटल्याशिवाय देव दिसणार नाही
कितीही अवडंबरे केली त्याला देव फसणार नाही
देव अनुभवायला आहे एक उत्तम उपाय
अहंकार फेकुन देउन धरायचे सद्गुरुंचे पाय
आता देवा तुझ्या चरणी आहे एकच प्रार्थना..
संतांचा केमिकल लोच्या केलास तसा माझा पण कर ना...
देव म्हणजे देव म्हणजे देव असतो..
तुमचा आणि आमचा अगदी सेम असतो..
देव म्हणजे
देव म्हणजे देव असतो..
तुमचा आणि आमचा अगदी सेम असतो.. >>>
लय भारी ............. एकदम चाबुक......:)
आमच्याकडुन तुम्हाला .... नी
''संतांचा
''संतांचा केमिकल लोचा केलास तसा माझा पण कर ना'' हे जास्त आवडल .कविता छान .
भा.पो.
भा.पो. आवडली कविता
--------------------------------------------
गेला क्षण हा काल असे, उद्या न वेड्या येत असे
नव्या उषेचे गाणे गात, आज आजची करुया बात
मनोज, कविता
मनोज,
वॉव!
कविता वगैरे एकदम?
जमेश खन्ना... पण काहीच्या काही मध्ये का टाकली आहेस?
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
छान !
छान ! भा.पो.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
देवा रे
देवा रे देवा !!!
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे
मस्तच!!
मस्तच!! ...काहीच्या काही मधे टाकण्यापेक्षा विडंबन मधे जास्त उचीत.IMO
________________________________________
प्रकाश
सगळ्यांचे
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार. चला कोणीतरी वाचली तरी
कविता "विडंबन" मधे हलवली आहे.