Submitted by जादुगर on 20 July, 2009 - 09:57
' ती '
तूचं ती, जीने मला
प्रेम करायला शिकवलं.
दुसर्यांना रडवतांना
स्वत: ला हसयला शिकवलं.
तूचं ती, जीने मला
फुलपाखरा सारखं उडायला शिकवलं.
आकाशाची उंची गाठण्यासाठी
आड्याला लटकायला शिकवलं.
तूचं ती, जीने मला
स्वप्नांच्या दुनियेत नेलं
स्वप्न बघता बघता
झोपेत घाबरुन उठायला शिकवलं
तूचं ती, जीने मला
जगण्यास उदयुक्त केलं
शेणाच्या हातांनी तुझ्या
माझ्या कानशिलात मारलं.
तूचं ती, जीने या
पथ चुकलेल्यास
पुन्हा मार्गावर आणलं
जीवनात कसं ठगायचं
हे पदोपदी शिकवलं.
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे ही
छान आहे ही कविता.
पण ही "कविता" या विभागात टाकावयास हवी होती.