तू नसतास तर.....

Submitted by कौतुक शिरोडकर on 19 May, 2009 - 16:04

(मुळ कविता येथे वाचा. http://www.maayboli.com/node/7885. उमेशराव तुमची, तिची आणि तुमच्या कवितेवर प्रतिसाद देणार्‍याची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. पुढचे सहा महिने तरी कुणाला भेटायचा चान्स नाही. वाचलो !!!)

ए, ऐक ना!
माहीत आहे रे, नेहमी तूच ऐकतोस ते,
पण आज अगदी मनापासून,
तुला बसवत तुझ्याकडे एकदा बघतांना....
एकदम विचार आला...
तू नसतास तर ?.......आयुष्यात?
एकदम कसेच झाले बघ!
खरंच तू नसतास तर.....
कोणी भरले असते पाणी एव्हढ्या सकाळी सकाळी ?
तुझे ते स्वतःच डबा बनवणे...
कपडे आणि भांडी त्यातच उरकून टाकणे.....
माझ्या झोपाळूपणाचेही...किती कौतुक करणे,
खरंच तू नसतास तर?
कोणी म्हटले असते? ऑफिसमधून थकून आल्यावरही..
माझ्या ऐसपैस पसरलेल्या देहावर हलकेच पंखा फिरवून,
"बरे वाटत नाही का गं? थांब, मी करतो कॉफी"
खरेच तू नसतास आयुष्यात तर?
मिळाले असते? एव्हढे ताजे, गरम, चविष्ट जेवण?
अगदी टाकाऊ तुझे आईबाबा!
आणि.... मी बरोबर हाकलले त्यांना...
फुकटचे... ओझे घरातले!
किती ओढाताण झाली असेल ना माझी?
खरेच तू नसतास तर?
कोणी केली असती एव्हढी काळजी?
माझ्या खाण्याची...पिण्याची...स्वतःवरच भुलण्याची?
आणि तू मात्र....
माझं ब्लीच... फॅसियल...मेकअप...ब्युटीपार्लर....
सगळं... माझा सुंदरपणा समजून सांभाळून घेतलंस! हसत हसत,
तुझ्या खिशाला कापणारे शॉपिंगही!
तू नसतास तर?
कोणी समजावलं असतं मी पत्त्यात हरल्यावर?
मुसमुसणार्‍या मला, माझ्या रागाला, रडण्याला,
लहान मुलासारखं, मांडीवर हलकेच थोपटत,
हसवत हसवत, अजून खेळायला पैसे देत!
तू नसतास तर?
केलं असतं कोणी सहन?
माझं वेड्यासारखं.... घरातल्या न सापडणार्‍या....
माझ्या वस्तूंना शोधणं...... तुलाच सांगून,
तुला राबत ठेवून.... नोकरासारखं!
मात्र आता... आयुष्याच्या संध्याकाळी,
'तू नसतास तर' ... या अतीफालतू विचाराने...
मला आळस येऊन्...सुकलेल्या तुझ्या हातांवर....
अंगाचं ओझं टाकत... ताणून,
एव्हढेच बोलू शकते,
मी... दुसरा कुणी पाहीला असता रे!!

गुलमोहर: 

कौतुकराव Biggrin
एव्हढेच बोलू शकते,
मी... दुसरा कुणी पाहीला असता रे!!
सही आहे!!

*******************************************
बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते,व्याकुळ होते,तीळ तीळ तुटते,खोल कुठे गलबलते

ते आईवडीलांबद्दलचं सोडलं तर हे अगदी वहिनींचे विचार वाटताहेत कौतुक, नाव फक्त तुझं आहे का?
नाही वहिनींचा माबोवर अजुन आय. डी. नाही ना म्हणुन म्हटले. आयला म्हणजे कौतुकशिरोडकर हा वहिनींचा डु आय झाला की! Biggrin

***********************************
मनामधली कविता घेऊन, कागद माझा उडतो आहे,
उतरेल त्याच प्रदेशात, चंद्र जेथे बुडतो आहे !!

Rofl आवडलं हे ..
-------------------------------------------------------------------------
मन की गली तू फुहारों सी आ
भीग जायें मेरे ख्वाबों का काफीला
जिसे तू गुनगुनायें मेरी धून है वही ....

हसून हसून डोळ्यांत पाणी आले रे कौतुक. अरे निदान दोन दिवस लोकांना माझी कविता नीट वाचू तर द्यायची. आता कोण वाचणार ती? मानलं गुरु!
.............................................................................
मला हे माहित आहे की मला काहीच माहित नाही. पण त्यांना तर हे ही माहित नाही की त्यांना काहीच माहित नाही! (सॉक्रेटिस)

Biggrin कौतुके आता भुमीगत आहेस काय ? Lol

उमेश, निदान यामुळे आणखी चारजण वाचतील तरी. मी फक्त तुझी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. वहिनींना नमस्कार सांग.
प्रकाश, लवकरच होईन. प्रतिसाद वाचल्यावर.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

कौतुक, तू पुण्यात आल्यावर तुझे काही खरे नाही!
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" कौतुकराव, हे असलं लिहायचं देखिल चोरी होते आहे आता. सरळ सरळ धमक्या देवू लागलेत लोक. बाकी विडंबन अगदी खासे! "

येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!>>

लस टोचा अँटी माबोची !

***********************************
मनामधली कविता घेऊन, कागद माझा उडतो आहे,
उतरेल त्याच प्रदेशात, चंद्र जेथे बुडतो आहे !!

इथे तरी कुठे खरं आहे.
येता कणकण विडंबनाची
ढापा कविता दुसर्‍याची
हे असं करत राहीलो तर लवकरच स्वतःचा विडंबन ब्लॉग काढावा लागेल. (त्रास )

.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

रचु विडंबन कौतुके Happy

लय फर्मास रे भाव Happy
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

मुळ कवितेहुन विडम्बन मस्त

गौरे, ओळख असू दे हो.
.............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

Rofl लै भारी !!!

========================
बस एवढंच!!

काय हे ! अगदी विटंबनाच !!

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

खरच मस्त आहे. आपल्याला तर खुप आवडले.

जबरद्स्त कविता सहीच एकदम ........................!

मी... दुसरा कुणी पाहीला असता रे!! :

ha ha ha ha ha ha ha

ए़खादी कविता वाचून तीच्यात गुंगत जाणं वेग़ळं आणि कवीता वाचून त्यातून बाहेर येउन वेगळा विचार करणं वेगळं.

विडंबनामागच्या तुमच्या विचारशक्तिला सलाम.