Submitted by कौतुक शिरोडकर on 16 July, 2009 - 13:00
वरुण आहे स्वस्थ बसुनी, पावसा निजलास का रे?
एवढ्यातच नच कळेना, तू असा दमलास का रे?
अजुनही थकल्या न नयनी आसवांच्या मेघमाला;
अजुन मन थकले कुठे रे? हाय ! तू थकलास का रे?
सांग, ह्या सुस्तावलेल्या अंकुराला काय सांगू ?
उमलते अंगांग धरणी... आणि तू मिटलास का रे?
बघ तुला पुसतोच आहे पश्चिमेचा मेघ काळा
राबणार्यांच्या तनाचा गंध तू लुटलास का रे?
उसळती शेतात त्यांच्या नापिकीच्या क्रुद्ध लाटा
तू उकाड्यासारखा पण कोरडा उरलास का रे?
मोट अजुनी बंद का रे? धार ही अतिमंद का रे?
बोल, मातीच्या मुलांवर तू असा रुसलास का रे?
(भटसाहेबांचे चाहते आणि भक्त ... मला गंभीरपणे घेणार नाहीत असा विश्वास आहे.)
गुलमोहर:
शेअर करा
झकास
झकास कौतुकराव, सुस्तावलेल्या ऐवजी धास्तावलेल्या कस वाटेल हो ?
खरोखरच
खरोखरच सुंदर जमले आहे विडंबन
भट साहेबांचा ग़झलचा बाज अर्थासह सुरेख उचलला आहे
छान वाटले वाचताना
पहिल्या
पहिल्या दोन ओळी एकदम सही जमल्या आहेत.
बाकीही चांगलेच आहे, पण गंभीर व्हायला होते.