ताटात भात, तो श्यामभात, पाहता नजर थरथरते
ओतून दाळ, विसरून गाळ, ही लाट कशाला बघते
या सप्तचवीच्या भाजीवरुनि दाद मागते बाई -
दादा तू आवरी, वहीनी, दादा तू आवरी !
कोरड्या कोरड्या रोटीची, वेगळी कृती बघताना
चित्र चित्र त्यांच्यामधूनी, आकळणारे फुलताना
हा करपटलेला, गंध चुलीचा, नाकास बिलगून जाई
ह्या वातड कडा, गुज दातांचे, कानी सांगून जाई
या सप्तचवीच्या भाजीवरुनि दाद मागते बाई -
दादा तू आवरी, वहीनी, दादा तू आवरी !
आज इथे या तुझ्या घरी, खिर गोडाची आठवतो
चव काढावी जाताना, असे काही नाही, पळतो
रस पाचकी ठरे, निष्फळ यावरी, पोट करीते घाई
हे जेवण सारे, कसे पचावे, दादा समजून घेई
या सप्तचवीच्या भाजीवरुनि दाद मागते बाई -
दादा तू आवरी, वहीनी, दादा तू आवरी !
(माबोकरांनो, स्वप्नील बांदोडकर आणि या गाण्याच्या सगळ्या संबधित व्यक्तींची मी नेहमीप्रमाणे माफी मागून हे पोस्टवतोय.)
शॉल्लिट!!! म
शॉल्लिट!!!
मस्तच!!!
जबरदस्त!!!
प्राजु
http://praaju.blogspot.com/
लै भारी रे
लै भारी रे कौतुक
कौतुक,
कौतुक, हसून हसून डोळ्यांत पाणी आले रे बाबा. नको एव्हढे वास्तविक लिहित जाऊस.
..............................................................................
मला हे माहित आहे की मला काहीच माहित नाही. पण त्यांना तर हे ही माहित नाही की त्यांना काहीच माहित नाही! (सॉक्रेटिस)
(No subject)
व्वा ....
व्वा .... मस्त जमलिय भट्टी!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
सप्तचवीच्
सप्तचवीच्या भाजीवरुनि दाद मागते बाई >>>
कौतुक, जळजळीत विस्तव(वास्तव) मांडणी !
(No subject)
या
या सप्तचवीच्या भाजीवरुनि दाद मागते बाई
ही ओळ तुफान आहे.
फक्त मी ती " ह्या सप्तचवीच्या भाजीलाही" अशी म्हटली. चव वाढवण्यासाठी.
एकदम
एकदम मस्तं, मी लिन्क फॉरवर्ड पण केली तुम्हाला न विचारता,
मला आता मायबोलीचा पी आर ओ म्हणतात त्यातले काही
एकदम
एकदम भारी!!!
Top to bottom!!
**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************
कौतुक
कौतुक मस्तच. मी चालीत म्हणुनहि बघितली...छानच
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....
आभार
आभार सर्वांचे.
गुरूजी, तुमचं म्हणणं चवदार. मी फक्त मुळ गाण्यातले जास्तीत जास्त शब्द 'जैसे थे' ठेवण्याचा प्रयत्न केला.
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
गुरुवर्य,
गुरुवर्य, चरण स्पर्ष !
भयानक
भयानक भन्नाट लिहिलय्स, सॉलिड
चालित
चालित म्हणुन बघितल ,परफेक्ट
वार्याची
वार्याची बात !
वार्यावरची नाही !! ---
"झन्नाट! "
चालीत मस्त
चालीत मस्त चाललीय !
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
अरे सही !!
अरे सही !! मज्जा आली
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
मस्त्.....मस्त्.........आणि
मस्त्.....मस्त्.........आणि मस्तच........
नादखुळा... जबरी आहे एकदम !!
नादखुळा... जबरी आहे एकदम !!
कौ, चाल लावून मनात गाऊन
कौ,
चाल लावून मनात गाऊन पाहिलं विडंबन
सोल्लिड जमलंय
भारी <<चाल लावून मनात गाऊन
भारी
<<चाल लावून मनात गाऊन पाहिलं विडंबन हाहा>>
मीपण.....
भारी
भारी
लई भारी राव!
लई भारी राव!