मराठी गझल

जिंदगीस वाट विचारत श्वासांनी प्रवास केला!

Submitted by सतीश देवपूरकर on 27 June, 2012 - 10:34

गझल
जिंदगीस वाट विचारत श्वासांनी प्रवास केला!
घेवून किनारा सोबत लाटांनी प्रवास केला!!

अव्याहत ऎकू येते नि:शब्द हाक कोणाची?
पांगळे तरीही माझ्या शब्दांनी प्रवास केला!

झुंडीवर झुंडी आता चालतात त्यांच्या मागे.......
पण हयातभर एकाकी शिखरांनी प्रवास केला!

माझ्या तुझ्यात आकाशा! हाकेचे अंतर होते;
तुजसाठी युगे युगे मी पायांनी प्रवास केला!

व्रण झाले फिके परंतू सल तसेच उरले मागे;
कोणाला कळू न देता जखमांनी प्रवास केला!

नादातच त्याच्या त्याच्या सुख आले अन् गेलेही;
मग माझ्या बरोबरीने दु:खांनी प्रवास केला!

किलकिली तरी कर दारे अन् खिडक्या तुझ्या मनाच्या

गुलमोहर: 

' शब्दांच्या या ढिगार्‍यात.....!'

Submitted by सुधाकर.. on 27 June, 2012 - 10:21

तुला वाटले मी शूर होतो.
दु:खापासुनी मी दुर होतो.

असले जरी हे शाबुत खांदे,
दैवाचा, घोडा कुणास फितूर होतो?

जिंकला नाही मी आखाडा,
तरी खलांना, भयाचा मी पुर होतो.

तुला वाटले सुखाचा मी सूर होतो.
शब्दाविना तसा मी निसूर होतो.

तु मागतेस दान चांदण्यांचे.
तेंव्हाच कसा चंद्र, निष्ठूर होतो?

कधी माझ्याचवरचा राग ही,
तुझ्या रूपाचा चांदणी नूर होतो.

दु:खाशी लढणारा नि:शस्त्र मी विर होतो.
अन् तुला वाटले अजिंक्य मी शूर होतो.

स्वप्नातल्या त्या मुलूखाचा मी वजीर होतो.
शाश्वताच्या जगापासूनी मी दूर होतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नजराणा

Submitted by devendra gadekar on 27 June, 2012 - 04:30

मी दिलेला तुला तो, नजराणा चुकला होता ?
की देताना दिलेला, बहाणा चुकला होता ?

आई अन बाबा तुझे तसे ज्ञानी होते की,
भेटलो जिथे तुला, तो ठिकाणा चुकला होता?

दोष ना दिला तुला मी, जरी तू फसविले मला,
लोक बोलले मज तूच शहाणा चुकला होता .

माझे नशीब बलवत्तर जखमी झालो नाही
की आज तुझा जरासा निशाणा चुकला होता ?

सांग मला तू प्रेम कमी झाले होते तेंव्हा,
की जन्मलो जिथे तोच घराणा चुकला होता ?.

देवेंद्र गाडेकर

गझल शिकतोय त्यामुळे चुका भरपूर असतील ..
मार्गदर्शन करावे चुकावर हि विनंती

गुलमोहर: 

अश्रूंचा ओला कचरा ... गालावर वाळत राहो

Submitted by बेफ़िकीर on 26 June, 2012 - 04:35

गतकाळ कोरडा मलिदा... हृदयाला जाळत राहो
अश्रूंचा ओला कचरा... गालावर वाळत राहो

घुसमटत्या अस्तित्वाला शोभेल असा मोसम दे
पाऊस पडो ना येथे... नुसते आभाळत राहो

खपली धरण्याची आता आकांक्षा उरली नाही
उपचार करा जो माझ्या जखमा कुरवाळत राहो

निष्कलंक व्यभिचाराला देवत्व असे मी द्यावे
चारित्र्यवान व्यक्तीची चर्या ओशाळत राहो

ती जाणारच असल्याने मी फार अडवले नाही
ज्या घरी रमत नाही ती... ते घर सांभाळत राहो

हा आठवणींचा संचय मी असा उगाळत आहे
की जणू भिकारी त्याचे पैसे न्याहाळत राहो

दे आळस तू... मग वारा... तो धाड तिकडचा इकडे
विरहाच्या कैदेवरती गंधाची पाळत राहो

गुलमोहर: 

कपात माझ्या

Submitted by निशिकांत on 26 June, 2012 - 02:42

वादळ आले आणी विरले कपात माझ्या
कधीच धडधड झाली नाही उरात माझ्या

तुझा हात हातातुन सुटता अजब जाहले
काळ थांबला सरकत नाही घरात माझ्या

कांगारूसम पोटी धरुनी वाढवले पण
दूर जायची आस जागली पिलात माझ्या

खळे संपले तसे उडाले पक्षी सारे
अता सुनेपण वस्तीला वावरात माझ्या

कलियूगी पण दशरथ दिसती पुत्रवियोगी
दु:ख जयांचे लिहितो मी अक्षरात माझ्या

आनंदाने श्रोते देती टाळ्या जेंव्हा
दु:ख मनीचे फुलून येते सुरात माझ्या

भाव घालती आभाळाला जरी गवसणी
रोज गिरावट होतच असते दरात माझ्या

उजाड कोठी, रोज मैफिली, मुजरे, गाणे
हमिदाबाई जुनीच ताजी मनात माझ्या

चारोळ्या अन् नवकाव्याची अशी सुनामी!

गुलमोहर: 

नभी मेघ हिंडायचे बंद झाले

Submitted by कु. कमला सोनटक्के on 25 June, 2012 - 13:56

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/35891

नभी मेघ हिंडायचे बंद झाले
नहाणे फुका आमचे बंद झाले

गजल येत नाही खयालात आता
मला काफिये व्हायचे बंद झाले

निवडणूक ती काल होऊन गेली
पुढारी घरी यायचे बंद झाले

घरी चालल्या आज पाटील बाई
विदेशी सहल जायचे बंद झाले

अयोध्या बुडाली व सेतू उडाला
'कमळ' राम बोलायचे बंद झाले

गुलमोहर: 

का तिला इतका बिलगतो पावसाळा

Submitted by मयुरेश साने on 25 June, 2012 - 13:28

........ जाळणारा जळवणारा पावसाळा............

पावसा रे हा तुझा भलताच चाळा
का तिला इतका बिलगतो पावसाळा

मळभ इतके कोठुनी घेऊन येतो
कूळ काळे पावसाचा जन्म काळा

हा ॠतू आहे निसरड्या पावलांचा
मग कशाला सभ्यतेचे नियम पाळा

खेळ पट्ट्यांनाच तो भिजवून जातो
शेतकी साठी कितीही जीव जाळा

दाटतो अलगद तिच्या डोळ्यामधे अन्
ओलसर करतो मनाचा पोटमाळा

...........मयुरेश साने....

गुलमोहर: 

आलंगुनी तटाला, उध्वस्त लाट होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 June, 2012 - 10:38

गझल
आलंगुनी तटाला, उध्वस्त लाट होते!
प्रेमात गुंतले की, जगणे पिसाट होते!!

घनदाट जंगलांनी, आम्हास हे शिकवले....
पाऊल टाकले की, पाऊलवाट होते!

असते किती जणांना, अवगत कला जिण्याची?
थोड्याच माणसांचे जगणे विराट होते!

होती उभी दुतर्फा, दु:खे दरीप्रमाणे;
सुखही समोर होते, तेही अचाट होते!

साक्षात सूर्य आला जन्मास माणसाच्या!
जातो जिथे जिथे तो, तेथे पहाट होते!!

कोड्यासमान माझे आयुष्य क्लिष्ट होते;
मोजून श्वास होते, गुंते अफाट होते!

जे काय खाचखळगे होते...मनात होते;
माझेच लक्ष नव्हते...रस्ते सपाट होते!

माझ्या घरीच केला मुक्काम पावसाने;

गुलमोहर: 

आलंगुनी तटाला, उध्वस्त लाट होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 June, 2012 - 10:38

गझल
आलंगुनी तटाला, उध्वस्त लाट होते!
प्रेमात गुंतले की, जगणे पिसाट होते!!

घनदाट जंगलांनी, आम्हास हे शिकवले....
पाऊल टाकले की, पाऊलवाट होते!

असते किती जणांना, अवगत कला जिण्याची?
थोड्याच माणसांचे जगणे विराट होते!

होती उभी दुतर्फा, दु:खे दरीप्रमाणे;
सुखही समोर होते, तेही अचाट होते!

साक्षात सूर्य आला जन्मास माणसाच्या!
जातो जिथे जिथे तो, तेथे पहाट होते!!

कोड्यासमान माझे आयुष्य क्लिष्ट होते;
मोजून श्वास होते, गुंते अफाट होते!

जे काय खाचखळगे होते...मनात होते;
माझेच लक्ष नव्हते...रस्ते सपाट होते!

माझ्या घरीच केला मुक्काम पावसाने;

गुलमोहर: 

अव्याहत चालायाचे पायांनी कबूल केले!

Submitted by सतीश देवपूरकर on 24 June, 2012 - 03:55

गझल
अव्याहत चालायाचे पायांनी कबूल केले!
क्षण एक एक जगण्याचे श्वासांनी कबूल केले!!

त्या पहिल्या भेटीमधले, संभाषण मौनामधले;
जे मनात होते ते ते, डोळ्यांनी कबूल केले!

ह्यामुळेच झालो राजी; मी गझला लिहिण्यासाठी,
ह्रदयास थेट भिडण्याचे शब्दांनी कबूल केले!

दिसतात जगाला काटे मी म्हणू लागलो तेव्हा;
ह्रदयातच घर करण्याचे काट्यांनी कबूल केले!

काळजात अजुनी माझ्या तेवते ज्योत स्वप्नांची,
तिमिरात हात देण्याचे स्वप्नांनी कबूल केले!

वैराण माळही क्षणभर बहरला मनाने थोडा;
ना चुकता बरसायाचे मेघांनी कबूल केले!

मी दिले सुकाणू माझे लाटांच्या हातामध्ये;

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल