मराठी गझल

''येत जा देवून थोडी कल्पना'' तरही गझल

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 14 June, 2012 - 05:07

येत जा देवून थोडी कल्पना
वादळा उध्वस्त केले मन्मना

हे करु वा ते करु की ते करु?
केवढ्या माझ्या मनाच्या वल्गना

तीच ती सांभाळते आता मला
पाचवीला पूजलेली वेदना

कालपावेतो अजेयच राहीलो
आज कोणीही करावा सामना

भावना समजून घे....... काही नको
साधना,आराधना वा याचना

व्यक्त होणे वेदनाप्रद जर खरे??
सोसतो ''कैलास'' कोठे यातना?

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

येत जा देवून थोडी कल्पना.....(तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 14 June, 2012 - 03:19

'हे सख्या मॄत्यो ! पुरव ही कामना'
येत जा देवून थोडी कल्पना

ध्वस्त झालेल्या मना समजावते...
वादळापूर्वी करावी प्रार्थना !

सांगताना सांगते 'आहे बरी !'
बोलण्याची ही प्रथा आहेच ना ?

काढतो पळवाट जो, तो जिंकतो..
कायद्याची ही नवी संकल्पना !

पावसाने ध्वस्त व्हावे गाव...अन...
वेधशाळा वर्तवी संभावना !

जन्म-मॄत्यूतील अंतर वाढणे
ही 'प्रिया'च्या जीवनाची वेदना

-सुप्रिया.

गुलमोहर: 

तरही गझल - येत जा देऊन थोडी कल्पना

Submitted by रसप on 14 June, 2012 - 00:08

येत जा देऊन थोडी कल्पना
देत जा येऊन थोडी सांत्वना

ओसरीच्या कंदिलासम पेटलो
ना घराची वा नभाची कामना

भांडलो अन जिंकले दुनियेस मी
आज पण आहे स्वत:शी सामना

पत्थराला देव म्हणती माणसे
माणसे दिसण्यास लागे साधना

जीवनी ह्या लाभली सारी सुखे
अन तरी दु:खात माझी वासना

पोर फेके पोटची कचऱ्यामधे
माउलीला त्या कशाची वंदना?

वाढले पेट्रोलचे दर आणखी
जाळतो गाडीस ओतुन इंधना !

....रसप....
१३ जून २०१२
(तरह - "येत जा देऊन थोडी कल्पना")

गुलमोहर: 

"...गझल एकच होऊ दे "

Submitted by सुधाकर.. on 13 June, 2012 - 11:03

तुझ्या माझ्या श्वासांची गझल एकच होऊ दे,
शब्द सुरांच्या वळीवात मला आज न्हाऊ दे.

नव्या प्रितीची नवी रित आम जगात वाढू दे,
दान देणार्‍या दैवाचे ही मला पांग फेडू दे.

शब्दांच्या या झुल्यावरून आभाळ कवेत घेऊ दे,
सुर्यासमान कणा कणाने अग्नीकुंडात जळु दे.

गझल धुंद मी असा, मज स्वरासंगे जाऊ दे,
साखळलेल्या दु:खाला ही प्रवाहात वाहू दे.

भलत्या-सलत्या स्वप्नांची ही मुळं आज शोधू दे,
दु:खावरचा दवा अशी, गझल एकच होऊ दे.

Abstract Painting_0.jpg.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे (तरही)

Submitted by इस्रो on 13 June, 2012 - 09:05

तुझ्यामुळे जीवनात माझ्या सदाफुलीसम बहार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

समानतेच्या कुणी कितीही दिल्या जरी घोषणा नव्याने
गरीब-श्रीमंत, सान-मोठा न संपणारी दरार आहे

युगायुगाची करीन सोबत दिले तयाने वचन मला अन
मनास माझ्या जखम करुनी पहा अता तो फरार आहे

कुणास ढकलून तू कधीही नकोस जाऊ पुढे कुणाच्या
तुझ्याकरीता सदैव मागे हटावया मी तयार आहे

इथे कुणा ना कधी कळाले कुठे, कुणी अन कसे मरावे
जिणे कुणाचे जुगार आहे मरण कुणाचे थरार आहे

गुलमोहर: 

येत जा देवून थोडी कल्पना(तरही)

Submitted by वैवकु on 13 June, 2012 - 07:45

ये! कशी आलीस इकडे ? सांगना
येत जा देवून थोडी कल्पना

जिंदगी मागीतली नव्हतीच मी
का सहू मग तू दिलेली यातना

एकदाही पत्र ना लिहिलेस तू
की तुला सुचलाच नाही मायना

मीपणा मी जाळला माझ्यातला
का न जळली तूपणाची भावना

ऐक ना ; आता स्वतःला विठ्ठला
लाव ना माझा लळा तू लाव ना !!

लाव ना माझा लळा तू लाव ना !! ....................................

गुलमोहर: 

आषाढओढ ......

Submitted by वैवकु on 13 June, 2012 - 06:35

लागता आषाढ ओढी विठ्ठलाची ओढ काळी
प्रेषितांच्या पालखीला शोषितांची मांदियाळी

काय देतो देव त्यांना तीच दुःखे तेच जगणे
तीच स्वप्ने झोपताना तीच मग पुन्न्हा सकाळी

एकतर्फी प्रेमिकांचा इश्क आहे तो विठोबा
प्रेम करणार्‍या जिवांचा देह जाळी, भान जाळी

"वाखरीच्या रिंगणाची एक फेरी मोक्ष देइल"
छे!...कधी कळणार त्यांना चक्रपाण्याची टवाळी

देव त्याचे देवपण जपतो कसे पटणार त्यांना
त्या बिचार्‍यांची मुळी श्रद्धाच असते माणसाळी

..
लागता आषाढ ओढी विठ्ठलाची ओढ काळी ..............प्रेषितांच्या पालखीला शोषितांची मांदियाळी !!

गुलमोहर: 

येत जा देऊन थोडी कल्पना - तरही गझल

Submitted by बेफ़िकीर on 13 June, 2012 - 05:27

नवीन तरहीत माझा विनम्र सहभाग, तरही पंक्तीसाठी व धाग्यासाठी डॉ. कैलास गायकवाड यांचे आभार

-'बेफिकीर'!

=============================================

एक तर येऊ नको ... वा यौवना
येत जा देऊन थोडी कल्पना

काय हा पाऊस आकाशा तुझा
ही जणू विधवा मुलीची सांत्वना

भेटुनी आलो तिला नुकताच मी
घे तुला हा गंध माझा चंदना

माणसांशी व्यर्थ स्पर्धा ठेवली
आपला तर आपल्याशी सामना

सोबती असुदे मरेपर्यंततर
मी तुझा कोणीतरी ही वल्गना

या समाजाने ठरवले शेवटी
आमच्या शुभकामनांना वासना

प्रेषितांनो देव कसला आणता
या ठिकाणी साध्य ठरली साधना

फार नटते ती म्हणे आधीहुनी

गुलमोहर: 

ग्रहासारखा जो तो फिरतो, प्रत्येकाला घरघर असते!

Submitted by सतीश देवपूरकर on 13 June, 2012 - 02:54

गझल
ग्रहासारखा जो तो फिरतो, प्रत्येकाला घरघर असते!
वाट सरळ कोणतीच नसते, कुठे तरी ती खडतर असते!!

कुणी पाहिली? कुणी मोजली? व्यथा मनाच्या खांद्यावरची;
कधी कधी ती मणभर असते, कधी कधी ती कणभर असते!

प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक झरा प्रेमाचा असतो;
हेवेदावे, रुसवेफुगवे, सारे सारे वरवर असते!

आई म्हणजे, वात्सल्याचा, एक अनावर पान्हा असते!
आई! आई! घर हंबरते, अन् आईही घरभर असते!!

रोजच येते ज्यास प्रचीती, ना दिसणा-या परमेशाची;
असो कितीही दुबळा तो पण, श्रद्धा त्याची कणखर असते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,

गुलमोहर: 

आक्रित

Submitted by सुधाकर.. on 12 June, 2012 - 14:16

काय सांगु देवा तुला, आज इथे आक्रित घडले,
माणसांच्या या जगात, माणुस शोधण्याचे भलतेच हे काम आले.

प्रत्यकाच्या काळजाला हात घालुन, निरखुन पाहीले,
पण सारेच कसे कोण जाणें, माळावरचे दगड निघले.

चेहर्‍यावरती नकाब चढवून, काळोखचे फकीर आले,
दैवाचेच दुत म्हणुन, रक्त पिऊन निघून गेले.

काय सांगू देवा तुला, आज इथे आक्रित घडले,
जिंकण्यासाठी जागो-जाग दुताचे ही डाव पडले.

आडाणीच लेकरू तुझे, कोल्ह्याहून हुशार झाले,
हसणाराचे काळीज चोरून अंधारात पशार झाले.

सत्यासाठी मेले त्यांना, अमरतेचे इनाम दिले,
मांसासाठी भांडणारे लांड्गेच कसे मागे उरले.

काय सांगू देवा तुला, ईथे कुणासाठी कोण मेले,

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल