का तिला इतका बिलगतो पावसाळा

Submitted by मयुरेश साने on 25 June, 2012 - 13:28

........ जाळणारा जळवणारा पावसाळा............

पावसा रे हा तुझा भलताच चाळा
का तिला इतका बिलगतो पावसाळा

मळभ इतके कोठुनी घेऊन येतो
कूळ काळे पावसाचा जन्म काळा

हा ॠतू आहे निसरड्या पावलांचा
मग कशाला सभ्यतेचे नियम पाळा

खेळ पट्ट्यांनाच तो भिजवून जातो
शेतकी साठी कितीही जीव जाळा

दाटतो अलगद तिच्या डोळ्यामधे अन्
ओलसर करतो मनाचा पोटमाळा

...........मयुरेश साने....

गुलमोहर: 

मळभ इतके कोठुनी घेऊन येतो
कूळ काळे पावसाचा जन्म काळा.......ठीक-ठाक...

बाकी सगळे शेर अफलातूनच!!!!!

पावसाळ्याचा फिल आला गझल वाचून....

धन्यवाद!

हा ॠतू आहे निसरड्या पावलांचा
मग कशाला सभ्यतेचे नियम पाळा

दाटतो अलगद तिच्या डोळ्यामधे अन्
ओलसर करतो मनाचा पोटमाळा>>>

वा वा, शेर आवडले

(अवांतर - मात्र पोटमाळा या शेरात 'कोण' तिच्या डोळ्यात दाटतो याचे उत्तर 'पाऊस' असायला हवे हे बाकीचे शेर वाचून कळू शकते. हा शेर गझलेच्या तंत्रानुसार शेर म्हणता येणार नाही. हा शेर अधिक स्पष्ट व्हायला हवा. ) Happy

मला आवडली गझल...
पोटमाळा मस्त खयाल..
कूळ काळे पावसाचा जन्म काळा
>> पावसावर खूप प्रेम आहे म्हणून हा मिसरा आवडला नाही, पण असाही खयाल असू शकतोच म्हणून "वाह" आलंच..
सुंदर अभिव्यक्ती!

छान

कवी सुप्रिया जाधव यांच्याशी मळभबाबत व कवी बेफिकीर यांच्याशी पोटमाळ्यावर अधिक स्पष्टता आणण्याबाबत सहमत आहो

कळावे

गंभीर समीक्षक

अहाहा ............सुन्दर
खयाल छान आहेत
मराठीचा बाज जरा व्यवस्थित हाताळायला हवा अजून..............

मतल्यात सुधारणेस वाव आहे पहिले वाक्य एकाला दुसरे एकाला उद्देशून असे वाटायला नको

गझल आवडली

पुलेशु

सुप्रिया जाधव.
पुरंदरे शशांक
शाम
बेफ़िकीर
बागेश्री
काकाकुवा
गंभीर समीक्षक
वैभवराव.................

सगळ्यांचे मन:पुर्वक आभार...

मतला वगळता सर्व शेर आवडले.

एकंदरीत मस्तच, पण मतला अजून सफाईदार हवा होता. मला त्यात पुनरुक्ती वाटली.