कसे म्हणावे नशीब हे फ़ळफ़ळते आहे
उथळ सुखांच्यासवे जरा खळखळते आहे!
नव्हते ठरले कधी आपुले भेटायाचे
कशास मी त्या पाराशी घुटमळते आहे?
थुंकुन देता आयुष्याला नशिबावरती
हळू हळू ते आता थोडे कळते आहे
मन्मानीला लगाम त्यांच्या घालू जाता
नात्यांमधली गोडी का साकळते आहे??
पुरुषासाठी जन्म पणाला नारी लावे
येत तटाशी लाट सुधा आदळते आहे!
आज-उद्याला अथवा परवा येशिल तू रे
पावसा बघ वेधशाळा गोंधळते आहे!
आयुष्याची भुकटी भुकटी होउन गेली
जणू वेदना जात्यावरती दळते आहे
कसे शक्य नाही नभाला झुकवणे?
नशीबास निधड्या मनाने झुलवणे
लपू मी कुठे अन कसा मी कधी रे?
मला शक्य नाही स्वतःला लपवणे
उसासे गिळुन काढली जिंदगी मी
अता शक्य नाही सुखाला पचवणे
सुरेला रिचवले किती मी मदाने
सुरेचे मला तेच होते रिचवणे
जगा निर्मुनी तो कुठे गप्प झाला
खुदाई म्हणवते तयाचे फसवणे
लाख दु:खे उंबऱ्याशी ठाकली
त्यात तू पेटी सुखाची झाकली
वादळाला जिंकले तेव्हाच मी
नाव पाण्यातून जेव्हा हाकली
दु:ख की आनंद व्हावा, ऐकुनी ?
"थोरली कन्या नको, द्या धाकली"
भार जेव्हा आठवांचा जाहला
मी नव्याने कात तेव्हा टाकली
वाहिली नाहीत ऐसी रोपटी,
रोपटी जी, वेळ येता वाकली
वैभव फाटक ( २४ जून २०१२)
चांदणे इतक्याचसाठी टाळले होते
पौर्णीमेने एकदा मन जाळले होते
एकटे मज सोडुनी गेलीस तू जेव्हा
बाग रुसली बहर सारे वाळले होते
खूप काही बोलल्यावर एवढे कळले
नेमके बोलायचे ते टाळले होते
काळजाचा एक गहिवर अश्रु बनला अन्
पापणीने दुखः ही कवटाळले होते
मी जरी काट्यात आहे खंत नाही पण
तू मला प्रत्येक जन्मी माळले होते...
मयुरेश साने
स्वप्नांच्या दुनियेवरती सत्यांचा खडा पहारा
सौख्यांचा भूलभुलैया दुःखांनो चकरा मारा
यंदाही अमच्याइकडे पाऊस फिरकला नाही
आला अन भेटुन गेला नुसताच मोसमी वारा
मी उदास असतो तेंव्हा मी उगाच हसतो वेडा
वाटते मला -'हसले की... लाभतो मनास उबारा!'
ती मला म्हणाली होती तू गेल्यावर येइन मी
मी अजून जगतो आहे..... श्वासांनो बंद पुकारा
गझलेत असावी जादू जी कळू नये कोणाला
बघणारी नजर म्हणावी वाव्वा रे जादूगारा
. . . . . . . . . . . . . . .
सोमवार ते रविवारी मी मलाच भेटत नाही
माहितीच नव्हते त्याला विठ्ठल आलेला दारा
मी आज पुन्हा हे धाडस करण्याचे धाडस केले
मी हसून माझ्यावरती रडण्याचे धाडस केले
काय काय केले सांगू गझलेच्या वेडापायी
लावणीगझल सुद्धा मी रचण्याचे धाडस केले
मी शिवी हसडली होती बेफिकीरजिंना तेंव्हा
मी देवसरांशी यंदा लढण्याचे धाडस केले
'पर्यायीगझल'गुरूंचा मग एकलव्य झालो मी
पर्यायी अर्जुन त्यांचा बनण्याचे धाडस केले
ग्रेसाळ नव्या शब्दांना शिकवली भटांची बोली
अन् मलाच माझ्यापुरता कळण्याचे धाडस केले
गझलेत इबादत नव्हती आणला आव भक्तीचा
"माझा विठ्ठल 'मी' आहे!!" म्हणण्याचे धाडस केले
ही गझलहि पावत नाही विठ्ठलही पावत नाही
मी म्हणून त्या दोघांवर रुसण्याचे धाडस केले
एकांतात तुझे गाणें स्फुराया लागले
तुझ्याविना स्वप्नातच मन मुराया लागले.
अबोल्या या मनाची जणु ओळखुन भाषा
झाड-झाड माझ्यासवे बोलाया लागले.
लपविले किती जरी मी डोळ्यातले पाणी
फूल-फूल नजर माझी निरखाया लागले.
आसवांत चमकली शुभ्र तारकांची माळ
चांदणें ही माझ्यासवे हसाया लागले.
एकटाच आलो मी आता एकटेच जाणे
खोल खोल आत हे आता रुजाया लागले.
या लिंकवर ठरल्याप्रमाणे प्रोफेसर देवपूरकरांच्या आग्रहास्तव ही तरही रचली आहे. मते अवश्य कळवावीत.
http://www.maayboli.com/node/36062?page=1#comment-2184877
धन्यवाद
-'बेफिकीर'!
===================================
पाषाणी हृदयांवरती फुलण्याचे धाडस केले
मृत्यूच्या सवयीसाठी जगण्याचे धाडस केले
विजयाची पाने कुठली हे कळल्यावरतीसुद्धा
मी होत जुगारी.. पत्ते.. पिसण्याचे धाडस केले
एकदा अबोला धरला तर कायमची रुसली ती
मी जेथे जे पिकते ते विकण्याचे धाडस केले
मी दुनियेमधुनी इतका अलगद डावलला गेलो
पानावर जणू दवाने रुजण्याचे धाडस केले
गझल
ताटव्यांमधे काट्यांच्या फुलण्याचे धाडस केले!
मरणाशी मैत्री केली, जगण्याचे धाडस केले!!
तू काट कसेही आता नशिबाचे माझ्या पत्ते;
मी पान पान स्वप्नांचे पिसण्याचे धाडस केले!
मी असली सोने सुद्धा विकताना कचरत होतो;
लोकांनी माती सुद्धा विकण्याचे धाडस केले!
वाकून वसंतानेही, मज सलाम केला तेव्हा.....
कातळातही मी जेव्हा, रुजण्याचे धाडस केले!
माणसे कशाची तेथे श्वापदेच रहात होती;
त्या हिंस्र माणसांमध्ये रुळण्याचे धाडस केले!
अतिरेक जाहला होता, अतिरेक्यांचा त्या गावी;
भूसुरुंगातुनी सुद्धा फिरण्याचे धाडस केले!
मी काटकुळा अन् माझा प्रतिस्पर्धी राकट होता!
गझल
ताटव्यांमधे काट्यांच्या फुलण्याचे धाडस केले!
मरणाशी मैत्री केली, जगण्याचे धाडस केले!!
तू काट कसेही आता नशिबाचे माझ्या पत्ते;
मी पान पान स्वप्नांचे पिसण्याचे धाडस केले!
मी असली सोने सुद्धा विकताना कचरत होतो;
लोकांनी माती सुद्धा विकण्याचे धाडस केले!
वाकून वसंतानेही, मज सलाम केला तेव्हा.....
कातळातही मी जेव्हा, रुजण्याचे धाडस केले!
माणसे कशाची तेथे श्वापदेच रहात होती;
त्या हिंस्र माणसांमध्ये रुळण्याचे धाडस केले!
अतिरेक जाहला होता, अतिरेक्यांचा त्या गावी;
भूसुरुंगातुनी सुद्धा फिरण्याचे धाडस केले!
मी काटकुळा अन् माझा प्रतिस्पर्धी राकट होता!