गतकाळ कोरडा मलिदा... हृदयाला जाळत राहो
अश्रूंचा ओला कचरा... गालावर वाळत राहो
घुसमटत्या अस्तित्वाला शोभेल असा मोसम दे
पाऊस पडो ना येथे... नुसते आभाळत राहो
खपली धरण्याची आता आकांक्षा उरली नाही
उपचार करा जो माझ्या जखमा कुरवाळत राहो
निष्कलंक व्यभिचाराला देवत्व असे मी द्यावे
चारित्र्यवान व्यक्तीची चर्या ओशाळत राहो
ती जाणारच असल्याने मी फार अडवले नाही
ज्या घरी रमत नाही ती... ते घर सांभाळत राहो
हा आठवणींचा संचय मी असा उगाळत आहे
की जणू भिकारी त्याचे पैसे न्याहाळत राहो
दे आळस तू... मग वारा... तो धाड तिकडचा इकडे
विरहाच्या कैदेवरती गंधाची पाळत राहो
अपमान जुने हे काही येतात असे वरती की
हुंड्यासाठी जळणारी मुलगी किंचाळत राहो
मासिकासारखा येथे जगण्याचे ठरवत आहे
वाचो ना वाचो कोणी पण पाने चाळत राहो
कर्तृत्व ब्राह्मणाचे मी दाखवेन या दुनियेला
कंजारभाट नशिबाचा बस मदिरा गाळत राहो
आजीचे जीर्ण जुनेरे झोपवते त्याच प्रकारे
दुर्गंध जुन्या गझलांचा दुनिया गंधाळत राहो
ही इतक्या निरिच्छतेने वाहवा जगाने केली
न्यायालय अतिरेक्याचा दावा फेटाळत राहो
कुठल्याच अन्य जन्माला यायची तयारी नाही
'बेफिकीर' होण्यासाठी आत्मा घोटाळत राहो
==============================
-'बेफिकीर'!
सुंदर गझल.
सुंदर गझल.
आख्खी गजलच सुंदर.. हा
आख्खी गजलच सुंदर..
हा आठवणींचा संचय मी असा उगाळत आहे
की जणू भिकारी त्याचे पैसे न्याहाळत राहो >>> पण हे विशेष आवडले....
दोन, तीन, चार आणि आजीचा हे
दोन, तीन, चार आणि आजीचा हे शेर आवडले.
निष्कलंक व्यभिचाराला देवत्व असे मी द्यावे
चारित्र्यवान व्यक्तीची चर्या ओशाळत राहो>>> खूप सुंदर!
सुन्दर....
सुन्दर....
माझ्या निवडक १०त.. बस्स!!!
माझ्या निवडक १०त.. बस्स!!!
सुंदरच.... मतल्यात गतकाळाला
सुंदरच....
मतल्यात गतकाळाला कोरडा मलिदा का म्हटले असावे कळले नाही... सानी मिसरा मस्तच.
न्याहाळत ,पाळत ,
किंचाळत,चाळत , गाळत... हे तुफान आवडले.....
मक्ता क्लास १......
खूप खूप सदिच्छा सह अभिनंदन!!!!!
.............शाम
व्वाह... सगळी गझल आवडली....
व्वाह... सगळी गझल आवडली.... बरेच शेर सखोल चिंतनीय.
दे आळस तू... मग वारा... तो धाड तिकडचा इकडे
विरहाच्या कैदेवरती गंधाची पाळत राहो............... हा शेर समजला नाही.... अजून विचार करतोय.
दे आळस तू... मग वारा... तो
दे आळस तू... मग वारा... तो धाड तिकडचा इकडे
विरहाच्या कैदेवरती गंधाची पाळत राहो!!
सुन्दर!!!
एकदम छान! निवडक दहात नोंद
एकदम छान!
निवडक दहात नोंद केली आहे...:)
" घुसमटत्या अस्तित्वाला शोभेल असा मोसम दे
पाऊस पडो ना येथे... नुसते आभाळत राहो
खपली धरण्याची आता आकांक्षा उरली नाही
उपचार करा जो माझ्या जखमा कुरवाळत राहो ""
खूप छान!!
सगळेच्या सगळे शेर बेहतरीन
सगळेच्या सगळे शेर बेहतरीन आहेत नेहमीप्रमाणे
मला हे दोन जरा जास्त आवडले .या दोन शेराना स्वतःशी रीलेट करायला मला निमिषार्ध ही लागला नाही म्हणून.......
अपमान जुने हे काही येतात असे वरती की
हुंड्यासाठी जळणारी मुलगी किंचाळत राहो
कुठल्याच अन्य जन्माला यायची तयारी नाही.........अगदी माझ्या मनातलं बोललात बेफीजी
'बेफिकीर' होण्यासाठी आत्मा घोटाळत राहो
कुठल्याच अन्य जन्माला यायची
कुठल्याच अन्य जन्माला यायची तयारी नाही
'बेफिकीर' होण्यासाठी आत्मा घोटाळत राहो
>>> mastach !!
ती जाणारच असल्याने मी फार
ती जाणारच असल्याने मी फार अडवले नाही
ज्या घरी रमत नाही ती... ते घर सांभाळत राहो
या अटिट्यूडला
'तू गेल्यावरती कळले वार्याला घर नसते ते
भिंती दारे खिडक्यांना एकांत न्याहाळत राहो ..'
हा फिमेल फीड्बॅक !
सगळे शेर सुंदर!
सगळे शेर सुंदर!
कुठले कुठले शेर उधृत करू .
कुठले कुठले शेर उधृत करू . प्रत्येक शेरामागचं चिंतन जबर ताकदीचं .
काही खूप आवडलेले शेर .
निष्कलंक व्यभिचाराला देवत्व असे मी द्यावे
चारित्र्यवान व्यक्तीची चर्या ओशाळत राहो >>>>>>आहाहा
ती जाणारच असल्याने मी फार अडवले नाही
ज्या घरी रमत नाही ती... ते घर सांभाळत राहो>>>>>सही
हा आठवणींचा संचय मी असा उगाळत आहे
की जणू भिकारी त्याचे पैसे न्याहाळत राहो >>>> वाहवा
दे आळस तू... मग वारा... तो धाड तिकडचा इकडे
विरहाच्या कैदेवरती गंधाची पाळत राहो >>>>>>>>>>मस्त
आवडत्या दहात......
आवडत्या दहात......:-)
आश्रुंना आधी किंमत न्हव्हतीच
आश्रुंना आधी किंमत न्हव्हतीच आन् आता ह्यांनी त कचराच केला.

केवळ झकास !!
केवळ झकास !!
नुसते आभाळत राहो........ आहा,
नुसते आभाळत राहो........ आहा, मस्त शब्द आहे, व्वा.
अपमान जुने हे काही येतात असे वरती की
हुंड्यासाठी जळणारी मुलगी किंचाळत राहो........... काटा आला, काय उपमा आहे.
पुन्हा एक खास गझल....!!!!!!
चीअर्स...!!!!!!!
सर्वांचा आभारी आहे.
सर्वांचा आभारी आहे. निशीकान्त, तुमचे विशेष आभार
अप्रतिम गझल.. जवळ जवळ सगळेच
अप्रतिम गझल..
जवळ जवळ सगळेच शेर आवडले..
हा आठवणींचा संचय मी असा उगाळत
हा आठवणींचा संचय मी असा उगाळत आहे
की जणू भिकारी त्याचे पैसे न्याहाळत राहो >> जबराटच..!
धन्यवाद, निवडक दहात घेणार्या
धन्यवाद, निवडक दहात घेणार्या सहा सदस्यांचे विशेष आभार
आज परत वाचली !! अप्रतिम आहे
आज परत वाचली
!!
अप्रतिम आहे !!
हा आठवणींचा संचय मी असा उगाळत आहे
की जणू भिकारी त्याचे पैसे न्याहाळत राहो
>>> आज हा शेर विशेष भावला ....
.( गझल समजुन घेण्याची क्षमता व्यक्तीच्या व्यक्तिगत अनुभवावर अवलंबुन असते काय ? असा सहज प्रश्न मनात डोकावला )
आज पुन्हा वाचली. कचरा हा शब्द
आज पुन्हा वाचली. कचरा हा शब्द वापरण्याची हातोटी विलक्षण आहे.
निव्वळ अप्रतिम !!!
निव्वळ अप्रतिम !!!