मराठी गझल

वेगळे जगायचीच मांडण्यास कल्पना

Submitted by प्राजु on 16 June, 2012 - 15:18

वेगळे जगायचीच मांडण्यास कल्पना
भासतेय का तुला उगाच शब्द वंचना??

राम-कृष्ण भेटती परीकथेतुनी तिथे
जायचे म्हणून रोज ऐकण्यास किर्तना

रोज पाहते उजाडताच स्वप्न मी नवे
आणि रात आणतेच सोबतीस सांत्वना

एकटे जिण्याविना उपाय ना मला अता
'एकटी सुखात मी!' करु अशीच वल्गना!

जाणतोस 'तू' म्हणे मनातल्या मनातले
समजतात का खरे विचार आणि भावना ?

मरण उंबर्‍यात आणि दार लावलेस का?
थांबवू नको मला उगाच आज, जीवना!

गोठवून टाक 'प्राजु' जाणिवा तुझ्या खुळ्या
का उगाच ओढवून घेतल्यास वेदना?

-प्राजु

गुलमोहर: 

*** येत जा देऊन थोडी कल्पना [ तरही ...]

Submitted by अरविंद चौधरी on 16 June, 2012 - 13:52

*

खूप अस्ताव्यस्त माझ्या वेदना
येत जा देऊन थोडी कल्पना

खेळ दुःखांचा सुखाशी रंगतो
पाहतो आतून त्यांचा सामना

जाहले निःशब्द माझे शब्द का ?
नेमक्या वेळी सुचेना मायना !

दुःखही आनंदले माझ्या घरी
मी कधी केली तयांची सांत्वना !

तूच बोलावे,तुझे मी ऐकतो
ठेवतो बाजूस माझ्या वल्गना

पापण्यांना ओल का आली अशी ?
जागली माणूसकीची भावना !

----- अरविंद

गुलमोहर: 

कोणी हसून गेले......!

Submitted by सुधाकर.. on 16 June, 2012 - 09:53

कोणी हसून गेले, कोणी रडून गेले,
झगडले जया पोटी, ते सारे इथेच सोडून गेले.

परवाच्याच त्या मैफलीत, सारे भिडू ते होते दंग,
वादळ ऊठल्या कवालीचे ते, गाणे आज विरून गेले.

कोण नाही बंदी येथे? सारेच प्यादे बांधलेले.
तु ही एक त्यातलाच, जन्म त्यांचे सांगून गेले.

जो तो त्याच्या जिवनाचा, असे एक कर्मभोगी.
तरी प्रतिक्षा का त्याची, जे हातून या सुटून गेले.

कोणी हसून गेले जरी का, तुला कशास चिंता?
दैव त्याचे तया भाळी, कर्म आहे लिहून गेले.

कशास ही आता, तु न रडावे, न झगडावे.
आहे तेच जाणावे, दैव आपुले, दान सुखाचे टाकून गेले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कसे जागवू अन् बजावू स्वत:ला?

Submitted by सतीश देवपूरकर on 16 June, 2012 - 07:19

गझल

कसे जागवू अन् बजावू स्वत:ला?
किती मारल्या खूणगाठी मनाला!

मनाची तुला पाहिजे शांतताही;
नको व्हायला यातनाही जिवाला!

करू काय मी एवढ्या या विटांचे?
विटांची जरूरी तुझ्याही घराला!

कधी दैव सुद्धा अशी हाक देते.......
जशी गाय बोलावते वासराला!

मला ती, तिला मी, असे पाहतो की......
जसे पाहतो आरसा आरशाला!

उरी झेलल्या कैक उल्का धरेने;
कुणी पाहिले ना तिच्या काळजाला!

मुकाटे तुझे दु:ख मी सोसताना;
कशी सांग देवू जबानी जगाला?

दवंडी दिल्यासारखे मौन त्यांचे!
किती देखणा साधती बोलबाला!

कृपेचे तुझ्या थेंब काही पुरेसे;
मधाचाच वाटेल प्रत्येक प्याला!

गुलमोहर: 

कळलेच नाही मजला.......!

Submitted by सुधाकर.. on 15 June, 2012 - 11:04

कळलेच नाही मजला, हा काय खेळ झाला,
र्‍हुदयास मोगर्‍याचा, बेधुंद गंध आला.

झिडकारूनी मी थकलो, दु:खाच्या सावटाला,
कळलेच नाही मजला, पावलो कसा सुखाला.

शब्दांच्या पालखीला, घेऊनी दुत आला,
बेफाम वेदनांच्या, झाल्या कित्येक गझला.

माझ्या अबोल ओठी, गंधर्व स्वर आला,
धुंदीत मुक्त जगावे, सांगून आज गेला.

कळलेच नाही मजला, हा काय खेळ झाला,
अंधार काळजाचा, दैदिप्य चंद्र झाला.

उजळुन आज आले, माझ्या दश-दिशेला,
शब्दांचे चांदणे हे, भेटे मला चातकाला.

कळलेच नाही मजला, हा काय खेळ झाला,
अवचित या जगाचा, संबंध साफ तुटला.

माझाच एकटा मी, मांडुन खेळ बसला,
अन र्‍हुदयास मोगर्‍याचा, बेधुंद गंध आला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रोज पाहिजे तुला बहार जीवनामधे!

Submitted by सतीश देवपूरकर on 15 June, 2012 - 07:22

गझल
रोज पाहिजे तुला बहार जीवनामधे!
पाहिजे वसंतही तसाच काळजामधे!!

भेटलीस तू मला, सुमार तो दुपारचा;
ती नशा, तशी मजा, न आज चांदण्यामधे!

चेह-यामधे तुझ्या छटा तरी अशा किती?
पाहतो तुझी छबी हरेक चेह-यामधे!

पारिजात ढाळतो फुलेच आसवांपरी;
वाट पाहतो तुझी अजून अंगणामधे!

लाख शिंपल्यांमधे मिळेल मोतशिंपही;
जीव गुंतवू नये, हरेक शिंपल्यामधे!

हा नव्हे समुद्र, ही धरेवरील आसवे!
जी पुसायला नदी मिळेल सागरामधे!

कुंतलामधे मला जरी न माळलेस तू;
घुंगरू बनून मी वसेन पैजणामधे!

पावसावरी कुणी लिहील खण्डकाव्यही;
पावसातली मजा कळेल पावसामधे!

-------प्रा.सतीश देवपूरकर

गुलमोहर: 

येत जा देऊन थोडी कल्पना (तरही गझल)

Submitted by आनंदयात्री on 15 June, 2012 - 07:07

येत जा देऊन थोडी कल्पना
सावरावे लागते हल्ली मना!

एकटा सोडून नाही जात मी
एकटी झुरते बिचारी वेदना

मी खुशीने भीकही घेईन पण -
दार थोडेसे तरी तू उघड ना!

ती म्हणे मी आजही आहे तुझी
(मी मुक्याने सोसतो ही वंचना!)

फक्त दु:खांचा जसा मी लाडका
ती सुखावर भाळलेली याचना!

मीच आडोसे तरी कितिदा करू?
बरसणे तूही तुझे सांभाळ ना!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/06/blog-post_15.html)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नाते तुझे नी माझे...

Submitted by सुधाकर.. on 15 June, 2012 - 01:48

आलीस घेऊनी येथे, तू काळजाच्या वेदनेला,
मागे खुळ्या बघ्यांचा, जथ्थाच एक आला.

फाटके नशिब होते, झिजण्यात जन्म गेला,
रक्ताचे पेरले थेंब, परी नाही वसंत फुलला

दु:खात ही हसावे, गिळुनी दु:ख हुंदक्याला,
शिकवलेस तू ही, गा तुझ्या जीवनाला.

निर्मळ जलाची धारा, नाते तुझे नी माझे,
पाठी खुळ्या जगाने, भलताच अर्थ केला.

आंदण मी दिले जे, माझे तुला आभाळ,
अफवेस आज त्यांना, अपवाद एक झाला.

तुझ्या नी माझ्या भोवती, नजरेची बंदीशाळा,
छेडण्यास मुक्त त्यांना, हा भलताच छंद झाला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

येत जा, देवून थोडी कल्पना!! (तरही गझल)

Submitted by सतीश देवपूरकर on 14 June, 2012 - 10:22

नवीन तरहीत माझा विनम्र सहभाग.
तरहीसाठी सुंदर ओळ दिल्याबद्दल व वेगळा धागा काढल्याबद्दल डॉ. कैलास गायकवाड यांचे आभार!
.........प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................
तरही गझल
ये सुखा! गुंडाळल्या मी वेदना!
येत जा, देवून थोडी कल्पना!!

ओठ माझे, दातही माझेच हे;
हाय! मी, माझीच केली वंचना!

तोंड पाटिलकी* करावी केवढी?
आज जो तो फक्त करतो वल्गना!

मी जगासाठीच केली भिक्षुकी;
माझियासाठी न माझी याचना!

दान असते गौण, तू दानत पहा;
शेवटी जी पोचते, ती भावना!

याच चिंतेने न लिहिले पत्र मी;

गुलमोहर: 

येत जा देऊन थोडी कल्पना - तरही गझल

Submitted by कमलाबाई सोनटक्के on 14 June, 2012 - 05:52

सोसवेना हा अचानक सामना
येत जा देऊन थोडी कल्पना

पूजिला का वड उगा तू सांग ना
अंतरी केलीस माझी वंचना

मज सुखाने बनविले का आळशी
कष्ट करण्या दु:ख देई चालना

दगड धोंडे मंदिरातिल देव हे
मग बुभुक्षा त्यास करते याचना

ग्रीष्म सरता पावसाची धार ये
तप्त भूला तृप्त कर तू जीवना

लोंबलेली माणसे ती ट्रेनला
मुंबईची सर न तुजला लंडना Proud

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल