गझल
अव्याहत चालायाचे पायांनी कबूल केले!
क्षण एक एक जगण्याचे श्वासांनी कबूल केले!!
त्या पहिल्या भेटीमधले, संभाषण मौनामधले;
जे मनात होते ते ते, डोळ्यांनी कबूल केले!
ह्यामुळेच झालो राजी; मी गझला लिहिण्यासाठी,
ह्रदयास थेट भिडण्याचे शब्दांनी कबूल केले!
दिसतात जगाला काटे मी म्हणू लागलो तेव्हा;
ह्रदयातच घर करण्याचे काट्यांनी कबूल केले!
काळजात अजुनी माझ्या तेवते ज्योत स्वप्नांची,
तिमिरात हात देण्याचे स्वप्नांनी कबूल केले!
वैराण माळही क्षणभर बहरला मनाने थोडा;
ना चुकता बरसायाचे मेघांनी कबूल केले!
मी दिले सुकाणू माझे लाटांच्या हातामध्ये;
न्यायचे तटावर मजला, लाटांनी कबूल केले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
ह्रदयातच घर करण्याचे ह्रदयातच
ह्रदयातच घर करण्याचे
ह्रदयातच घर करण्याचे
इथे लयीत म्हणायला का जमत नाहीये ?
अप्रतीम गझल! फक्त ना चुकता
अप्रतीम गझल!
फक्त
ना चुकता बरसायाचे मेघांनी कबूल केले! >> ही ओळ थोडी पटली नाही..
'न चुकता' जास्त श्रवणीय वाटत, 'पर्यायी' काही असेलच.. क्रु गै न.... धन्यवाद!
ह्यामुळेच झालो राजी; मी गझला
ह्यामुळेच झालो राजी; मी गझला लिहिण्यासाठी,
ह्रदयास थेट भिडण्याचे शब्दांनी कबूल केले!
हा शेर आवडला :), 'हृदयांस' असे केल्यास इतरांच्या असा फील येऊन शेरात अजून मजा यावी. अनुस्वार नसल्यास शायराच्या हृदयास असे वाटते मग शेर तितकासा भिडत नाही.
ह्यामुळेच झालो राजी; मी गझला
ह्यामुळेच झालो राजी; मी गझला लिहिण्यासाठी,
ह्रदयास थेट भिडण्याचे शब्दांनी कबूल केले!
मी दिले सुकाणू माझे लाटांच्या हातामध्ये;
न्यायचे तटावर मजला, लाटांनी कबूल केले!
सर ; अप्रतीम शेर आहेत हे ................
सर्वच शेर दमदार,वजनदार .
सर्वच शेर दमदार,वजनदार .
ह्यामुळेच झालो राजी; मी गझला
ह्यामुळेच झालो राजी; मी गझला लिहिण्यासाठी,
ह्रदयास थेट भिडण्याचे शब्दांनी कबूल केले!>>>
प्रमोशन दिलंत तर बदली स्वीकारेन सारखेच झाले हे म्हणजे.
गझला लिहिण्यासाठी राजी होणे ही पोझ नावीन्यपूर्ण आहे
शेवटचा शेर आवडला