कविता

रंगपंचमी

Submitted by पुरंदरे शशांक on 16 April, 2012 - 06:19

रंगपंचमी

हातावरली रेखिव मेंदी
करातले हे हिरवे कंकण
अंगी शोभे ओली हळदी
गळ्यातले हे रेशीम बंधन

कुळकुळीत केसांचा पट तो
उलगडता या नजरेपुढती
रंग गुलाबी ओठावरचा
खुलून येतो ओठाओठी

मेघ सावळा तुज रुपाने
बरसत जातो अंगागांवर
उमटत जाती तनामनावर
शहार आणि कोवळ अंकुर

उत्कट गहिरी प्रीती आपुली
प्रणयाचे हे रंग अनावर
रंगपंचमी ही अलबेली
स्वर्गींचे सुख इथे धरेवर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एक घास पक्षाला

Submitted by bnlele on 15 April, 2012 - 12:11

दुश्काळग्रस्त महाराष्ट्रात पक्षांना वाचविण्यासाठी "एक घास पक्षाचा" ही अभिनव आणि सहृदई चळवळ जन्माला आली आहे.
परंतु सद्य स्थितित राजकीय "पक्षांतर्गत घडामॊडीच्या संदर्भात शब्द्छल करण्याचा मोहझाला तो असा:-
राजधानीतून सुटलं फर्मान-
हवास तू हवा इथे !
दूरस्थ पक्षि निघाला वेगे
धरून चोचित काडी गवताची.
मनात उठलं शंकांच वादळ,
हादरल घरटं अचानक वावटळ ?
क्षणि उडाला सैरावैरा पाचोळा,
नसता गाफिल नव्हता विरंगुळा.
कुटुंबियांची कां फिरली माथी-
चुकवून नजरा गुप्त खुणवती,
हात बांधुनी पोटांवरती -
अतृप्त आहे भूक सांगती.
कुरणं-शेतं मुक्त दिली चरेल त्याला,
संचय माझा - कां खुपला इतरांना?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रंग मायेचे

Submitted by मिडासटच on 15 April, 2012 - 01:47

'रंग' असतात इंद्रधनुचे, क्षणार्धात मिटणारे,
'रंग' असतात फुलांचे, मनाला मोहुन टाकणारे...

'रंग' असतात भावनांचे, कधिही न दिसणारे,
'रंग' असतात मनांचे, भावनांना जपणारे...

'रंग' असतात डोळ्यांचे, सुखदु:ख लपवणारे,
'रंग' असतात अधुंचे, कशातही मिसळणारे...

'रंग' असतात सुखाचे, क्षणिक आनंद देणारे,
'रंग' असतात दु:खाचे, मनाला पाझर फोडणारे...

'रंग' असतात प्रेमाचे, बंधनांना जपणारे,
'रंग' असतात मायेचे, प्रेमवेडे करणारे...

गुलमोहर: 

जीवनयात्रा

Submitted by मिडासटच on 14 April, 2012 - 02:17

किती मोठ्ठा दिवस आहे हा, देवा
किती कठीण लढाई आहे ही, जगण्याची...

किती विश्वासाने होते मनं भरलेले
कितीतरी तुझ्या विचाराने ओतप्रोत असलेले...

किती कठीण जगणे आहे रे......... मित्रा
हिच आहे जीवनयात्रा, हिच आहे जीवनयात्रा...

गुलमोहर: 

पुन्हा एकदा

Submitted by मिलिंद हिवराळे on 13 April, 2012 - 07:57

===कसं गावं?===

'' जो तो पिकवितो असत्याचे मळे;
भासवून डोळे सत्यप्रिय.

अनीति, अन्याय रक्तामध्ये ज्याच्या;
हातांमध्ये त्याच्या विश्वचेंडू.

असत्याच्या हाती अनीतिचा हात;
काजळली वात समतेची.

असत्येश्वराचे वाढले पुजारी;
सत्याचे कैवारी दुर्मिळले.

कसं गावं गीत अमर सत्याचं;
वारं असत्याचं वाहताहे.

सत्याचा खराटा द्या हो जोतिराव;
असत्याचं गाव झाडावया...! ''

- मिलिंद देविदास हिवराळे
मो. ९४२३६०१३२०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

विरामचिन्हे

Submitted by क्रांति on 13 April, 2012 - 03:53

नेहमीच
तिच्या बोलक्या डोळ्यांत उद्गारचिन्हं
भाव भिन्न भिन्न
नवलाई, आनंद, कौतूक,
भीती, वेदना, त्रागा
सगळं काही उच्चाराविना उद्गारणारी
उद्गारचिन्हं !!!!!!!

तिच्या बंद ओठांवरच्या अवतरणचिन्हांत
कायमच वसलेलं गूढसं मौन
आणि तिचे शब्द त्या भक्कम कवाडाच्या आत अडकलेले
जन्मठेपेचे कैदी
" "

चुकून एखादा शब्द ओठांबाहेर आलाच
तर त्याच्यापुढे अपरिहार्यपणे धावणारं
अपसरणचिन्ह ..................................
तिचं अपुरेपण सिद्ध करायला सिद्ध.......

अर्ध ; स्वल्प , अपूर्ण :
विरामांना तिच्या आयुष्यात स्थानच नाही

गुलमोहर: 

मिलन

Submitted by pradyumnasantu on 12 April, 2012 - 13:52

फुलाच्या केशरात
केशरी सांजवात
जाउनिया आत आत
टिपतो मधुजल

पाकळी पाकळी
धुंदीने रसाळली
लालीने पोळली
नजर जाहली गजल

अभिलाषा मोहरली
वेलीवर विहारली
लाजेने शहारली
गालावरची मखमल

फूल तृप्तीने म्हणते
जा आता सदनाते
उद्या पुन्हा ये परते
देईन आणखी मधुजल

सांजवात धुंदीत
गुरफटल्या गंधात
बदलुनी दिशा जात
न्याहाळत फूल फूल

गुलमोहर: 

'' जयंती''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 12 April, 2012 - 13:08

एप्रील मास येता, स्मरते तुझी जयंती
जलशात संगिताच्या, हरते तुझी जयंती II धृ II

कितवी तुझी जयंती,आम्हा न ज्ञात आहे
पण साजरी करावी,ऐसा प्रघात आहे
झोपेतल्यास जागे,करते तुझी जयंती II १ II जलशात संगिताच्या, हरते तुझी जयंती

बनतोय कार्यकर्ता,ज्याला न कामधंदा
सरसावतो स्वतःला,जमवावयास चंदा
दिसणार ती गचांडी,धरते तुझी जयंती II २ II जलशात संगिताच्या, हरते तुझी जयंती

कोणी मिरवणुकीची,करतो तयारी आहे
कव्वाल कोण यावा,ठरते सुपारी आहे
राखावयास शांती,झुरते तुझी जयंती II ३ II जलशात संगिताच्या, हरते तुझी जयंती

गुटखा कुणास लागे,लागे कुणास दारु

गुलमोहर: 

पोरका

Submitted by उमेश वैद्य on 12 April, 2012 - 09:49

पोरका

पापणीत ओथंबले विदग्ध तळ्याचे पाणी
हरलेल्या आयुष्यांच्या तरंगती कमळीणी

निश्चल वा-यांनाही आज आली जाग विषारी
कर्तुत्वही आज माझे मजला नाव विचारी

पुस्तकात संचिताच्या माझे मोकळे रकाने
मी भोगल्या व्यथेची ते मांडती दुकाने

थेंब थेंब जगण्याला मी किती खर्चिले श्वास
राहिलीच बापडी माझी फ़ुलावयाची आस

मिण मिण अंधाराचा शोधून आसरा घेतो
मूक हुंदक्यांचा मी पोर पोरका होतो

उ. म. वैद्य २०१२

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दुखाचे उपकार

Submitted by किरण कुमार on 12 April, 2012 - 05:33

दूख लपवू म्हटल,दुख खपवू म्हटल
दुखाचे उपकार पाणी डोळ्यात आटलं

हात सोडूनिया माझा गेली का ग दूर
लय चूकली गाण्याची तो हरवला सूर

आता हळूवार ठोके पडती या उरात
तूझीच गाणी गातो तुझ्याच सूरात

आठव तू कधी काय कहानी घडली
होती तूही कधी का मजसाठी रडली

येशील घेवूनी त्या आठवनी लाख
कि होईल अशीच इथे सरणाची राख

---------- किकु-----

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता