Submitted by मिडासटच on 15 April, 2012 - 01:47
'रंग' असतात इंद्रधनुचे, क्षणार्धात मिटणारे,
'रंग' असतात फुलांचे, मनाला मोहुन टाकणारे...
'रंग' असतात भावनांचे, कधिही न दिसणारे,
'रंग' असतात मनांचे, भावनांना जपणारे...
'रंग' असतात डोळ्यांचे, सुखदु:ख लपवणारे,
'रंग' असतात अधुंचे, कशातही मिसळणारे...
'रंग' असतात सुखाचे, क्षणिक आनंद देणारे,
'रंग' असतात दु:खाचे, मनाला पाझर फोडणारे...
'रंग' असतात प्रेमाचे, बंधनांना जपणारे,
'रंग' असतात मायेचे, प्रेमवेडे करणारे...
गुलमोहर:
शेअर करा
रंग असतात कॅमलचे,
रंग असतात कॅमलचे, रंगपेट्यातुन भरलेले
रंग असतात नेरोलॅकचे, भिंतीवर मारलेले