सुधिर मते

जपुन ठेवील

Submitted by मिडासटच on 6 May, 2012 - 01:14

ही हाडामासांची माणसे,
मला काय देणार आहे?,
देवाच्या क्रुपेनेच,
मला खरे सुख लाभणार आहे

तो टाकेल नक्की माझ्या झोळीत,
चन्द्र आनि तारे
मिळालेत मला की,
ह्रुदयात मी जपुन ठेवील सारे

गुलमोहर: 

रुसली होती

Submitted by मिडासटच on 6 May, 2012 - 01:12

कित्येक दिवसाने तु,
पुढे केलास स्नेहाने हात
खरेच खुप आनंद झाला,
अण अश्रुंचे वाहिलेत पाट

ईतक्या दिवसापासुन
रुसली होती ग्रह आनि तारे
अचानक अमावसेच्या रात्री,
चमचमु लागली सारे ...........

गुलमोहर: 

रुसली होती

Submitted by मिडासटच on 6 May, 2012 - 01:11

कित्येक दिवसाने तु,
पुढे केलास स्नेहाने हात
खरेच खुप आनंद झाला,
अण अश्रुंचे वाहिलेत पाट

ईतक्या दिवसापासुन
रुसली होती ग्रह आनि तारे
अचानक अमावसेच्या रात्री,
चमचमु लागली सारे ...........

गुलमोहर: 

मला हवे

Submitted by मिडासटच on 20 April, 2012 - 22:49

नको त्या कटकटी,
नको त्या वाटाघाटी,
स्नेहाच्या गाठी मला हव्या.......

गरज खडकुची,
खडकुचाच स्वार्थ,
निस्वार्थ भावना मला हवी.....

नको लाडु पेढे,
नको पंचपक्वान्ने
साधेसे भोजनच मला हवे.....

नको नकटा व्यापार,
नको खोटा आधार,
प्रेम तुझे देवा, मला हवे......

गुलमोहर: 

रंग मायेचे

Submitted by मिडासटच on 15 April, 2012 - 01:47

'रंग' असतात इंद्रधनुचे, क्षणार्धात मिटणारे,
'रंग' असतात फुलांचे, मनाला मोहुन टाकणारे...

'रंग' असतात भावनांचे, कधिही न दिसणारे,
'रंग' असतात मनांचे, भावनांना जपणारे...

'रंग' असतात डोळ्यांचे, सुखदु:ख लपवणारे,
'रंग' असतात अधुंचे, कशातही मिसळणारे...

'रंग' असतात सुखाचे, क्षणिक आनंद देणारे,
'रंग' असतात दु:खाचे, मनाला पाझर फोडणारे...

'रंग' असतात प्रेमाचे, बंधनांना जपणारे,
'रंग' असतात मायेचे, प्रेमवेडे करणारे...

गुलमोहर: 

जीवनयात्रा

Submitted by मिडासटच on 14 April, 2012 - 02:17

किती मोठ्ठा दिवस आहे हा, देवा
किती कठीण लढाई आहे ही, जगण्याची...

किती विश्वासाने होते मनं भरलेले
कितीतरी तुझ्या विचाराने ओतप्रोत असलेले...

किती कठीण जगणे आहे रे......... मित्रा
हिच आहे जीवनयात्रा, हिच आहे जीवनयात्रा...

गुलमोहर: 
Subscribe to RSS - सुधिर मते